Breaking News
Home / बॉलीवुड / हॉटेलच्या त्या खोलीत असं काय घडलं कि विवेकला ऐश्वर्या सोबत करिअर सुद्धा गमवावे लागले

हॉटेलच्या त्या खोलीत असं काय घडलं कि विवेकला ऐश्वर्या सोबत करिअर सुद्धा गमवावे लागले

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबरॉयने जेव्हा आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली तेव्हा सर्वाना असे वाटलं होतं कि, त्याचे करिअर खूपच चांगले चालेल आणि तो खूप पुढे जाईल. विवेकेने ‘कंपनी’ चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर विवेकने अनेक हिट चित्रपटांत काम केले. साथिया, मस्ती ह्यासारखे हिट चित्रपट विवेकने दिले. पण त्याच्या एका चुकीमुळे त्याचे करिअर पूर्णपणे संपून गेले. लोकांना असं वाटतं कि त्याचे करिअर बंद होण्यामागे ऐश्वर्या रायमुळे सलमान खान सोबत त्याची दुश्मनी आहे. हि गोष्ट तर सर्वांनाच माहिती आहे कि, जेव्हा सलमान खान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले होते, तेव्हा ऐश्वर्या राय विवेके ओबेरॉयच्या खूप जवळ आली होती. परंतु ऐश्वर्या आणि विवेकाचे नाते फार जास्त काळ टिकू शकले नाही. शेवटी असं काय झाले कि ऐश्वर्याने विवेकसोबत ब्रेकअप केले. साल १९९९ मध्ये संजय लीला भन्साळी ह्यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ च्या सेटवर सलमान खान आणि ऐश्वर्या राय जवळ आले होते आणि त्यांच्या मध्ये प्रेम झाले.

हे दोघेही जवळजवळ ३ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिप मध्ये होते. परंतु सलमान खानच्या रागामुळे दोघांमधील नाते संपले. परंतु सलमान खान आणि ऐश्वर्याचे नाते इतकं सहजासहजी संपले नाही. ऐश्वर्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतरसुद्दा सलमान खानचा राग कमी झाला नाही. सलमान खानने खूपवेळा ऐश्वर्या रायच्या सेटवर जाऊन तमाशा केला. सलमान खानच्या अश्या वागण्यामुळे ऐश्वर्या रायला शाहरुख खानच्या ‘चलते चलते’ चित्रपटातून सुद्धा बाहेर काढले गेले. २००२ मध्ये ऐश्वर्या रायने आपल्या एका मुलाखतीत हे सुद्धा सांगितले होते कि, सलमान खान आणि माझे मार्चमध्येच ब्रेकअप झाले आहे. परंतु सलमानला ह्या गोष्टीवर अजूनही विश्वास होत नाही आहे. वेगळे झाल्यानंतरही सलमान मला सारखं सारखं कॉल करायचा आणि फोन वर शिव्या सुद्धा द्यायचा.

मुलाखतीत ऐश्वर्या रायने हे सुद्धा सांगितले कि, सलमान खानने माझ्यावर हाथ सुद्धा उचलले आहे. एक गोष्ट चांगली होती कि, माराची कोणतीही निशाणी माझ्या चेहऱ्यावर नाही आहे. असं होण्यानंतर सुद्धा मी शूटिंगला असे जायची, जसे काहीच झाले नाही आहे. सलमान खानच्या अश्या वाईट वागणुकीमुळे ऐश्वर्याने त्याच्या सोबत ब्रेकअप केले. त्यानंतर ऐश्वर्या रायच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला. विवेक आणि ऐश्वर्याने ‘क्यो हो गया ना’ ह्या चित्रपटात एकत्र काम केले. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आणि दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. विवेकने ऐश्वर्याच्या तिसाव्या वाढदिवशी तिला ३० भेटवस्तू दिल्या होत्या. खरंतर, ऐश्वर्या रायने विवेक सोबत असलेले आपले नाते कोणालाच सांगितले नव्हते. परंतु अनेकवेळा दोघांना एकत्र पाहिले गेले. दोघांमध्ये खूप काळापर्यंत सर्व ठीक ठाक चालू होते. परंतु नंतर विवेकने एक चुकीचा निर्णय घेतला. आणि त्या निर्णयाने सर्व काही बदलून गेले. विवेक ओबेरॉयने हॉटेलच्या एका बंद खोलीत प्रेस कॉन्फेरंस बोलावली. ज्यामध्ये त्याने सांगितले कि सलमान त्याला सारखं सारखं फोन करून जीवे मारण्याची धमकी देत आहे.

विवेक ओबेरॉयने असे बोलल्यानंतर सर्व काही ठीक होण्याऐवजी सर्व काही संपून गेले. विवेक ओबेरॉयने ऐश्वर्यासाठी इतकं मोठं पाऊल उचलले, परंतु ह्या प्रेस कॉन्फरन्सनंतर ऐश्वर्यासुद्धा त्याच्यापासून दूर झाली. प्रेस कॉन्फरंस मध्ये दिलेल्या त्या जबानीनंतर ऐश्वर्यासोबतच चित्रपट निर्मात्यांनीसुद्धा विवेक ओबेरॉय पासून लांब राहणेच पसंत केले. आणि त्याला चित्रपटात काम मिळणे बंद होऊ लागले. अनेकांचे असं मानणं आहे कि, जर विवेक ओबेरॉयने त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये अशी जबानी दिली नसती, तर आज ऐश्वर्या त्याची असती आणि त्याचे करिअर सुद्धा चांगले चालू असते. सलमान खान आणि विवेक ओबेरॉयपासून दूर झाल्यानंतर अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला सांभाळले. अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटांत काम केले. त्यानंतर दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. सूत्रांच्या माहितीनुसार ‘उमराव जान’ चित्रपटात काम करते वेळी दोघेही एकमेकांच्या जवळ आले आणि दोघांमध्ये प्रेम झाले. ‘गुरु’ चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी अभिषेक ने ऐश्वर्या रायाला लग्नासाठी मागणी घातली. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांचे लग्न झाले.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.