Breaking News
Home / मराठी तडका / हे लोकप्रिय बालकलाकार आता कसे दिसतात पहा, फॅन्ड्रीतली हिरोईन तर खूपच सुदंर दिसतेय

हे लोकप्रिय बालकलाकार आता कसे दिसतात पहा, फॅन्ड्रीतली हिरोईन तर खूपच सुदंर दिसतेय

सिनेमा मध्ये काम करणं हे प्रत्येकाचं लहानपणीचं स्वप्न असतं. मोठेपणीही असतं म्हणा. पण लहानपणी आपली कल्पनाशक्ती आपल्यालाला मनातल्या मनात हिरो/हिरोईन करून सोडते. पण ते तेवढ्यावरच राहतं. काही जणांना मात्र संधी मिळते आणि ते याचं सोनं करतात आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत राहतात.

आज आपण अशाच काही अभिनेत्रींचा मागोवा घेणार आहोत ज्यांनी काही वर्षांपूर्वी बालकलाकार म्हणून सुरुवात केली होती.

राजेश्वरी खरात :

फँड्री हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. नागराज मंजुळे यांचा हा सिनेमा तुफान चालला. त्यातली शालू सुद्धा आठवत असेल. कोणताही
डायलॉग नसताना पण आपल्या अभिनयाने तिने रसिकांची मने जिंकली होती. फँड्रीच्या वेळी राजेश्वरी केवळ ९वीत होती. फँड्रीच्या अभूतपूर्व यशानंतर तिने आयटमगिरी नावाचा सिनेमा केला. जाहिराती आणि म्युजिक विडीयो मध्ये ती चमकली आहे.

पण ज्यांना तिचा फँड्रीमधला लुक आठवत असेल त्यांना आता तिचा लुक बघून नक्कीच धक्का बसेल. अगदीच साध्या लुक पासून आज ती अगदी ग्लॅमरस लुक मधे वावरते. ती स्वतःला छान कॅरी सुद्धा करते. पुण्याच्या या अभिनेत्रीकडून येत्या काळात उत्तमोत्तम कामे पहायला नक्कीच मिळतील.

गौरी वैद्य :

दे धक्का हा सिनेमा पाहिला नाही आणि आवडला नाही असे फार कमी लोकं असतील. त्यातल्या नृत्याचं वेड असणाऱ्या मुलीसाठी तळमळणारं कुटुंब सगळ्यांनाच भाऊन गेलं. आणि त्यातला गौरी वैद्यचा रोल सुद्धा. एवढ्या लहानपणी तिने भूमिका साकारताना दाखवलेला समंजसपणा सगळ्यांना भावाला.
तिच्यातल्या निरागसपणाने त्या भूमिकेला उठाव दिला. पुढे तिने ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या सिनेमा मध्ये सक्षम कुलकर्णी, भरत जाधव आणि क्रांती रेडकर यांच्या सोबत काम केलं.

तिच्या नृत्याची आवड आपल्याला ‘एका पेक्षा एक’ या रियालिटी शो मधून पण दिसली आहेच. तर, अशी हि गौरी दरम्यानच्या काळात अभ्यासात व्यस्त होती.
तिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. ‘दे धक्का २’ मध्ये ती असेल अशी चर्चा तर होती, पण अजूनही त्यावर काही बातमी नाही. पण अशा या सुंदर
आणि गुणी अभिनेत्रीला पुन्हा एकदा सिनेमाच्या पडद्यावर पाहायला आपण सगळेच उत्सुक आहोत हे नक्की.

मृणाल जाधव :

२०२० मध्ये प्रसिद्ध झालेले सिनेमे तसे कमीच. पण जे काही प्रदर्शित झाले त्यातला एक म्हणजे ‘भयभीत’. सुबोध भावे यांची मध्यवर्ती भूमिका असेलेला हा सिनेमा. त्यात त्यांना सोबत दिली ती मृणाल जाधव या उभरत्या अभिनेत्रीने. खरं तर तिला वयाच्या मानाने अनुभव खूपच चांगला आहे.
तिच्या वागण्या बोलण्यातून तो दिसून येतो. अनुभव असण्याचं कारण तिने केलेलं काम.

तुम्हाला अजय देवगण यांचा ‘दृश्यम’ आठवत असेल ना. त्यातली छोटीशी मुलगी. होय, तीच म्हणजे मृणाल जाधव. तिने हिंदीत जसं काम केलंय, तसच मराठी मध्ये सुद्धा. ‘तू हि रे’, ‘अंड्याचा फंडा’, ‘लय भारी’ या गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये ती झळकली आहे. एवढ्या लहान वयात काम केल्यामुळे येणारा
समंजसपणा तिच्या मुलाखतींमधून दिसून येतो. तसच, अभिनय करता करता अभ्यासपण व्हायला हवा हे ती कटाक्षाने पाहते. येत्या काळात तिने स्वतःचा अभ्यास सांभाळून काम करत राहावं या साठी तिला खूप खूप शुभेच्छा !

भाग्यश्री मिलिंद :

‘आनंदी गोपाळ’, ‘उबंटू’ आणि ‘बि.पी.’ यांच्यात काही साम्य आहेत. एक तर या सिनेमांनी लोकांना आनंद दिला आणि दुसरं यातील अभिनेत्री. भाग्यश्री मिलिंद. ‘बी.पी.’ या रवी जाधव दिग्दर्शित सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. वयात येणाऱ्या मुलाचं भावविश्व यात नेटकेपणाने मांडलं होतं. भाग्यश्री याचा अविभाज्य भाग होती. पुढे ‘उबंटू’ तिने केला. आनंदी गोपाळ मधली तिची भूमिका पण वाखाणली गेली.

बालकलाकार म्हणून सुरवात करणाऱ्या भाग्यश्रीने स्वतःला काळाबरोबर बदललं आहे. तिच्या अभिनयातून ते जाणवतं. भ्रमंतीची आवड असणाऱ्या भाग्यश्री कडून येत्या काळात उत्तमोत्तम भूमिका पहायला मिळतील यात शंका नाही.

तेजश्री वालावलकर :

 

उंच माझा झोका मधली रमाबाई रानडे यांची भूमिका वठवली होती तेजश्री वालावलकर हिने. आणि तिच्या नैसर्गिक आणि निरागस अभिनयाचं कौतुक सर्वत्र झालं होतं. तिने ‘आजी आणि नात’, ‘मात’, ‘चिंतामणी’ या सिनेमांमध्ये सुद्धा काम केलं आहे. ‘झिन्दगी नॉट आऊट’ या सिरीयालमधे हि
तीने महत्वाची भूमिका बजावली होती.

खट्याळ, खेळकर भूमिका करणाऱ्या तेजश्रीच्या लुकमध्ये आता खूप फरक झालाय. ती आता ग्लॅमरस दिसते. येत्या काळात तिच्याकडून ग्लॅमरस भूमिका पहायला मिळतील हे नक्की. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *