जगात प्रत्येकाला प्रेरणा हवी असते, प्रत्येकाची प्रेरणा ही वेगवेगळ्या स्वरूपात असते. मोठ्या माणसांपासून तर लहान मुलांपर्यंत प्रत्येक जनासाठी कुणीतरी रोल मॉडेल बोले तो हिरो असतो. आमच्या काळी आमचा रोल मॉडेल शक्तिमान म्हणजेच गंगाधर होता. शक्तिमान ड्रेस दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत मिळाला तरी आम्ही मोक्कार खुश होऊन गावभर उंडरत असायचो. निस्ता ड्रेस घातला तरी आम्हाला शक्तिमान झाल्यासारख वाटायचं. आजकालच्या लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, सुपरमॅन आणि अजून कोणकोणते मॅन प्रेरणा असतात. आता ही अतिरंजित आणि अति काल्पनिक असलेली पात्रे लहान मुलांवर मोठा प्रभाव पाडणारी ठरतात. आमच्यावरही शक्तिमानचा प्रभाव होता पण तो फक्त शक्तिमानसारखी गिरकी घेण्याइतकाच… मात्र आजकालच्या लहान मुलांना सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन सारखं उडायचं असतं. ही काल्पनिक पात्रे संकटकाळात समाजाला साहाय्य करतांना आणि इतरांचे कल्याण करण्यासाठी झटतांना दिसतात. या पात्रांना उडता येते, अदृश्य होता येते, धावती आगगाडी (ट्रेन) थांबवता येते आणि बोटांमधून बं-दुकीसारख्या गो-ळ्या किंवा वि-ध्वंसक किरण सोडता येतात.
या सर्वांच्या साहाय्याने त्यांनी वाईट व्यक्तींचा नाश केलेलाही दाखवला जातो. यामुळे मुलांमध्ये या पात्रांविषयी पुष्कळ आकर्षण निर्माण होते. त्यांच्यासारख मोठमोठ्या आणि उंचावर असणाऱ्या बिल्डिंगवरून थेट खाली झेप घ्यायची असते. शत्रूला संपवायचं असतं. असं काही काही ही मुलं स्वप्न बघत असतात. त्याचा परिणाम खूप गंभीर होतो आणि ही मुलं कसलंही साहस करतात. त्यांच्या पराक्रमाचं सुरुवातीला घरचेही कौतुक करतात पण नंतर मात्र या मुलांचं अति साहस थेट जीवाशी बेतू शकतं. अशा कित्येक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
आमच्या टीमकडे नुकताच एक व्हिडिओ आला आहे. हा व्हिडीओ या मुलांच्या अतरंगी असण्यामुळे खूप व्हायरल होताना दिसत आहे. या लहान मुलातही स्पायडरमॅनसारखे अनेक गुण खचून भरले असल्याने तोही असेच चाळे करत आहे. सुरुवातीला त्याला बघून गंमत वाटते, या लहान पोरांचं कौतुकही वाटतं. या मुलाच वय बघता त्याला बोलताही येत नसेल, यावर आपण ठाम होतो.
मात्र सरतेशेवटी क्षणभर का होईना असा विचार मनात येतो की, हा पडला तर??? आणि मग अंगाचा थरकाप होतो. या व्हिडीओला मनोरंजनाच्या दृष्टीने बघितले पाहिजे, मात्र त्यावर थोडा गंभीरपणे विचारही केला पाहिजे. कारण अशा या स्पायडरमॅन किंवा इतर मॅनमुळे अनेक लहान मुलांनी जीव धोक्यात घातलेले आहेत. तुमच्या घरात लहान मुले कार्टून बघत असतील तर टीव्हीमधील सुपरमॅन जशी ऍक्शन करेल अगदी तशीच ऍक्शन घरातील छोटे मुल करत असते. आनंदात असल्यामुळे आपण काय करत आहोत, याचे भानदेखील त्याला रहात नाही. म्हणूनच लहान मुलांच्या गुणांचं कौतुक करा पण त्याला साहस आणि अतिसाहसतसेच काल्पनिक आणि वास्तविक यातील फरक दाखवून द्या. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :