Breaking News
Home / जरा हटके / हि दीड वर्षाची मुलगी सेकंदात देते अवघड प्रश्नांची उत्तरे, बघा वायरल व्हिडीओ

हि दीड वर्षाची मुलगी सेकंदात देते अवघड प्रश्नांची उत्तरे, बघा वायरल व्हिडीओ

अभ्यास आणि त्यातल्या विविध गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हंटलं की अनेक शालेय मुलांची नाकं मुरडतात. त्यात भूगोल, इतिहास, कविता यांच्या सारखे विषय असले तर अजूनच कंटाळा. पण काही मुलं मात्र यात अगदी तरबेज असतात. त्यांना सगळं अगदी लक्षात राहतं. जणू काय सदानकदा समोर पुस्तकंचं आहे. त्यांच्या स्मरण शक्तीमुळे हे घडू शकतं. त्यांच्या स्मरणशक्तीवरून आपण त्यांना एकपाठी, द्विपाठी म्हणू शकतो. पण ही तर शाळेत जाणाऱ्या मुलांची गोष्ट झाली. अवघ्या दीड वर्षांच्या मुलीने हे केलं तर. अर्थातच अचंबित व्हायला होईल. पण असंच काहीसं काही वर्षांपूर्वी झालं होतं. हा व्हिडीओ आमच्या टीमच्या नजरेस पडला आणि त्यावर हा लेख लिहायचं ठरलं.

या मुलीचं नाव आहे, अद्विका बाले. केवळ दीड वर्षांची असताना तिच्याबद्दल एक बातमी, एका प्रथितयश वृत्त वहिनीने केली होती. यात त्या मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी मुलाखत दिली होती. त्यावेळी या मुलीला विविध देशांची चलनं, विविध स्थळं, भारतातील विविध स्थळांची माहिती, प्राणी पक्षी यांची मराठी इंग्रजी नावे असल्याचं सांगितलं होतं. वृत्त निवेदकांनी तिला काही प्रश्नही विचारून पाहिले. आपल्या बोबड्या बोलांनी तिने त्यांची उत्तरे दिली. ऑपेरा हाउस, ग्रेट वॉल, आयफेल टॉवर कुठे आहेत हे विचारले असता अगदी योग्य उत्तरे आली. तिची उत्तरे ऐकून, प्रेक्षकही अचंबित झाले. ही उत्तरे देत असताना, तिची चिकित्सक वृत्ती दिसून येत होती. वृत्त निवेदक यांच्या हातात असलेला माईक काय आहे हे जाणून घायची तिला उत्सुकता होती. वृत्तनिवेदक आणि आईला तिने वारंवार याविषयी विचारलं. यावरून तिच्या सातत्याने नवनवीन गोष्टींचे अवलोकन करण्याची वृत्तीची ओळख होते. तसेच तिच्या पालकांनीही तिची स्मरण आणि आकलन शक्ती पाहून तिच्या साठी विविध पुस्तकं आणल्याची माहिती दिली. त्यामुळे उत्तम आकलन शक्ती असलेल्या अद्विकाच्या कुशाग्र बुद्धीला चालनाच मिळाली, असं आपण म्हणू शकतो.

तिच्या प्रमाणे अनेक लहान मुलं काही ना काही विशेष गुण असलेली असतात. त्यांचं संगोपन तसं झालं तर त्यांच्या या गुणांना वाव मिळतो. काही काळापूर्वी मराठी गप्पाच्या टीमने एका वायरल व्हिडियो वर लेख लिहिला होता. यात प्राणी, पक्षी यांचे हुबेहूब आवाज काढणाऱ्या एका लहान मुलाबद्दल लिहिलं होतं. आपण तोही लेख वाचू शकता. वर उपलब्ध असेलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन ‘वायरल’ असं लिहून सर्च करा. तुम्हाला तो लेख मिळेल आणि इतर लेखही मिळतील जे आमच्या टीमने आपल्या सारख्या नियमित वाचकांसाठी आणले आहेत. आपल्या अमूल्य वेळासाठी धन्यवाद !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.