Breaking News
Home / मनोरंजन / हा व्हिडीओ पाहून तुमच्यादेखील डोळ्यांतून नकळत अश्रू येतील, एकदा बघाच

हा व्हिडीओ पाहून तुमच्यादेखील डोळ्यांतून नकळत अश्रू येतील, एकदा बघाच

आपण जगत असताना बऱ्याच गोष्टींचा सामना करत असतो. त्यात मागील दोन वर्षे तर इतकी कठीण गेली आहेत की काही विचारायला नको. कधी विचारही केला नव्हता असे एकेक अनुभव आपल्या गाठीशी आले आहेत. येत्या काळात पुन्हा असे अनुभव यायला नको असं वाटावं अशा ही घटना आपण अनुभवल्या असतील. पण याच काळात एक गोष्ट मात्र झाली. ती सगळ्यांच्याच बाबतीत झाली असणार. ही म्हणजे वेळप्रसंगी कोण कामास येतो हे अगदी चपखलपणे कळलं असणार.

कारण एरव्ही दुनिया भरच्या गप्पा मारणारे अनेक जण असतात. पण कामाला मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी कमी माणसं येतात. पण एक गोष्ट मात्र खरी, की वेळप्रसंगी कोणी ना कोणी उभं राहातंच. अगदी अनपेक्षित असे ही अनेक जण मदत करून जातात आणि असं काही घडलं की आपसूक शब्द आठवतात – देवाक काळजी !खरंय, त्यालाच काळजी आहे आपली म्हणायची. बरं आपल्याला जसे मदत करणारे माणुसकी दाखवतात तसेच अनेक जण हे भूतदया ही दाखवत असतात. आपण निदान मदत तरी मागू शकतो पण मुक्या प्राण्यांचे काय? पण काही जण ही यात ही अग्रेसर असतात.

वर उल्लेख झाला त्या काळात तर अनेकांनी गरिबांसोबतच अनेक प्राणी पक्षांना ही मदत केलेली आहे. किंबहुना आजही करत असावेत. काही जण तर दोन्ही काम एकत्र करताना ही दिसून येतात. याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून एका व्हिडियोचा घेता येईल. हा व्हिडियो आहे हिंगोली पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकी आणि भूतदया या दोन्ही गुणांचा ! हा व्हिडियो बहुधा मागील दोन वर्षांतील असणार अस वाटतं. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपले हे पोलीस अधिकारी एके ठिकाणी जमा झालेले दिसतात. जवळच एक वृद्ध काका असतात. त्यांच्याकडे जनावरांसाठी चारा विकायला ठेवलेला असतो असं दिसून येतं. आता या काकांना हे अधिकारी जागेवरून उठवतील की काय अस वाटत असताना एक अधिकारी स्वतःच्या खिशातून पैसे काढून त्या काकांना देतात. मग दुसरी एक व्यक्ती या काकांजवळील चारा पोलीस व्हॅन मध्ये ठेवताना आपण पाहतो. इथे या पोलीस अधिकाऱ्यांची माणुसकी दिसून येते. खासकरून लॉकडाऊन काळात हे घडलं असेल तर त्या काकांना एका अर्थी मदतच झाली असणार. असो. पुढे दिसणारं चित्रिकरण मात्र आपलं मन हेलावून सोडतं. हे अधिकारी हा सगळा चारा रस्त्यावरील गाईंना देत असतात.

वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गाईंना हे अधिकारी चारा देतात. प्रत्येक वेळी त्यांच्याविषयी असलेलं कौतुक वाढत जातं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही त्यांचं कौतुक वाटलं असणार आहे यात शंका नाही. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. कारण एरवी आपण नाना तर्हेचे व्हिडियोज बघत असतो आणि त्यात बहुतांश वेळा मनोरंजन हा उद्देश असतो. पण हा व्हिडियो त्यापलीकडे जातो. एक छान संदेश देतो. त्यामुळे यातून मिळणारा आनंद हा इतर वेळी मिळणाऱ्या आनंदापेक्षा वेगळा ठरतो हे नक्की. आपल्या टीमने तर याचा आनंद घेतला आहेच. तसेच यानिमित्ताने ‘देवाक काळजी’ हे ही पून्हा एकदा अनुभवता आलं आहे. असो.

आज काय लिहायचं, कसं लिहायचं यावर खलबत चालली होती. काही सुचेना ! बराच वेळ झाला पण काही नवीन डोक्यात येईना आणि सोशल मीडियावर काही सापडेना. पण मग अनुभवाचा वापर केला आणि आम्ही शांत झालो. थोड्या वेळाने पुन्हा सुरुवात केली आणि काही मिनिटांनी हा व्हिडियो नजरेस पडला. तेव्हाच वाटलं याविषयी लिहावं आणि आपल्या वाचकांना याविषयी सांगावं. आपली टीम सातत्याने जे जे चांगलं, सकारात्मक त्याविषयी लिहीत असते. आजचा हा लेखही त्याचाच एक भाग आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेखही वाचा. हा आणि ते सगळे लेखही आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. लवकरच एक उत्तम लेख आपल्या भेटीस येईलच याची खात्री असू द्या. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *