Breaking News
Home / मराठी तडका / हे लोकप्रिय कलाकार अभिनयाव्यतिरिक्त करतात साईड बि’जनेस, बघा को’ण को’ण आहेत ते

हे लोकप्रिय कलाकार अभिनयाव्यतिरिक्त करतात साईड बि’जनेस, बघा को’ण को’ण आहेत ते

क’रोनामुळे लॉक डाऊन जेव्हा सुरू झालं त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. या अनपेक्षित अशा या वर्षांत आपण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी बदलताना पाहिल्या. खासकरून अनेकांच्या नोकरी व्यवसायावर त्याचा परिणाम झाला. कित्येक वर्षांचा अनुभव असूनसुद्धा नोकरी गमावणारी उदाहरणं आपण पाहिली. आपल्या पैकी अनेकांना याचा अनुभव आला असेल. पण याच काही जणांतून असेही अनेक जण पुढे आले ज्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. समोर आलेल्या आ’र्थिक सं’कटाशी सामना करण्यासाठी अनेकांनी व्यवसाय हा मार्ग निवडलेला दिसतो. यात उल्लेखनीय बाब अशी की अनेक मराठी तरुण यानिमित्ताने पुढे आले आणि स्वबळावर किंवा एकत्र येत त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. मराठी माणूस उद्योग व्यवसायात कमी असतो हे चित्र बदलायला लागल्याचे हे सकारात्मक द्योतक.

याआधीही अनेक मराठी व्यक्ती उद्योग व्यवसायात होत्याच. आपले आवडते अनेक कलाकार ही यांस अपवाद नाहीत. आमच्या टीमने याआधीही मराठी कलाकार आणि त्यांचे उद्योग यांच्याविषयी लेख लिहिले आहेतच. आज त्यांच्याच जोडीचा हा लेख. अजून काही नवीन नावांवर प्रकाश पाडणारा जे कलाक्षेत्रासोबतच उद्योग व्यवसायात ही आपली पाळंमुळं घट्ट करण्याच्या प्रयत्न करत आहेत.

आरती वडगबाळकर
मालिका, प्रहसन आणि इतर माध्यमं. प्रत्येक माध्यमांतून यश मिळवलेल्या अभिनेत्रींमधली एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे आरती. आपण तिच्या अनेक लोकप्रिय भूमिकांसाठी तिला ओळखतो. पण कलाक्षेत्रासोबतच तिचा स्वतःचा असा व्यवसाय आहे हे फार कमी जणांना माहिती असतं. आरती ही तिच्या उत्तम फॅशन सेन्स साठी ओळखली जाते. तिचा हा लोकप्रिय फॅशन सेन्स तिने तिच्या साडीच्या ब्रॅंडला मोठं करताना अगदी उत्तमरीतीने वापरला आहे. कलर छाप असं या ब्रॅंडचं नाव. विविध प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन या ब्रँड अंतर्गत पाहता येते. कालाक्षेत्रासारखंच व्यवसायातही स्वतःची मोहर उमटवणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला तिच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

हार्दिक जोशी
चालतंय की म्हणत रां’गड्या व्यक्तिमत्वाचा पण सहृदयी राणादा आपल्या सगळ्यांचा लाडका झाला. जणू काही आपल्या घरातील आपला मोठा भाऊच. हार्दिक जोशी हा गुणी अभिनेत्याने रंगवलेलं हे पात्र न ओळखणारा एखादा विरळाच असावा इतकं प्रेम या व्यक्तिरेखेस मिळालं आहे. हार्दिक च्या करकिर्दतला हा एक अतिशय महत्वाचा टप्पा. नुकताच अजून एक महत्वाचा टप्पा हार्दिक याने पार केला. हा टप्पा म्हणजे व्यवसायात उतरण्याचा. हार्दिक याने पार्टनरशिप मध्ये एक व्यवसाय सुरू केला आहे. कोल्हापुरात त्याने थंडाई या पेयाचं एक दुकान थाटलं आहे. कोल्हापूर बदाम थंडाई असं या दुकानाचं नाव. या वर्षीच्या (२०२१ च्या) फेब्रुवारी महिन्यात या व्यवसायाचा श्रीगणेशा हार्दिक याने केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दुकानाच्या उदघाटनाची माहिती हार्दिक याने दिली होती. हार्दिक याने सुरू केलेला हा ब्रँड येत्या काळात हार्दिक सारखीच उत्तुंग लोकप्रियता मिळावो आणि त्याचा व्यवसाय महाराष्ट्रभर पसरो ही मराठी गप्पाच्या टीमची मनोकामना. हार्दिक आणि त्याच्या टीमला त्यांच्या पुढिल यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

