ही टेक्नोलॉजी भारताच्या बाहेर गेली नाही पायजे. व्हीडिओ बघितल्यावर लगेचच डिलीट करा. असलं तंत्रज्ञान भारताबाहेर गेलं तर लोकं तात्याला सोडणार नाहीत. सिगरेटनं रॉकेट लॉन्च करणारं तात्या जर का नासानं बघितले ना तर तात्याचं काय खरं नाही. जाऊन असले असले प्रयोग करतील ना तात्यावर की तात्याचं रॉकेट कवाबी उडायचं बंद व्हईल. तात्याच्या याच कारनाम्यामुळं यांच्या वरच्या माळ्यावरच्या खोल्या विकल्या जात नाहीत. दिवसभर सिगरेटी वडत बसतोयं आणि रात्रं झाली की, असं रॉकेट लॉन्च करत बसतो. बरं तात्याचा गिअर नॉर्मल आसलं तर काय खरं नसतं. एक पाकीट सिगरेट आणि बरोबर १२ रॉकेट फोडायची फिक्स असत्याती. तात्याच्या या वागण्याला लागून लोकांनी बाहेर कपडे वाळत घालणं बंद केल्याती. परवा एकाच्या अंडर पँटला भोक पाडलंयं तात्यानं नको त्या ठिकाणी. पण माणसानं एवढं खतरो के खिलाडी बनून एखाद्या छोट्या मोठ्या अक्षय कुमार सारख्या सेलिब्रिटीच्या पोटावर लाथ कशाला मारायची मी म्हणतो. गप आपलं सिगरेट प्यावी आणि गप बसावं ना. पण नाही आम्हाला रॉकेट सोडून दुसऱ्यांच्या पँटला भोकं पाडायची आहेत.
एकदा वर राहणारी भाभीच तात्या या माणसा सोबत भांडण करायला आली. भोजपूरीत शिव्या घालू लागली. वहिनीला कळलंच नाही. भाभी एवढ्या तावातावाने का कावलीयं दादावर. भाभीनं वहिनीला हात धरुन आत नेलं. तात्याच्या करामती दाखवल्या. तात्यांच्या याच सगळ्या भलत्या सलत्या गोष्टींमुळं गावातली लोकं पार त्रासली हायत. तात्या बाहेर दिसला तर लोकं पाऊस आल्यासारखं दोरीवरचे कपडे काढून आत घेऊन जात. सगळ्या कपड्यांना काकांनी रॉकेट लॉन्च करुन करुन ठीगळं पाडलेली असतात. को’रोनाच्या काळात लोकं जेव्हा घंटानाद आणि थाळी नाद करत होती, तेव्हा ह्यो बाबा तर रॉकेटला मेणबत्या पेटवून पेटवून वर उडवत होता. एकाचं तर शेतचं पेटवून दिलं. त्याच्या या सगळया करामतींना कंटाळून लोकं गावाला निघून गेली. या माणसाला वैतागून अर्धी माणसं पुन्हा परत यायलाच मागनात. दिवाळीला लोकं फटाके वाजवण्यासाठी बाहेर पडनात. आलं तर त्यांच्याशी शर्यत लावतो हा माणूस. बीडीनं रॉकेट उडवायची. म्हतारी, कोतारी कुणीच बघत न्हायं, पोरांच्या चड्डीतच रॉकेट सोडलं या पोरानं. काय सांगावं. एकदा काय झालं या माणसाचा कंटाळाला आला म्हणून गावातली म्हातारी मंडळींची मिटींग झाली. मिटींगमध्ये ठरलं याचा बंदोबस्त करायचा. याला धडा शिकवायचा.
गावातील फटाक्याच्या दुकानातून याला फटाके द्यायचेत नाहीत. आणि रॉकेट तर संपलेच म्हणून सांगायचं. फटाके वाल्याला ताकीद देऊन ठेवली होती. तो बी तयार झाला. का कारण त्याचीही वेगळी स्टोरी हाय. या माणसानं काय केलं. एकदा रॉकेटलचं बंडल खरेदी केलं आणि लागला तिथंच सोडायला. झपाझप एक एक रॉकेट. बीडी ओढली आणि लावली ना तिथल्या तिथं सटासट 10 – 12 रॉकेट सोडली. बघता बघता एक रॉकेट गेलं ना फटाक्याच्या दुकानात. अख्या दुकानाला लावली की यानं आ’ग. आत्ता करायचं काय. लोकं याला माल विकायला बी धजावत नसतं. पार दूर दूर वरुन जाऊन रॉकेट घेऊन येई हा माणूस. पुढं गावानं ठरवलं. की, याला रॉकेट मिळूच द्यायच नाही. तरीबी कुठून पण रॉकेट शोधून काढायचाच. आता याचं करावं काय पण माणूस तेवढाच चिवट होता. ऐकेनाच. बरं ते नासा वाल्यांच ठिक हाय. त्या एलन मस्क भावाच्या तावडीत हा सापडला ना तर त्याला खऱ्याखुऱ्या रॉकेटला बांधेल तो माणूस म्हणून गावातल्यांनी त्याला लपवून ठेवलायं.
बघा व्हिडीओ :