Breaking News
Home / मराठी तडका / हे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल

हे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल

युट्युबवर आपले आवडते विडीयोज पाहणं हा आनंदाचा भाग होताच. त्यात लॉक डाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळाची भर पडत गेली आणि आता तर एक नवीन कारण आपल्या सगळ्यांना मिळालं आहे. कारण, मराठी कलाकार आता युट्युबवर आपली हजेरी लावत आहेत. तशी त्यांची हजेरी असे ती मुलाखतींच्या निमित्ताने. पण आता त्यांचे स्वतःचे युट्युब चॅनेल्स त्यांनी सुरु केले आहेत. मागच्या लेखातही आपण काही मराठी कलाकार पाहिलेत जे युट्युबवर दाखल झाले आहेत. अशाच कलाकारांच्या मांदियाळीतीले काही कलाकार पुढीलप्रमाणे :

शशांक केतकर :
मालिका, सिनेमा अशा माध्यमांतून काम करताना प्रत्येक कलाकृतीवर स्वतःची अशी छाप पाडणाऱ्या काही निवडक अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शशांक केतकर. होणार सून मी या घरची, गोष्ट तशी गंमतीची अशा दर्जेदार कलाकृतींचा तो भाग होता. सध्या सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ हि मालिकासुद्धा तुफान चालू आहे. अश्या या गुणी अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वी पदार्पण केलं आहे ते युट्युबवर.

त्याच्या युट्युब चॅनेलचं नाव आहे “इंडीड कॅन्डीड (Indeed Candid)”. यात तो त्याच्या आवडीचे विविध विषय हाताळताना दिसतोय. मग ते रेसिपीज असोत कि रोजच्या जीवनातले अनुभव. त्याच्या चाहत्यांनाही हे विडीयोज खूप आवडताना दिसताहेत. अवघ्या काही महिन्यांत त्याच्या युट्युब चॅनेल सबस्क्रायबर्सची संख्या २७,००० च्या वर गेली आहे. त्यामुळे येत्या काळातही शशांक, त्याच्या आणि प्रेक्षकांच्या आवडीचे विडीयोज पोस्ट करत जाईल हे नक्की. मराठी गप्पाच्या टीम कडून त्याच्या या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

युट्युब चॅनेलचं नाव : Indeed Candid
सबस्क्रायबर्स संख्या : २७,७००+

प्राजक्ता माळी :

आजच्या काळातलं आघाडीच्या अभिनेत्रीचं नाव घ्यायला सांगितलं तर हमखास एक नाव पुढे येईल, ते म्हणजे प्राजक्ता माळी हिचं. अभिनय, अँकरिंग, नृत्य या सगळ्यात आघाडीवर असणारी अभिनेत्री आता दाखल झाली आहे युट्युबच्या मंचावर. कोणतही काम मनापासून केलं तर उत्तम होतंच याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे प्राजक्ता. त्यामुळे ती इथे नुकतीच दाखल झाली असली तरी येत्या काळात हा मंचसुद्धा ती गाजवेल यात शंका नाही. किंबहुना त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे असं म्हणायला पाहिजे. कारण अवघ्या काही महिन्यांत तिच्या युट्युब सबस्क्रायबर्सची संख्या वीस हजारापलीकडे गेली आहे.

तिच्या युट्युब चॅनेलचं नाव तिच्याच नावावरून ठेवलेलं आहे. तिने आत्तापर्यंत स्वतःच्या आवडत्या गाण्यांबद्दल, स्वरचित कवितांबद्दल, तिच्या स्टाईलच्या प्रवासाविषयी विडीयोज अपलोड केले आहेत, ज्यांना खूप उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. यापुढेही तिच्या आणि प्रेक्षकांच्या आवडीनिवडीचे विडीयो आपल्याला पहायला मिळतील अशी आशा करत, तिच्या या नवीन पदार्पणाला आणि पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पा टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

युट्युब चॅनेलचं नाव : Prajakta Mali
सबस्क्रायबर्स संख्या : २०,१००+

अपूर्वा नेमळेकर :

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला नुकाताच निरोप घेतला आणि या मालिकेचे चाहते हळहळले. खासकरून शेवंता आणि अण्णा नाईकांचे चाहते. पण या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुश खबर आहे. या मालिकेतील अपूर्वा नेमळेकर च्या अभिनयाची जादू आता युट्युबवर अनुभवता येणार आहे. कारण ती दाखल झाली आहे युट्युबवर तेही अगदी दमदार नावासकट. नाव आहे, “द फिनिक्स अपूर्वा नेमळेकर”. ज्यांनी या चॅनेल ला भेट दिली असेल त्यांनी तीच्या अभिनयाची जादू अनुभवली असेलच.