पराग कान्हेरे
खवय्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचा शेफ, एक सेलिब्रिटी, बिग बॉस मराठीचा एक स्पर्धक, फूड शोज चा निवेदक. काय आणि किती ओळख करून द्यावी पराग कान्हेरे यांची. पराग यांची प्रेक्षकांना ओळख झाली ती त्यांच्या उत्तम रेसिपीज द्वारे. त्यांनी साकार आणि सादर केलेल्या रेसिपीजना गृहिणींची दाद मिळत गेली आणि पराग यांची लोकप्रियताही वाढत गेली. पुढे ते विविध रुपांतून आपल्या समोर आले. बिग बॉस मराठी मधील त्यांचा सहभाग हा त्यातला महत्वाचा टप्पा. आत्तापर्यंत शेफ म्हणून ज्यांना आपण बघितलं त्यांना माणूस म्हणून वावरताना प्रेक्षकांनी पाहिलं आणि पसंत ही केलं. अशा या लोकप्रिय व्यक्तिमत्वाने आपला व्यवसाय सूरु केला तो बिग वडापाव या नावाने. पराग मूळचे पुण्याचे. त्यांनी आपल्या जन्मभूमीतच आपला व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायामार्फत पराग यांनी वडा पावचे विविध प्रकार खवय्यांसाठी आणले आहेत. लॉकडाऊनच्या काळात याच पराग यांनी आपल्या या मराठमोळ्या ब्रँ’ड द्वारे पो’लीस आणि इतरांना वडा पाव खाऊ घालून आपली सामाजिक जबाबदारीही पूर्ण केली होती. यावरून त्यांची जागृत आणि प्रगल्भ अशी सामाजिक जाणीवही दिसून येते. लोकप्रियता, स्वतःची कारकीर्द, सामाजिक भान असं सगळंच उत्तम रीतीने हाताळणाऱ्या पराग यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

शिव ठाकरे
बिग बॉस मराठी चा विषय निघावा आणि शिव ठाकरे हे नाव येऊ नये असं होऊ शकत नाही असं होणार नाही. निकोप स्पर्धा करण्याची वृत्ती, खरेपणा दर्शवणारा निर्मळ स्वभाव आणि जिंकण्याची दुर्दम्य मनःश’क्ती असणारा शिव ठाकरे. रोडीज असो वा मराठी बिग बॉस, शिव याने आपली छाप नेहमीच पाडली आहे. उत्तम अभिनय करण्यासोबतच तो उत्तम डान्सर ही आहे, हे आपल्याला माहिती आहेच. असा हा अष्टपैलू कलाकार आता व्यवसायात उतरला आहे. नुकताच त्याने आपला डिओड्रंड ब्रँ’ड लॉंच केला. त्यासाठी एका आलिशान जागेवर त्याने अगदी दिमाखात आपला पहिला वहिला ब्रँ’डचं अगदी ग्रँड लॉं’च केलं. B.Real असं या डिओड्रंड ब्रॅंडचं नाव आहे. या लॉंचच्या वेळी अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. त्यात लक्षणीय उपस्थिती होती ती लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांची. त्यांच्या हस्ते या ब्रँ’डचं लॉंच झालं. नुकताच लॉंच झालेला हा ब्रँ’ड येत्या काळात शिव सारखाच लंबे रेस का घोडा ठरेल यात शंका नाही. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शिव यास त्याच्या व्यवसायातील पदर्पणासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.