Breaking News
Home / जरा हटके / हि ८० वर्षाची आजी आजही विकते इडली, गिऱ्हाईकांची गर्दी असूनही इडलीची किंमत फक्त

हि ८० वर्षाची आजी आजही विकते इडली, गिऱ्हाईकांची गर्दी असूनही इडलीची किंमत फक्त

सकाळी 6 वाजता सांभारच्या छान वासाबरोबर घराचे दरवाजे उघडतात आणि गिराहीक लाइन लाऊन बसतात. वडाच्या पानावर गरमा गरम इडली सांभारच आनंद घेतात. तेही फक्त 1 रुपयात! तामिळनाडूतील वडिवेलम्पलयम गावामध्ये कामलाथल दुकान सांभाळतात. वय 80 वर्षे आणि इडलीची किंमत 1 रुपया. कामलाथल आज सुद्धा त्यांच्या वयाच्या महिलांपेक्षा तुंदुरुस्त आहेत. त्यांच्या जीवनाचे लक्ष म्हणजे जनतेला स्वस्थ आणि पोटभर जेवण तयार करून देणे हेच आहे. 80 वर्षाच्या कामलाथल ह्यांची सुरुवात सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर होते. त्या अंघोळ झाल्यानंतर मुलाबरोबर शेतावर जातात. तेथे भाजी, नारळ, मीठ आणि चटणीसाठी मसाले ठेवलेले आहेत. कामाची सुरवात भाजी कापण्याने करते, ज्याचा वापर सांभार बनवण्यासाठी केला जातो.

सांभार चुलीवर चढवल्यानंतर कामलाथल चटणी तयार करतात. इडली बनवण्यासाठी सामानाची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवतात. सकाळी 6 वाजताच घराचे दरवाजे उघडतात. ग्राहक शेडच्या खालीबसून एक रुपयाच्या इडली-सांभार आणि चटणीचा आस्वाद घेतात. येथे येणारे बहुतेक ग्राहक रोज येणारे असतात. कमलाथल म्हणतात याची सुरुवात 30 वर्षापूर्वी झाली. मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. सकाळी सकाळी घरातील माणसे शेतात जात असत आणि मी एकटी पडायची. तेव्हा इथल्या लोकांसाठी इडली बनवण्याचा विचार आला. सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या कामगारांसाठी इडलीचे छोटेसे दुकान सुरु केले ज्यामुळे त्यांना कमी पैश्यात असे खायला मिळेल, जे त्यांना तुंदुरुस्त ठेवेल.

त्या वडिलोपार्जित पद्धती नुसार इडली बनवतात. कामलाथल इडली बनवण्यासाठी जुन्या पारंपरिक भांड्यांचा वापर करतात. मसाला वाटण्या पासून ते नारळाची चटनी वाटण्याचे काम दगडाच्या पाट्यावर करतात. त्यांचे म्हणणे आहे कि मी जॉईंट फॅमिली मधून आहे आणि अनेक लोकांसाठी अन्न बनवणे माझ्यासाठी कठीण काम नाही आहे. इडली बनवण्याची तयारी मी एक दिवस अगोदरच पासून करायला घेते. रोज दगडावर १६ किलो तांदूळ आणि डाळ वाटते. ते पूर्ण फुलावे म्हणून ते रात्रभरासाठी ठेवावे लागते. इडली बनवण्यासाठी रोज नवीन सामग्रीचा वापर करते. दुकान सकाळी 6 वाजल्या पासून दुपार पर्यंत चालू असते.
१० वर्षाअगोदर पर्यंत एका इडलीचे किंमत ५० पैसे होते. ज्याला नंतर वाढवून १ रुपये केले गेले. इडली संभारला पानांवर वाढले जाते जे त्यांच्या शेतीतूनच आणले जाते. येथे येणारे अनेक ग्राहक हे कामगार वर्गातले आहेत ज्यांच्यासाठी रोज 20 रुपये खर्च करणे थोडे मुश्किल आहे. एका वेळी भांड्यात 37 इडली बनतात. रोज 1000 ( एक हजार ) इडली बनतात.

 

कमलाथल म्हणतात कि रोज दुकानावर येणारे लोक पोटभरून इडली खाऊ शकतील हे माझ्यासाठी ध्येयसारखं आहे. ह्यासाठी मी इडलीची किंमत 1 रुपये ठेवली आहे. ते आपल्या पैश्यांची बचत करण्याबरोबर पोट सुद्धा भरू शकतात. दिवसभराच्या दुकानदारीने मी 200 रुपये कमावतात. अनेकांचे म्हणणे आहे कि मी इडलीची किंमत वाढवायला हवी. परंतु माझ्यासाठी लोकांचे पोट भरणे आणि गरजवंताची मदत करणे प्रथम कर्तव्य आहे. मी भविष्यात कधीही ह्याची किंमत वाढवणार नाही. तामिळनाडू मध्ये एक इडली5 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत मिळते. इथे रोज येणारे एक ग्राहक गोपी किशन ह्यांचे म्हणणे आहे कि माँ आजसुद्धा इडली बनवण्यासाठी गॅसचा नाही तर चुलीचा वापर करतात आणि मसाले दगडावरच वाटतात. जेव्हा मी येथे इडली खायला येतो तेव्हा वाटते कि माझी आईच मला भरवत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.