“आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराsssssज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो”, असं आपल्या बालबोबड्या वाणीनं ही चिमुकली बोलतेयं. तिच्या या सगळ्या बालवाणीतून निघालेला शब्दनं शब्द हेच सांगतोयं की महाराष्ट्राच्या मातीला कधी परक्यांच्या आक्रमणांची भीती नाही कारण इथं होऊन गेलायं तो आमचा राजा. मायबाप, ज्यानं आम्हाला जगायचं कसं आणि ल’ढायचं कसं हे मोठ्या हिंम्मतीनंं इतिहासात शिकवून दिलंयं. तिची ही गारद आमच्या भविष्यातील पीढ्यांचा आवाज नक्की बुलंद करून सोडणार, यात तीळ मात्र शंका नाही. इतिहासाच्या पानोपानी सुवर्ण अक्षरांनी माझ्या राजाचं अक्षर कोरुन जसं ठेवलंयं ना तसंचं इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनोमनी कोरुन ठेवलंयं माझ्या राजाचं नाव. ते मिटवायला कुणाचाही बाप आला तरी त्याच्याही बाप जन्मात त्याला शक्य नाही.
महाराजांनी काय जादू केलीयं इथल्या प्रजेवर शेकडो वर्षांनंतरही आमच्या राजाची गारद अशी अवघ्या चार वर्षांच्या बाळांच्या ओठी येत असेल ना तर आजही आमच्या इतके भाग्यवान दुसरे कुणीही नाहीत. काय जादू आहे माझ्या राजांच्या नावात, याच संशोधन केलं तरीही या जन्मी तरीही उकल होणार नाही. राज्यांच्या प’राक्रमाची गाथा जाणून घेण्यासाठी उभा जन्म कमी पडतो मग या बालमुखात अशी गारद वदवून घेणाऱ्या करत्या करवित्याबद्दल त्या इतिहासवीराच्या परा’क्रमाबद्दल समजायला जाणून घ्यायला किती काळ लोटेल याची कल्पना केली तरीही अंगावर काटा येईल. या अवघ्या किमान चार वर्षांच्या मुलीच्या बोबड्या शब्दांत सुद्धा भावना मात्र स्पष्ट दिसून येते. भक्ती ही मनापासून असली तर मग कुठल्याही भाषा उच्चार प्रमाणाची गरज भासत नाही. आमचा राजाही इतक्याच मोठ्या मनाचा आहे. आमचा धर्मही तितक्याच मोठ्या विचारांचा आहे, यात तिळमात्र शंका नाही. सगळ्याच्या मागे आई भवानी सारखी एक दैवी शक्ती उभी असेल. ज्या शक्तींनं कायम महाराष्ट्रच काय अवघ्या देशावर आशीर्वाद कायम ठेवलेत. त्याच दैवी शक्तीनं इथल्या बाल मुखा मुखावर शिवरायांचा जागर एका चैतन्यरुपी प्रखर ज्योती सारखा तेवत ठेवला आहे.
जगातील असं एकमेव व्यक्तिमत्त्व ज्यांचं नाव जरी ऐकले तरी अंगावर शहारे आणि मनात प्रेरणा निर्माण होते ते म्हणजे आपला जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी ( एक वक्ती असते) पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली. तिथपासून म्हणजे विचार करा शेकडो वर्षांपासून गारद देण्याची परंपरा आज राजे आपल्यात नसले तरीही त्यांनी निर्माण केलेल्या या सगळ्या परा’क्रमांच्या शौर्य गाथा ऐकताना डोळ्यापुढं इतिहास उभा राहतो. गारद आजही कुणी दिली की अंगावर शहारा येतो. याच मराठमोळ्या राजाचं मावळं असल्याचं प्रतीक आहे. या एकवीसाव्या शतकात खरी गरज
आहे ती म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्थापन केलेल्या स्वराज्याप्रती कायम बांधिल राहण्याचं. महाराजांनी दिलेल्या सुशासनाच्या आदेशाला कायम शिरसावन्य मानून त्याचा अवलंब करण्याचं पुढील पिढीपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्याचं त्यामुळं जिथं शक्य होईल तिथं आपला मराठमोळा साज, मराठमोळा इतिहास, मराठीपण जपण्याचं, महाराज्यांच्या सुशासनाचं पालन करण्याचं. इतकं शक्य झालं तर आपण महाराजांचे खरे मावळे बनण्याचा किमान प्रयत्नांपर्यंतं पोहोचू जसं की. या चिमुकलीनं या वयापासून सुरु केलंयं.
बघा व्हिडीओ :