Breaking News
Home / जरा हटके / हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा ह्या शी’ख बांधवांना स’लाम कराल, माणुसकी अजूनही शिल्लक आहे

हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा ह्या शी’ख बांधवांना स’लाम कराल, माणुसकी अजूनही शिल्लक आहे

मराठी गप्पाच्या टीमचं आणि आमच्या वाचकांचं घट्ट असं नातं आहे. त्यामुळे आमच्या टीमने लिहिलेल्या बहुतेक सगळ्याच लेखांना आपला उत्तम प्रतिसाद मिळत असतो. आपल्या या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आमच्या लेखांमुळे आपलं काही घटका मनोरंजन होतं, मनाला विश्रांती मिळते हे आमच्या साठी महत्वाचं. त्याचमुळे आम्ही विविध विषयांवरील लेख आपल्या भेटीस आणत असतो. वायरल व्हिडियोज वरील लेख याच पठडीतले. या वायरल व्हिडियोज पैकी एक व्हिडिओ आमच्या टीमने नुकताच पाहिला. हा व्हिडियो पाहून यातील माणसांबद्दल आदर तर वाढलाच पण त्याचसोबत भूतदया कशा वेगळ्या प्रकारे दाखवता येऊ शकते हे सुद्धा कळले.

हा व्हिडीओ पंजाब हरियाणा भागातला असावा. या व्हिडियोमधील दोन व्यक्ती पंजाबी दिसत असल्याने तसे वाटते. हा व्हिडीओ सुरू होतो तेव्हा आपल्याला स्क्रीनवर फक्त सफरचंद दिसत असतात. मोकळ्या जागेतल्या एवढ्या या सफारचंदांचं होणार काय हा विचार येई पर्यंत याचं उत्तर मिळतं. व्हिडियोत दिसणारे दोन गृहस्थ आपल्या हातांनी ते बसलेल्या गाडीतील सफरचंद जमिनीवर फेकत असतात. हा काहीसा रानावनाचा भाग दिसून येतो. त्यामुळे जमिनीवर पडलेली सफरचंद घ्यायला वानरं पुढे येतात. सुरुवातीला त्यांची संख्या कमी असते. पण गाडी आणि हा व्हिडियो जसजसा पुढे जातो, तसतसे वानरांची संख्या वाढत जाते. एकदा दोनदा तर वानरांची टोळी थेट त्या गाडीतच घुसते काय असं वाटतं. पण सुदैवाने तसं काही होत नाही. गाडीत बसलेले दोन्ही गृहस्थ ती फळं खाली फेकत असतात. या वानरांच्या सोबतच काही गायीसुद्धा मध्ये मध्ये आपल्याला ही फळं खाताना दिसतात. हा केवळ एका मिनिटाचा व्हिडियो आहे. या एका मिनिटात या कितीतरी संख्येने असलेल्या मुक्या प्राण्यांना खायला घालण्यात ही जोडगोळी यशस्वी होताना दिसते.

आपल्याकडे मुक्या प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त केलं जातंच. खासकरून आपल्या संस्कृतीत अनेक सणांद्वारे हे प्रेम, प्राण्यांविषयी असलेली आपुलकी व्यक्त केली जाते. पण एरव्ही ही प्राण्यांविषयी असलेली ममता जेव्हा कोणत्याही सणाविना आपण माणूस म्हणून दाखवतो तेव्हा माणुसकी आणि भू’त’द’या मनात जपणाऱ्या अनेक साध्या पण मनाने मोठ्या व्यक्तींचे नकळत दर्शन होते. या व्हिडियोतील ह्या व्यक्तीही म्हणून कौतुकास पात्र ठरतात. त्यांच्या या कार्याला आमच्या मराठी गप्पाच्या टीमचा सलाम.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या वे’बसाई’टवरील इतर वायरल व्हिडियोज वरील उपलब्ध लेखही वाचायला विसरू नका. तसेच आमच्या वे’बसाई’टला तुमच्या फोन आणि कम्प्युटरवर बु’कमार्क नक्की करा. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *