मराठमोळी अभिनेत्री, छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘मे आई कम ईन मॅडम’ आणि सलमान खानचा रियालिटी शो बिग बॉस 12 मधील कंटेंस्टन्ट नेहा पेंडसे बरेच दिवस तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंह सोबत डेट करीत असल्यामुळे चर्चेत आहे. नेहाने या वर्षी ऑगस्ट मधे शार्दुल सिंह बरोबर साखरपुडा केल्यावर तिच्या लग्नाची चर्चा खूप दिवसांपासून होत होती. नेहा पेंडसेने नुकताच आपला ३५ वा वाढदिवस साजरा केला आणि त्याच दिवशी तिने आपल्या विवाहा संबंधी भाष्य केलं. तिने आपल्या लग्ना विषयी मोठा खुलासा केला. नेहा पेंडसेने आत्ता आत्ताच एक इंग्रजी वेबसाईट बॉलिवूड लाईफला मुलाखत दिली. यावेळी तिने करीयर व्यतिरिक्त आपल्या वैयक्तिक जीवनाविषयी बरेच खुलासे केले. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना ती येत्या 5 जानेवारीला शार्दुल सिंह बरोबर लग्न करणार आहे, हेही स्पष्ट केले. लग्ना बद्दल आणखी बोलताना ती म्हणाली, लग्न पुण्यात होईल आणि लग्ना साठी फक्त नातेवाईक आणि जवळचा मित्र परिवार असेल.
तिने आपल्या लग्ना विषयी जास्त माहिती दिली नाही. सोशल मीडियावर नेहा पेंडसेने शार्दुल सिंह सोबतचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती शार्दुल सिंह सोबत दिसत आहे. त्या फोटोत नेहा आणि शार्दुल एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. आणि त्या मधे नेहाच्या हातात हिऱ्याची अंगठी दिसत होती, यावरून अंदाज लावत होते की त्या दोघांचा साखरपुडा झाला असावा. त्याच बरोबर काही सूत्रांनुसार असंही कळतेय कि, नेहाने साखरपुड्याच्या बातमीला नकार दिला. नेहाच्या होणाऱ्या नवऱ्या विषयी बोलाल तर शार्दुल एक व्यावसायिक आहे. आणि त्यानेही सोशल मीडियावर च्या आपल्या अकाउंटवर हाच फोटो शेयर केला होता आणि लिहिले होते, “Happily Engaged”.जेव्हा लोकांनी यांना शुभेच्छा द्यायला सुरूवात केली तेव्हा त्याने पोस्ट बदलून लिहिले, “Happily In Love”. शार्दुलच्या कुटुंबा सोबत नेहाचे चांगले जुळते. शार्दुल सतत नेहा सोबतचे फोटो शेयर करतो. नेहाने दूरदर्शन वरील शो ‘कॅप्टन हाऊस’ मधून पदार्पण केले. त्यानंतर ती झी टीवीचा शो ‘हसरते’ मधे दिसली. त्यानंतर तिने अनेक चित्रपट सीरिअल्स केले. ‘बाळकडू’ चित्रपटातून ती मराठी चित्रपटरसिकांमध्ये लोकप्रिय झाली. टीव्ही सिरियल ‘मे आई कम इन मॅडम’ या शो मुळे ती खूप प्रसिद्ध झाली. त्याच बरोबर नेहा रियालिटी शो बिग बॉस 12 मधे स्पर्धक म्हणून झळकली. नेहाने मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड चित्रपटांत काम केले आहे.