या युट्युब चॅनेलवरच्या विडीयोजमध्ये अपूर्वाला ज्या विविध व्यक्ति तिच्या निरीक्षणातून आवडल्या त्या व्यक्तिरेखांवर आधारित पात्र ती सादर करून दाखवते आहे. आत्तापर्यंत १,९९,००० हून अधिक व्युज तिच्या या चॅनेलला मिळाले आहेत. २,००,००० व्युज गाठणं हे अगदी नजरेच्या टप्प्यात आहे म्हणा ना आणि नजीकच्याच काळात ती हे करेल यात शंका नाही. टेलीविजन नंतर आता युट्युबवर फिनिक्स भरारी घ्यायला निघालेल्या अपूर्वाच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून तिला खूप खूप शुभेच्छा!

युट्युब चॅनेलचं नाव : The Phoenix Apurva Nemlekar
सबस्क्रायबर्स संख्या : ४८००+

सुबोध भावे :

व्यक्तिरेखा असो वा दिग्दर्शन. जे काम हातात घेतलं ते अगदी बारकाईने करणाऱ्या कलाकारांची नावं घेतली तर त्यात वरचा क्रमांक लागतो ते सुबोध भावे यांचा. सुबोधजींना आपण ओळखतो ते त्यांच्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाल गंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर या ऐतिहासिक भूमिकांसाठी तसेच कट्यार काळजात घुसली मधील अभिनय आणि दिग्दर्शनासाठी. सिनेमांबरोबरच त्यांनी नाटके, मालिकांमधील कामेसुद्धा गाजली आहेतच. आणि गेल्या दोन वर्षांपासून ते युट्युबवरही आपली छाप सोडत आहेत.

पण यात एक गंमत आहे बरं का. त्यांच्या वर उल्लेखलेल्या भूमिकांचा प्रेक्षकवर्ग हा वयाने थोडा मोठा असलेला होता. पण युट्युबवरचा त्यांचा प्रेक्षकवर्ग हा लहान मुलांचा आहे. त्यांच्या या चॅनेलमार्फत बच्चेकंपनीला सुबोधदादाची गोष्ट ऐकायला मिळते. लहानपणी ऐकलेल्या पण काळानुरूप थोड्या मागे पडलेल्या गोष्टी, सुबोधजी आपल्या छोट्या मित्रांना यातून ऐकवत असतात. त्यांना प्रतिसादहि उत्तम मिळाला आहे आणि मिळतो आहे. युट्युबच्या माध्यमातून छोट्या दोस्तांची गतकाळातील गोष्टींशी मैत्री टिकून रहावी या दृष्टीने हा उपक्रम नक्कीच स्तुत्य. अशा या स्तुत्य उपक्रमाला येत्या काळातही उत्तमोत्तम प्रतिसाद मिळत रहावा हीच टीम मराठी गप्पा कडून खूप खूप शुभेच्छा !

युट्युब चॅनेलचं नाव : Subodh Bhave
सबस्क्रायबर्स संख्या : १४,९००+

निवेदिता सराफ :

निवेदिता सराफ म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, तशाच त्या उत्तम बिझनेसवूमनही आहेत. पण याचबरोबर त्या अन्नपूर्णा पण आहेत. त्या उत्तम पदार्थ बनवतात हे त्यांच्या जवळच्यांना आणि चाहत्यांना माहिती होतंच. पण आता त्यांच्या रेसिपीज बघण्याच्या योग जुळून आला आहे. “निवेदिता सराफ रेसिपीज” नावाने त्यांनी आपलं युट्युब चॅनेल सुरु केलं ते काही महिन्यांपूर्वी. म्हणता म्हणता त्यांच्या या चॅनेलची सबस्क्रायबर्स संख्या एक लाखांहून अधिक झाली आहे. तुम्हीही जर आत्ता पर्यंत भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या आणि त्यांच्या नवनवीन रेसिपीज पहाण्याचा आस्वाद घ्या. त्यांच्या चॅनेलवर भारतीय तसेच पाश्चिमात्य अशा पदार्थांच्या रेसिपीज पहायला मिळतात.

निवेदिताजींनी आत्तापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका खूप केल्या आणि यापुढेही करतील. तसेच त्यांच्या युट्युब चॅनेल मार्फत वैविध्यपूर्ण रेसिपीजहि आपल्याला पाहायला मिळताहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की. त्यांच्या युट्युबवरच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा !

युट्युब चॅनेलचं नाव : Nivedita Saraf Recipes
सबस्क्रायबर्स संख्या : १,१८,०००+

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.