बिहारमध्ये एका मुलीचे कुटुंब मुलाला उचलून मंदिरात घेऊन गेले आणि त्याच्यासोबत आपल्या मुलीचे लग्न करवू लागले. परंतु तेव्हा पोलीस वेळेवर पोहोचली आणि मुलाला आपल्या सोबत पोलिस स्थानकात घेऊन गेली. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाला असे करण्यामागचे कारण विचारले तेव्हा कारण ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले. ज्यानंतर पोलिसांनी स्वतः मुलीचे लग्न लावून दिले. हि घटना बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या बातमीनुसार बिहट गावात राहणारा तरुण एका तरुणीसोबत प्रेम करत होता. हे दोघेही एकमेकांसोबत विवाह करू इच्छित होते. ह्या दोघांनीही आपल्या कुटुंबासमोर एकमेकांसोबत विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली. तरुणीच्या घरातले लग्नासाठी राजी झाले आणि लग्नाचा प्रस्ताव घेऊन नवर्याच्या घरी गेले. परंतु नवरदेवाच्या घरातील मंडळी लोभी निघाली आणि त्यांनी लग्नासाठी खूप पैश्यांची मागणी केली. मुलीच्या कुटुंबाने हुंडा द्यायला नकार दिला. ज्याकारणामुळे हे नातं बनू शकलं नाही.
हुंड्याच्या मागणीने वैतागलेल्या मुलीच्या कुटुंबियांना राग अनावर झाला आणि ते मुलाला उचलून मंदिरात घेऊन गेले. मंदिरात अगोदरपासूनच त्यांनी लग्नाची तयारी करून ठेवली होती आणि मुलगी सुद्धा इथे हजर होती. परंतु ह्या दरम्यान मुलाच्या घरातील लोकांनी पोलिसांना फोन करून कळवले. ज्यानंतर पोलिसांनी मंदिरात जाऊन हे लग्न थांबवले. पोलीस दोन्ही कुटुंबाला आपल्यासोबत घेऊन चौकीत गेले.
जिथे त्यांची चौकशी केली गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिहट गावी राहणाऱ्या दीपाली कुमारी आणि बनहारा गावातील शिवम कुमार एकमेकांना खूप काळापासून ओळखत होते. ह्या दोघांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम आहे. जेव्हा मुलीच्या कुटुंबाला ह्या गोष्टीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी शिवम कुमारच्या कुटूंबातील व्यक्तींना भेटून ह्या नवीन नात्याबद्दल बोलणी करण्यासंदर्भात सांगितले. परंतु प्रत्येकवेळी शिवम कुमारचे कुटुंबीय हुंड्याची मागणी ठेवत असे. अनेकदा समजावल्यानंतरसुद्धा मुलाकडचे ऐकले नाही तेव्हा दिपालीच्या घरातल्यांनी शिवम कुमारला उचलून मंदिरात घेऊन नेले.
दिपालीच्या घरातल्यांनी पोलिसांना सांगितले कि, मुलाच्या कुटुंबियांच्या हुंडाच्या मागणीमुळे हे लग्न होत नव्हते. ह्यासाठी त्यांनी हे सगळे केले. तर हि संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तेघधा ठाण्यातील पोलिसांनी दीपाली आणि शिवम ह्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या मनात काय आहे हे विचारले. दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा उघड केली. ज्यानंतर पोलिसांनी शिवमच्या कुटुंबियांना समजावले आणि त्यांना हुंड्याशिवाय लग्न करण्यास सांगितले.
शिवमच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे म्हणणे मान्य केले आणि लग्नासाठी तयार झाले. दोन्ही पक्षाची सहमती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यातच ह्या प्रेमी जोडप्याचे लग्न केले गेले. ठाण्यात शिवम ने दीपालीच्या कपाळावर कुंकू लावले आणि पारंपरिक पद्धतीनुसार आपली पत्नी बनवले. ह्या दरम्यान दोघांच्याही घरातील मंडळी उपस्थित होती. आणि त्यांनी स्वखुशीने दोघांना आशीर्वादसुद्धा दिले.