Breaking News
Home / बॉलीवुड / हि मराठमोळी अभिनेत्री बनली होती राजकुमारी उत्तरा, अक्षय कुमार सोबत केले आहे काम

हि मराठमोळी अभिनेत्री बनली होती राजकुमारी उत्तरा, अक्षय कुमार सोबत केले आहे काम

भारतात ह्या वेळी लोकं कोरोना संकटाशी लढत आहेत, ज्या कारणामुळे पूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशामध्ये टेलिव्हिजनमध्ये पुन्हा एकदा ‘रामायण’ सीरिअल सोबत ‘महाभारत’ प्रसारित होत आहे. महाभारतसुद्धा प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. महाभारत विषयी अनेक मनोरंजक किस्से ऐकायला मिळत आहेत. ह्या गोष्टीत काहीच शंका नाही कि लॉकडाऊनने ८० च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आहे. आजपर्यंत आपण घरातील मोठ्या व्यक्ती, वृद्ध ह्यांच्याकडून महाभारत-रामायण ह्या बद्दल केवळ ऐकत आलो होतो, ह्या लॉकडाऊनमुळे आता आपल्याला ते पाहायलासुद्धा मिळत आहे. रामायण आणि महाभारत बद्दल लोकांमध्ये इतकी क्रेज आहे कि, शो बद्दल निगडित प्रत्येक कलाकारांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. महाभारत मध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी मुख्य भूमिका निभावल्या होत्या. त्यापैकीच एक होती राजकुमारी उत्तराची भूमिका निभावणार मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर. आजच्या लेखात आम्ही वर्षा उसगावकर बद्दल सांगणार आहोत, जे छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावर सुद्धा अभिनेत्री राहिली आहे.

वर्ष उसगावकर लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री आहे. हिंदी पेक्षा जास्त त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ओळखले जाते. वर्षा बीआर चोपडा ह्यांच्या ‘महाभारत’ मध्ये राजकुमारी उत्तराच्या भूमिकेत दिसून आली होती. ती राजकुमार अभिमन्यू ची पत्नी बनली होती. काही दिवसांपूर्वीच वर्षाने ट्विटरवर महाभारत सीरिअलच्या काळातील एक फोटो शेअर केला. ह्या फोटोद्वारे तिने आपल्या जुन्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला आहे. फोटोमध्ये ती राजकुमारी उत्तराच्या वेशात दिसत आहे. वर्षाच्या ह्या जुन्या फोटोला पाहून तुमच्या सुद्धा महाभारतातील आठवणींना उजाळा मिळेल. शेअर केलेल्या ह्या फोटोत वर्षा आलिशान कॉस्ट्यूम मध्ये दिसून येत आहे. ह्या फोटोत ती खूप सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करताना वर्षाने लिहिले कि, “महाभारतात उत्तरा च्या भूमिकेमध्ये”. जर अभिनय कारकिर्दीबद्दल बोलाल तर वर्षा ने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत वर्षा उसगावकर हे नाव लोकप्रिय अभिनेत्री सोबतच ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून घेतले जाते. वर्षाने अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केले. लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे ह्यांच्यासोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘हमाल दे धमाल’, ‘गंमत जंमत’, ‘शेजारी शेजारी’, ‘अफलातून’, ‘एक होता विदूषक’ ह्यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये तिने आपल्या अभिनयाची कमाल दाखवली.

जर बॉलिवूड करियर बद्दल बोलाल तर, बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय चित्रपटात ती दिसून आलेली आहे. हिट चित्रपटात काम करूनही ती ह्या हिंदी चित्रपटसृष्टीत जास्त लोकप्रिय होऊ शकली नाही. वर्ष हिट चित्रपटांचा भाग होऊनही ती लाईमलाईटपासून खूप दूर झाली. वर्षाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘इन्सानियत का देवता’ हा होता. ह्यामध्ये ती इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार रजनीकांत, जया प्रदा, विनोद खन्ना ह्यांच्या सोबत दिसून आली होती. ह्याशिवाय तिने ‘तिरंगा’, ‘खल-नायिका’, ‘दूध का कर्ज’ ह्यासारख्या अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलेले आहे. तरीसुद्धा वर्ष आपली बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख बनवू शकली नाही. वर्षा अक्षय कुमार सोबत ‘ह त्या’ चित्रपटात दिसून आली होती. परंतु खूप काळ हा चित्रपट रखडून राहिला होता. ह्यानंतर २००४ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला, परंतु बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर वर्षा ने बॉलिवूड इंडस्ट्री जवळजवळ सोडून दिली. ह्यानंतर ती फक्त मराठी चित्रपटांत दिसून आली.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *