Breaking News
Home / बॉलीवुड / हे बॉलिवूड स्टार आजही आहेत एकमेकांचे दुश्मन, करिनाने शाहीदसाठी मित्राशी केली होती दुश्मनी

हे बॉलिवूड स्टार आजही आहेत एकमेकांचे दुश्मन, करिनाने शाहीदसाठी मित्राशी केली होती दुश्मनी

बॉलिवूडची दुनिया पण अजबच आहे. प्रेमाचे जितके किस्से इथे ऐकायला मिळतात, तितकेच तिरस्काराचे किस्सेही आपल्या कानी येतात. इथे सेलिब्रेटी एकमेकांसोबत जितकी मैत्री निभावतात, जितके आपापसांत प्रेम दाखवतात, तितक्याच चांगल्याप्रकारे दुश्मनीसुद्धा निभावतात. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रेटींमधील दुश्मनी आजपर्यंत संपलेली नाही. आज आम्ही त्यापैकी काही सेलेब्रेटींबद्दल सांगणार आहोत.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय
लोकप्रिय अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबरॉयच्या दुश्मनी बद्दल आता जवळजवळ सर्वांनाच माहिती असेल. दोघांमधील दुश्मनीला जवळ जवळ दोन दशक झाले असतील. ऐश्वर्या राय वरून ह्या दोघांमधील दुश्मनीला सुरुवात झाली होती. विवेक ओबेरॉयने सांगितले होते कि, सलमानने फोन करून त्याला धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर विवेक ओबेरॉय सलमान खानची मीडियामध्ये माफी सुद्धा मागून झालेला आहे, ज्यामुळे दोघांमधील शत्रुता संपेल. परंतु असे वाटत नाही कि, सलमान खान त्याला कधी माफ करू शकेल. विवेक ओबेरॉयच्या डुबणाऱ्या करिअरसाठी त्याने सलमान खान सोबत घेतलेली शत्रुता जबाबदार असल्याचे मानले जात आहे.

आमिर खान आणि सनी देओल
आमिर खान आणि सनी देओल ह्या दोघांमधील दुश्मनी सुरु होऊन जवळजवळ दोन दशकं होऊन गेली, परंतु आजपर्यंत त्या दोघांमधील शत्रुता संपलेली नाही आहे. २००१ मध्ये आमिर खान आणि सनी देओल दोघांचे चित्रपट एकत्र रिलीज झाले होते. एकीकडे आमिर खानचा ‘लगान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला होता, तर त्याच दरम्यान सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट रिलीज करण्यात आला होता. दोघांच्या चित्रपटांची जेव्हा बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती, तेव्हा सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटावर भारी पडला होता. तेव्हापासून आमिर खान सनी देओलवर नाराज झाला होता. त्याचा हा राग आजपर्यंत कमी झालेला नाही आहे.

सलमान खान आणि अरिजित सिंग
जेव्हा सलमान खानचा ‘वीर’ चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा गायक अरिजित सिंगने स्टेटमेंट दिले होते कि, ‘क्या सर, सुला दिया आपने’. सलमान खानला हे ऐकून खूप राग आला होता. त्यानंतर त्याने अरिजित सिंगसोबत दुश्मनी घेतली. सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा त्यात ‘जग घुमिया’ हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. ह्यात अरिजित सिंगने सुद्धा काही भाग गायलं होते. सलमान खान ह्या गाण्याला चित्रपटांत ठेवू इच्छित नव्हता. अरिजित सिंगने सोशल मीडियावर त्याने हे गाणे काढून टाकण्याबद्दल सलमान खानचा विरोध केला होता. अरिजित सिंगला आज काम न मिळण्याचे कारण सलमान खान असल्याचे सांगितले जात आहे.

करीना कपूर आणि बॉबी देओल
करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या प्रेमाचे किस्से एकेकाळी खूप चर्चेत होते. २००७ साली इम्तियाज अली ‘जब वि मेट’ चित्रपट बनवत होते, ज्यात त्यांनी करीना कपूरला मुख्य अभिनेत्री म्हणून घेतले होते. ह्या चित्रपटांत करीना कपूरचा नायक म्हणून बॉबी देओलला घेण्याचा प्रस्ताव होता. परंतु, त्यावेळी करीना कपूरने इम्तियाज अलीला सांगून आपला बॉयफ्रेंड शाहिद कपूरला ह्या चित्रपटात घेतले होते. ह्या अगोदर करीना आणि बॉबी देओल ह्यांनी ‘अजनबी’ आणि ‘दोस्ती’ चित्रपटांत एकत्र काम केले होते. दोघेही चांगले मित्र होते. परंतु इतकी चांगली मैत्री असूनही ‘जब वि मेट’ चित्रपटावेळी करिनाने बॉबी देओलचा पत्ता काढून शाहिद कपूरला चित्रपटात घेतले होते. बॉबी देओलला हि गोष्ट खूप खटकली. आणि तेव्हा पासून त्याने करीनाचा राग मनात धरला. दोघांमध्ये आजही दुश्मनी आहे.

बिपाशा बसू आणि करीना कपूर
२१ सप्टेंबर २००१ साली ‘अजनबी’ चित्रपट रिलीज झाला होता. ह्या चित्रपटात अक्षय कुमार होता आणि त्याच्या विरुद्ध करीना कपूर आणि बिपाशा बसू दिसल्या होत्या. असं बोललं जातं कि चित्रपटाची शूटिंग चालू होती, तेव्हा ह्या दरम्यान करीना कपूर आणि बिपाशा बसूमध्ये कोणत्यातरी गोष्टीमुळे भांडण झाले होते. इतकंच नाही तर रागाने करीना कपूरने बिपाशा बसूला ‘काळी मांजर’ म्हणत कानशिलात लागवल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत दोघांमध्ये शत्रुता कायम आहे. आजही ते एकमेकांशी बोलत नाहीत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *