Breaking News
Home / मराठी तडका / हि आहे पश्याची खऱ्या आयुष्यातली अंजी, गेला महिन्यातच झाला साखरपुडा

हि आहे पश्याची खऱ्या आयुष्यातली अंजी, गेला महिन्यातच झाला साखरपुडा

आपल्या सगळ्यांना टीव्ही वरील मालिका, रियालिटी शोज बघायला आवडतात हे आपण जाणतोच. त्यातही वैविध्यपूर्ण विषय घेऊन या कलाकृती आपल्या समोर येत असतील तर त्यांना अजून लोकप्रियता मिळते. पण अस असलं तरी कौटुंबिक मालिका वा रियालिटी शोज, यांच्या विषयी जे आपल्या मनात ममत्व आहे, ते कायम आहे. किंबहुना या कलाकृतींमधले कलाकार हे अगदी आपल्या घरातील कधी होऊन जातात हे कळत ही नाही. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा आपल्यावर ही परिणाम होतो.

त्यांना जर का कशाचा त्रास झाला तर आपल्याला वाईट वाटतं. तसंच त्यांच्या आयुष्यात एखादी चांगली बातमी असेल तर आपल्याला ही आनंद होतो. किंबहुना बातमी जेवढी मोठी, तेवढा आनंद ही मोठा असतो. आणि मग आपसूक त्या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. असंच काहीसं आकाश नलावडे या आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या बाबतीत घडलेलं आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील, ‘पशा’ या भूमिकेत गाजणारा हा तरुण अभिनेता नुकताच एका गोड बंधनात अडकला आहे. गेल्या महिन्यात १५ मे या दिवशी आकाश आणि त्याची बऱ्याच काळाची मैत्रीण, रुचिका धुरी यांचा साखरपुडा संपन्न झाला.

रुचिका या सुद्धा आकाश सारख्या कला क्षेत्राशी निगडित आहेत. तसेच आकाशच्या या कलाप्रवासात त्यांनी नेहमीच त्याची साथ दिली आहे. सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील त्याच्या या दोन वर्षांच्या प्रवासात तर ही साथ अगदी ठळकपणे जाणवते. अर्थात आकाश ही तितक्याच तन्मयतेने प्रत्येक भूमिकेसाठी मेहनत घेत असतो. पशा हे त्याचं प्रातिनिधिक आणि ताजं उदाहरण होय. याआधीही त्याने अनेक कलाकृतींमधून काम केलेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिकेत त्याची महत्वपूर्ण भूमिका होती. तसेच अनेक जाहिरांतीत ही तो चमकला आहे. त्यात लोकसत्ता सारख्या प्रतिष्ठित नांमुद्रांचा समावेश ही आहे. तसेच अनेक नाटकांतून ही त्याने काम केलेलं आहे. खासकरून ‘ललित कलाकेंद्र’ येथे अभिनयाचं बाळकडू घेत असताना त्याने अनेक नाटकांतून अभिनय केलेला आहे. ‘रिकामी आगपेटी’ ,’मिड समर, नाईट ड्रीम’ ही त्यातली काही प्रातिनिधिक उदाहरणं होत.

एकंदरच काय तर या सगळ्या अभिनयाच्या तालमीतून तावून सुलाखून निघालेला आकाश, आता पशा म्हणून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतो आहे. म्हणूनच त्याच्या आयुष्यातील ही गोड बातमी सगळ्यांनाच आनंदित करून गेली आहे आणि या जोडीवर आता शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. यात आमच्या टीमच्या शुभेच्छा ही सामील आहेतच. आमच्या संपूर्ण टीमकडून आकाश आणि रुचिका यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपल्याला आयुष्यातील सगळी सुखं मिळोत ही सदिच्छा !

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *