Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही स्वतःहून शे’अर कराल, बघा हा वायरल व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही स्वतःहून शे’अर कराल, बघा हा वायरल व्हिडीओ

गेले बरेच दिवस लग्न, डान्स या विषयांवरील व्हिडियोज आपल्या टीमने पाहिले आणि त्यावर लेख लिहिले. पण कोणतीही गोष्ट सातत्याने केल्याने त्यातील मजा कमी होते. जर आम्हीच त्या व्हिडियोज जी मजा कमी घेऊ लागलो तर आमच्या लेखांतून तरी ती कशी उतरणार. त्यामुळे तुम्हा आम्हाला कंटाळा यायच्या आत नवीन विषय घेऊन आपली टीम आपल्या समोर आली आहे. आज आपल्या टीमने असा एक व्हिडियो शोधून काढला आहे जो निरागस, अकृत्रिम आणि हवाहवासा वाटणारा आहे. हा व्हिडियो पाहून केवळ आणि केवळ निष्पा’प आनंद मिळतो आपल्याला. असं काय आहे या व्हिडियोत ? तर हा व्हिडियो आहे एका व्यक्तीचा आणि त्याने पाळलेल्या १२ बकऱ्यांचा. जेव्हा व्हिडियोची सुरवात होते तेव्हा आपल्याला हा मालक आणि त्याच्या बकऱ्यांचा कळप कुठे तरी चाललेला दिसतो.

आजूबाजूच्या वातावरणातून पाश्चिमात्य देशातील व्हिडियो असावा असा कयास करता येतो. तर, हा छोटा कळप लगबगीने एका ठिकाणी जाऊन थांबतो. या जागेत आपल्या या मित्राने एके ठिकाणी लाकडाचा वापर करून अशी एक व्यवस्था केलेली असते, ज्यावर खूप साऱ्या बॉटल्स ठेवता येतील. या बॉटल्स मधून अर्थातच या बकऱ्यांना पोषक असं दूध दिलं जाणार हे सरळच असतं. त्यामुळे हा कळप कुठे जात होता हा प्रश्न सुटतो. मग आपला मित्र त्याच्या कडे असलेल्या सगळ्या बॉटल्स अगदी व्यवस्थितपणे रचून ठेवतो. पण बकऱ्याच त्या. त्या थोडी अगदी रांगेत उभं राहून दूध पिणार. पण हा आपला मित्र मात्र त्यांनाही एका पाठोपाठ उचलून व्यवस्थित जागेवर ठेवतो. त्यानंतर मात्र कॅमेरा काही काळ स्थिरावतो आणि जे दृश्य दिसतं ते अतिशय गोड आणि समाधानकारक असतं. आपल्या इवल्या इवल्याश्या शेपट्या हलवत हलवत या बकऱ्या दूध पित असतात. लोभस असं चित्र दिसत असतं आणि याच दृश्यात या व्हिडियो ची सांगता होते.

किती तो साधा व्हिडियो. पण तरीही मन प्रफुल्लित करून जातो. त्यात कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा सहभाग नाही, लक्ष आकर्षून घेण्यासाठी काही विशेष केलेलं नाही. पण त्यात आहे अकृत्रिमपणा, एक सहजता आणि हवीहवीशी वाटणारी निरागसता. आपल्या आजूबाजूचं वातावरण बघता ही निरागसता कुठे तरी लोप पावते आहे, हे खेदाने मान्य करावं लागतं. पण असे व्हिडियोज काही क्षण का होईना आपलं मन प्रफुल्लित करण्यात यशस्वी होतात. त्यामुळे असे व्हिडियोज वारंवार पाहावेत असंच वाटत राहतं.

या व्हिडियोने आम्हाला प्रफुल्लित केलं, तसेच या लेखाने आपल्याला प्रफुल्लित केलं असेल हे नक्की. आपली टीम दररोज आपल्या साठी खास असे विविध विषयांवरचे लेख आणत असते. आपण ही हे लेख आवडीने वाचत असता आणि शेअर करत असता. हा लेखही असाच शेअर कराल याची खात्री आहे. तसेच नवनवीन लेखही आवर्जून वाचा. सतत लिहिता हात असण्यासाठी आपल्या टीमला आपल्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनाची गरज असते, तेव्हा आपला लोभ कायम असावा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *