तंद्री लागणं हा मानवी स्वभावाचा स्थायी गुण आहे. मात्र, तंद्रीमुळं एखाद्याचा जीव जाऊ शकतो असं कधी पाहिलंय का?, पण या माणसाने ते या अगदी कुठच्या थराला जाऊन अनुभवलंयं ते एकदा पहाचं. भर रस्त्यावर सुस्साट धावणाऱ्या गाड्या, कुणी चिटपाखरुही यामध्ये जाण्याची हिंम्मत करणार नाही. सहाजिकच आपणहून कोण मृत्यूच्या दाढेत जाईल. इतर कुठल्याही महामार्गावर सुरू असेल तशीच वर्दळ इथेही सुरू होती. दोन दुचाकी विरुद्ध दिशेने गेल्या आणि रस्ता काही क्षणासाठी का होईना मोकळा झाला. इतक्यात समोरुन भरधाव वेगानं एक भला मोठा ट्रक येत होता. इथपर्यंत सारंकाही ठिक सुरू होतं अचानक व्यक्तीच्या मागूनही अशाच वेगात एक टेम्पो आला. त्या व्यक्तीला आपण रस्त्यावर चालण्याचे भानही नव्हते. रस्त्यावरुन महामार्ग असला तरीही दोन वाहने समोरासमोर आली तर नियंत्रण सुटल्यास निश्चितच धडकतील, अशा प्रकारचा हा मार्ग.
त्यामुळे जाताना जरा सावरुनच जायला हवं. तंद्री लागल्याने त्या व्यक्तीलाही भान उरलेले नव्हते. आपण बऱ्याचदा सहज चालता फिरता अशाच कुठल्यातरी विचारात गुंतून जातो. तिथे आपल्या भावविश्नात इतके मग्न होतो की कुणी आपल्याला हाक दिली, कुणी आपल्याला धोक्याची सूचना दिली तरीही लक्षात येत नाही. या व्यक्तीसोबतही तसचं घडलं असावं. कुणीतरी जीवाच्या आकांताने ओरडून त्याला सांगितलं असेल की, अरssss खुळ्या माणसा बाजूला हो, तिथून पण या व्यक्तीने दुसऱ्याचं ऐकून बाजूला जरी झाला असता तरीही मृत्यू आणि जागेवर उभा राहीला तरीही मृत्यू आणि रस्ता पार केला तरीही मृत्यूच. अशा मृत्यूच्या वेढ्यात घेरलेल्या या मनुष्याचं केवळ आणि केवळ दैव बलवत्तर असावं म्हणून तो जीवंत राहू शकला. ते म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी’, अशीच काहीशी गत त्याची असावी. माणसाला कधी कधी जीवन हे याच जन्मात दुसऱ्यांदा मिळतं. किंवा एखादा मोठा आघात होण्यापासून त्याचं रक्षण होत जातं.
अचानक कुठल्यातरी मोठ्या संकटात व्यक्ती सापडून जाते. नियतीच्या चक्रव्युहात माणूस अडकून जात असतो. अन् आत्ता खेळ खल्लास असंचं वाटू लागतं. ब्रम्हदेव अवतरला तरीही आता यातून सुटका नाही, असं वाटू लागतं, मात्र, त्यातूनही मार्ग मिळतो. अचानक चमत्कार घडतो. सारंकाही पूर्ननिर्मित झाल्यासारखं होऊ लागतं. एक नव्याने जन्म मिळावा, अशीच अनुभूती असते. रस्त्याच्या मधोमध जाणारी ही व्यक्ती अशाच विचारांवर स्वार होऊन बागडत असेल पण अचानक मृत्यू आला अन् अगदी टीचभर अंतरावरून गेला आणि तिला कळलंही नाही. आपण मृत्यूच्या दाढेत तर आलो नाही ना, असं वाटून पुन्हा हा सर्व चमत्कार घडल्यावर तो मागे परतला. या प्रकारावर त्याचाच विश्वास बसेना. तुम्ही कधी असा अनुभव घेतलायं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
बघा व्हिडीओ :