Breaking News
Home / बॉलीवुड / हिट चित्रपट मध्येच सोडून गेले होते हे ४ कलाकार, बघा काय होते कारण

हिट चित्रपट मध्येच सोडून गेले होते हे ४ कलाकार, बघा काय होते कारण

सिनेसृष्टी मधे काम करायला मिळणं हि एक मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला या झगमगत्या दुनियेविषयी सुप्त आकर्षण असतं. काही जण याच उत्सुकतेपाई, आवड म्हणून इथे काम मिळवायला बघतात. पण खरी गम्मत इथेच आहे. काम मिळवायला जशी स्वतःमध्ये कला असणं आवश्यक आहे. तशीच, नशिबाची साथ सुद्धा आवश्यक आहे. अभिनेते अन अभिनेत्रींचच घ्या ना. अनेक वेळेस एखादा रोल मिळूनही त्यात काम करायला मिळत नाही, किंवा रोल सुरुवातीला आवडत नाही आणि तोच रोल पुढे लोकांमध्ये लोकप्रिय होतो. हे केवळ नवख्या कलाकारांच्या बाबतीत होतं अस नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांच्या बाबतीत होतं. खाली दिलेली उदाहरणं वाचा मग खात्री पटेल.

१. करीना कपूर

कपूर घराण्यामधील एक नावाजलेली अभिनेत्री. तिचा ‘जब वी मेट’ मधला रोल तर अफलातून प्रसिद्ध आहे. आपण तिला अनेक चित्रपट आणि जाहिरातीतूनही पाहतो. बॉलिवूडमधील ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. तिचा ‘कभी ख़ुशी कभी गम’ मधला ह्रितिक रोशन बरोबरचा रोल आठवा. चुलबुली व्यक्तिरेखा तिने किती सहज साकारली होती. पण, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, कि ह्रितिक आणि करीना खरं तर एका वेगळ्याच चित्रपटासाठी एकत्र काम करणार होते. कोणता? अहो, ‘कहो ना प्यार है’. बसला ना धक्का. जर करीनाने हा सिनेमा केला असता, तर आजच्या दोन आघाडीच्या कलाकारांनी यात पदार्पण एकत्र केलं असतं. पण काही कारणांमुळे ते होऊ शकलं नाही. आणि करीनाच्या जागी, अमिषा पटेल ची निवड झाली. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहेच.

2. आलीया भट

आजच्या तरुणाईमधे कोणाची सगळ्यात जास्त क्रेझ असेल तर ती आहे ‘आलीया भट’. तिचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ पासून ते आज पर्यंतचा यशस्वी अभिनेत्रीचा प्रवास तिच्या प्रगतीच्या आलेखाची जाणीव करून देतो. सुरुवातीला केवळ गोड गोड वाटणारऱ्या आलियाने पुढे अभिनयासाठी समीक्षकांची वाहवा मिळवली. आज अनेक अग्रगण्य ब्रँड तिच्या या यशामुळे तिला आपल्या बरोबर करारबद्ध करत आहेत. तसेच तिने सुद्धा आपली गुंतवणूक केली आहे. तर अशा या आलियाने मात्र, ‘राबता’ या २०१७ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटासाठी नकार दिला होता. आणि तिच्या जागी क्रीती सॅनन ने स्वर्गीय सुशांत सिंघ राजपूत याच्या बरोबर सिनेमा मधे काम केलं होतं.

३. ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन म्हटलं कि देखणं सौंदर्य आणि तेवढाच ताकदीचा अभिनय आठवतो. मॉडेल म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या ऐश्वर्याने पुढे आपल्या अभिनयाने सिने सृष्टी गाजवली आहे. तिच्या अभिनय गुणांमुळे तिने अनेक मोठ मोठ्या नटांबरोबर काम केलं आहे. त्यात अगदी तिचे सासरेबुवा म्हणजे आपले लाडके अमिताभ बच्चन साहब आहेतच आणि शाहरुख खान पण आहेत. पण असं असलं तरीही तिने एका चित्रपटात काम करण्यास नकार दिला, ज्यात शाहरुख खान होते. तो चित्रपट होता, ‘चलते चलते’. या चित्रपटाच्या वेळी, सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्या मधे भरपूर वाद झाले आणि विकोपाला गेले आणि म्हणूनच तिने या सिनेमा मधून आपला सहभाग काढून घेतला होता. पुढे राणी मुखर्जी हिने हि भूमिका बजावली. तिच्या अभिनयाचं आणि भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आणि चित्रपटहि लोकप्रिय झाला.

४. रणबीर कपूर

आजच्या घडीचा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत म्हणजे रणबीर कपूर. ‘रॉकस्टार’ असो वा ‘संजू’, रणबीर आपली छाप पाडतोच. त्याचा मनमिळावू स्वभाव प्रेक्षकांना जसा ऑफ स्क्रीन भावतो तसाच त्याची व्यक्तिरेखा साकारण्याची समर्पित वृत्ती त्याला यशस्वी करते. पण अस म्हणतात कि रणबीरला, ‘जोधा अकबर’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कि ह्रितिक रोशन या चित्रपटा मधे मुख्य भूमिकेत झळकला आणि सोबत ऐश्वर्या राय बच्चन सुद्धा होते. आशुतोष गोवारीकरांचा हा चित्रपट त्याच्या भव्यतेसाठी आणि कलाकारांच्या दमदार कामामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिला आणि वाखाणला गेला.

 

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.