Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील म्हणाल, “आमच्यावेळी देखील असे शिक्षक हवे होते…”

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील म्हणाल, “आमच्यावेळी देखील असे शिक्षक हवे होते…”

नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. अशात एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून तसं तुम्हाला हसू येईल,आनंद होईल, शिक्षिकेचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक वाटेल… पण बॉस आपल्यालाही एकदा मनातून असे वाटून जाईल की, अशी शाळा आपल्यालाही हवी होती, असे शिक्षक आपल्यालाही हवे होते. काहींना तर असेही वाटू शकते की, आताही माझी या शाळेत जायची तयारी आहे, मी घ्यावा की काय प्रवेश? असे विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आता असं या व्हिडीओत नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल नाही का?

रोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, जे हसवतात, मनाला भुरळ घालतात आणि कधी कधी वेगळी छाप सोडतात. आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही, याचा अंदाज हा व्हायरल व्हिडिओ पाहून लावता येईल, ज्यात लहान मुलं आणि त्यांच्या शिक्षिका जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर शाळकरी मुलींचा आणि खूप अभ्यासू अशा शिक्षिकेच्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो युजर्सला खूप आवडलेला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, 4-5 मुली आहेत, ज्या माध्यमिक शाळेत शिकत आहेत. त्यांच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे, जेव्हा त्या हा डान्स करत होत्या. अनेकांना शाळा, शिक्षक, शिक्षिका या सगळ्या गोष्टी बोर वाटत असतात. मात्र एका सरकारी शाळेतील या शिक्षिकेने एक धाडसी पाऊल उचलत बोरिंग क्लासला आपल्या अनोख्या आणि मनमोकळ्या डान्सने रोमांचक बनवलं. आता या शिक्षिका साध्या सुध्या शिक्षिका नसून नावाजलेल्या अभ्यासू शिक्षिका आहेत. जगभरात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फुलब्राईट फेलोशिपर त्या आहेत. तर आता मुद्दा आहे त्यांच्या अनोख्या असण्याचा…

तर झालं असं की, शाळेच्या शेवटच्या दिवशी मुलींने आपल्या शिक्षिकेला आपल्यासोबत डान्स करण्याची तसेच त्याचा व्हिडीओ बनवण्याची विनंती केली. या शिक्षिकेचे नाव ‘मनू गुलाटी’ असून त्या आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कधी त्या विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकलेतून शिकवत असतात, तर कधी खेळ आणि डान्समधून त्या क्लासचा माहौल आणखी मनोरंजक करत असतात.

मनू गुलाटी आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा कधीही कंटाळा येऊ देत नाही. म्हणुनच त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे नाते खूपच चांगले आहे. त्याचमुळे या विद्यार्थ्यांनी हक्काने आपल्या मॅडमला नृत्य करण्याची विनंती केली.

या व्हिडीओमध्ये मनू त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत ‘झुमका बरेली वाला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनू यांचे विद्यार्थी सुद्धा वर्गात आपल्या मॅडमसोबत थिरकले आहेत. मनू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे. हा व्हिडीओ स्वतः मनू गुलाटी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दिल्ली शहर का मीना बाजार लेके…आम्ही समर कॅम्पच्या शेवटच्या दिवशी डान्स केला. आनंद आणि एकतेचे काही सर्वोत्तम क्षण अनुभवताना…”.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *