Breaking News
Home / मराठी तडका / हि लोकप्रिय मराठी जोडी लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले केळवणाचे फोटो

हि लोकप्रिय मराठी जोडी लवकरच अडकणार विवाहबंधनात, शेअर केले केळवणाचे फोटो

मराठी गप्पाच्या वाचकांसाठी आमच्या टीमने नवनवीन आणि ताज्या बातम्या नेहमीच आणल्या आहेत. सध्या जसजसं लॉकडाऊन शिथिल होत चाललं आहे, तसतसं लग्न समारंभ सोहळे पार पडत आहेत. सामान्य जनतेसोबतच आता सेलेब्रिटी मंडळी सुद्धा लग्न उरकून घेऊ लागली आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सई लोकूर, कार्तिकी गायकवाड, शाश्वती पिंपळीकर ह्यासारख्या मराठी कलाकारांनी लग्न केलीत. त्यात अजून एका बहुप्रतिक्षित बातमीची भर पडते आहे. एक लोकप्रिय मराठी जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या जोडीविषयी आपण सातत्याने मराठी गप्पावर लेख वाचले आहेतच.

ही जोडी आहे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची. गेल्या काही लेखांमध्ये मराठी गप्पावरून सातत्याने मिताली आणि सिद्धार्थ या जोडीच्या साखरपुड्याची बातमी वाचली असेलच. त्यात त्यांना या वर्षी धुमधडाक्यात लग्न करायचं होतं, पण करोना ने अडथळा आणला आणि म्हणून पुढील वर्षी ते लग्न करतील असं वाचलं असेलंच. त्यांच्या चाहत्यांनाही असं वाटत असताना, त्यांच्या केळवणाचे फोटोज समोर आले आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या जोडीच्या आनंदात त्यांचे अनेक चाहते सामील झाले आहेत. गेले दोन ते तीन वर्षे मिताली आणि सिद्धार्थ हे रिलेशनशिप मध्ये होते हे सगळ्यांना महिती होतंच. किंबहुना, त्यांच्या दोघांचा एकत्र असा एक चाहतावर्ग तयार झाला होता. त्या दोघांनी त्यांच्या भटकंतीचं चित्रीकरण दाखवणारं एकत्र एक इन्स्टाग्राम अकाउंट ही तयार केलं होतं, त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती यावी. त्या दोघांची एकत्र असलेली केमिस्ट्री, एकत्र फिरतानाचे फोटोज मधून दिसणारं प्रेम, खट्याळपणा हा त्यांच्या चाहत्यांना भावतो. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांच्या केळवणाच्या फोटोजमुळे खूप खुश झाले आहेत.

हे फोटोज शेअर करत असताना, दोघांनीही त्यांच्या स्वभावाला साजेसे असे खट्याळ कॅप्शन्स दिले आहेत. ज्यात ‘Entering the ‘घोडमैदान” असं कॅप्शन मिताली हिने दिलं आहे. तर ‘Game On’ असं कॅप्शन सिद्धार्थ याने दिलं आहे. या दोघांच्या फोटोजवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. यात त्यांच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीजही सामील झाले आहेत. यात अमृता खविलकर हिने ‘गोड दिसतायत यार दोघं…. टचवूड’ ही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रिया बापट, अमृता खानविलकर, रसिका सुनील, प्रार्थना बेहरे, मृण्मयी गोडबोले, सुखदा खांडेकर यांनी ही या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोज सोबतच सिद्धार्थ आणि मिताली यांनी आपल्या मित्रांचे फोटोजही शेअर केले आहेत. या फोटोमधून ज्यांनी ज्यांनी या जोडीचं केळवण केलं त्यांना धन्यवाद दिले आहेत. या फोटोत कलाक्षेत्रातील क्षितिज पटवर्धन, आरती वडगबाळकर, सुयश टिळक हे दिसून येत आहेत. मराठी गप्पाची संपूर्ण टीमसुद्धा या जोडीच्या आनंदात सहभागी आहे. येत्या नवीन वर्षात ही जोडी विवाह बंधनात अडकेल त्या निमित्ताने, आमच्या टीमकडून या जोडीला त्यांच्या येत्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *