Breaking News
Home / बॉलीवुड / हिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन

हिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन

बॉलिवूड मध्ये प्रत्येक वर्षी नवीन चेहरे येतात, परंतु जुन्या चेहऱ्यांची ओळख आणि व्यक्तिमत्त्वाला आव्हान ते देऊ शकत नाही. आजच्या काळात आलिया-जान्हवी-सारा सारख्या मोठ्या आणि सुंदर अभिनेत्री आहेत, परंतु आजचा काळ माधुरी, जुही, प्रीती, शिल्पा शेट्टी सारख्या अभिनेत्रींना विसरले नाही. तथापि सिनेमा क्षेत्रात परिस्तिथी प्रत्येकवेळी सारखी नसते. एके काळी काही अशा अभिनेत्रींनी वर्चस्व गाजवले आहे ज्यांनी आपल्या अभिनय आणि सुंदरतेचा जोरावर प्रेक्षकांना वेड लावले होते. परंतु आज त्या आपले अनामिक जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत जे हिट सिनेमा देऊन आज बॉलिवूड मधून कायमचे दूर गेल्या आहेत.

ममता कुलकर्णी
करण-अर्जुन सिनेमात आपल्या एका नृत्याने लोकांची मने जिंकणारी ममता कुलकर्णीचा प्रवास खूप लहान आहे. या सिनेमात तिने दोन्ही खान सोबत काम केले आहे आणि तिचे नावही खूप गाजले. परंतु ममताचा हा प्रवास जास्त दिवस चालला नाही. तिचा पहिला सिनेमा ‘अशांत’ १९९३ मध्ये आला. त्यानंतर १० वर्षापेक्षा खूप कमी काळ तिने सिनेमात काम केले ज्यात तिचे काही सिनेमे हिट झाले. तथापि ममता कुलकर्णी जास्त दिवस सिने क्षेत्रात टिकू शकली नाही.

नम्रता शिरोडकर
नम्रता सुद्धा बॉलीवूड मधील एक असा चेहरा आहे जिने काही हिट सिनेमा दिले आहेत. परंतु त्यानंतर बॉलीवूड मधून कायमची दूर गेली. नम्रता ने जब प्यार किसी से होता है, वास्तव, पुकार सारख्या हिट सिनेमात काम केले आहे, परंतु २००४ नंतर ती सिनेमात दिसली नाही. आज नम्रता साऊथचे सुपरस्टार महेश बाबू ह्यांची पत्नी आहे आणि आपल्या परिवारात व्यस्त आहे.

संदली सिन्हा
जर तुम्ही ‘तुम बिन’ हा सिनेमा पाहिला असेल तर संदली सिन्हा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या हृदयात वसली आहेत. या सिनेमाशिवाय तिने पिंजर,अब तुम्हारे हवाले वतन साथीयो सारख्या सिनेमात काम केले आहे. तथापि तिचा सोज्वळ चेहरा सिने क्षेत्रात जास्त दिवस नाही चालला. संदली तुम बिन २ मध्ये शेवटची दिसली, परंतु हा सिनेमा खास काही कमाल करू शकला नाही.

अनु अग्रवाल
९० च्या दशकात एक मोठा सुपरहिट सिनेमा आलेला आशिकी ज्यामध्ये त्या वेळच्या प्रेमवीरांची प्रेम करण्याची प्रस्तावना बदलून टाकली. या सिनेमा पासून अनु अग्रवालला खूप प्रसिद्धी मिळाली. अनु एका रात्रीत लोकांच्या नजरेत आली, परंतु नियती ने तिचे हे यश जास्त दिवस चालू दिले नाही. एका भयंकर अपघातात अनु अग्रवाल भयंकर जखमी झाली आणि २९ दिवसांपर्यंत कोमामध्ये गेली. या दरम्यान तिची स्मृती गेली आणि अनु एक भूतकाळ बनून राहिली. सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर सुद्धा आज ती एक अनामिक जीवन जगत आहे.

प्रिया गिल
सिर्फ तुम या सिनेमातून आपल्या करिअर मध्ये कीर्ती मिळवणारी प्रिया जास्त दिवस सिने क्षेत्रात टिकू शकली नाही. तिने आपल्या करिअर ची सुरुवात तेरे मेरे सपने पासून केली. परंतु २००१ मध्ये त्यांचा सिनेमातील प्रवास संपला. प्रिया शाहरुख सोबत जोश या सिनेमात हि दिसली,परंतु तिची जादू चालू नाही शकली. आजच्या काळात प्रिया कुठे आहे कोणालाच माहिती नाही.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *