Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहिल्यावर भारतीय जवानांबद्दल अजून अभिमान वाटेल, बघा डोळ्यांत पाणी आणणारा हा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यावर भारतीय जवानांबद्दल अजून अभिमान वाटेल, बघा डोळ्यांत पाणी आणणारा हा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज बघते ना, तेव्हा एवढे असंख्य विषय डोळ्याखालून जातात की काय विचारू नका. त्यातून मग आपल्या वाचकांना काय आवडेल याचा विचार करूनच, मग आपली टीम पुढे जाते. त्यात काही विषयांवर खूप वेळ जातो तर काही विषयांवर चट्कन एकमत होतं. चट्कन एकमत होणारे विषय हे सहसा थेट काळजाला हात घालतात. आपल्या टीमने आज बघितलेला एक व्हिडियो याची साक्ष देतो.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक गजबजलेलं मार्केट दिसत असतं. त्यात वाहनांची येजा चालू असते. एक जाडगेलासा माणूस रस्ता ओलांडून येतो. हातात पाण्याची बाटली घेऊन तो येत असतो. येऊन कोपऱ्यावरच्या एका दुकानापाशी थांबतो. त्याचं दुकान असावं बहुधा असं वाटत असताना हा अंदाज खरा ठरतो. कारण त्याच्या दुकानाच्या पायरीशी एक व्यक्ती झोपलेली असते. तो सरळ त्या व्यक्तीशी काही तरी बोलतो. वेळ पण सकाळी साडे दहाची दिसत असते म्हणजे दुकान उघडण्याची वेळ. त्यामुळे उठवत असेल हे कळून येतं.

पण मग केवळ बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीला हा दुकानदार पाय पण लावतो आणि अंगावर थेट पाणी टाकतो. एक दोनदा अस करतो आणि मग ती व्यक्ती जागी होते. ती एक ग’रीब स्त्री असते हे कळून येतं. तिला काय घडतं आहे याची कल्पना येते आणि ती सरळ या व्यक्तीच्या पाया पडायला लागते. पण तो दुकानदार उद्दामपणे बोलत राहतो. त्याच्या देहबोलीतून हा उद्दामपणा दिसून येत असतो. हे सगळं एवढं राजरोस चालू असताना सगळे बघे असतातच. पण मदत करायला म्हणून पुढे कोणीही येत नसत. तेवढ्यात दोन व्यक्ति मात्र घोळक्यातून पुढे येतात. एक असतो सैनिक आणि त्याच्या सोबत असते एक स्त्री. हा सैनिक या उद्दाम दुकानदार व्यक्तीला बाजूला सारतो. इथे त्या दुकानदाराच सैनिकाशी सुद्धा हुज्जत घालणं सुरू असतं. मग शेवटी तो सैनिक त्या वृद्ध स्त्रीला उठायला मदत करतो. तिचं सगळं सामान आवरतो. नंतर तिला चप्पल घालायला सुद्धा मदत करतो. प्रथमतः झाल्या प्रकाराने सर्द झालेली ती गरीब स्त्री जवानाच्या पाया पडत असते. पण त्यालाच कसं तरी वाटत असतं म्हणून तो तिला पाया पडूच देत नाही.

नंतर मग त्याच्या सोबत असलेली स्त्री त्याला पुढे घेऊन जाते तेव्हाही या ग’रीब स्त्रीला नमस्कार करत तो पुढे निघून जातो. त्या ही त्यांच्या वाटेला लागतात आणि व्हिडियो संपतो. त्यानंतर एक छोटी पट्टी येते ज्यावर हा व्हिडियो म्हणजे खऱ्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा आधार घेत केलेले नाट्यरूपांतर आहे हे कळून येतं. खरं तर एवढा वेळ हा सगळा प्रसंग बघत असताना हे खरंच घडलं आहे, असंच वाटत असतं. पण हे नाट्यरूपांतर केलं असल्याचं जाणवतं आणि जीव भांड्यात पडतो. त्यामुळे यात सहभागी असलेल्या कलाकारांना सलाम. त्यांनी खरी घटना वाटावी असा अभिनय केला आहे. पण त्याचवेळेस हे सुद्धा जाणवतं की हे नाट्यरूपांतर असले तरी खऱ्या घटनांवर आधारित आहे असे म्हंटले आहे. तेव्हा ह्या अशा घटना कुठे तरी घडल्या असतील असे गृहीत धरले तर अशा घटना म्हणजे दुर्दैवच म्हणायला हवं.

ज्यांनी हा सगळा व्हिडियो प्रत्यक्षात आणला आणि समाजोपयोगी संदेश अधोरेखित करण्यासाठी त्यांनी आपली कला वापरली याबद्दल त्यांचं कौतुक. यापुढेही उत्तमोत्तम कामं त्यांच्याकडून होत राहावती यासाठी आमच्या टीमकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

हा व्हिडियो बघून आपल्या वाचकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे सुद्धा नेहमीप्रमाणे कळू द्या. जेणेकरून नवीन लेख लिहिताना आपण दिलेल्या काही सकारात्मक सूचना अंमलात आणता येतात. तसेच आम्ही करत असलेल्या कामासाठी आपलं प्रोत्साहन आवश्यक असतं जे या कमेंट्स मधून आम्हाला मिळतं. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत राहू देत आणि आपले स्नेहबंध अजून मजबूत होत राहू दे ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *