तुझी माझी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी… अरे ही दुनियादारी म्हणजे मोह माया आहे…. न योग है ना त्याग है सब जगह दुनियादारी है… असे कित्येक डायलॉग तुम्ही मित्रांकडून, चित्रपटांमधून, पाहुण्यांकडून ऐकले असतील. प्रत्येक नवीन ठिकाणी आपली आपली एक वेगळी दुनिया असते आणि तिथल्या दोस्तांसोबतची एक वेगळीच दुनिया असते. दरवेळी नवीन वर्गात, नवीन शाळेत, कॉलेजमध्ये आणि शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या मुलांना हळूहळू या दुनियादारीची माहिती होत असते. मात्र तरीही घरचे म्हणत असतात की, लग्न झाल्यावर खरी दुनियादारी कळेल तुला बेट्या… मात्र घराबाहेर होस्टेलला राहिलेल्या मुलांना, मुलींना आधीच दुनियादारी कळलेली असते. खर्च होणारा पैसे, अडचणीत लांब जाणारे तसेच मदत करणारे दोस्त… किरकोळ गोष्टींवरून रुसणारी मैत्रीण… आणि गावाकडून असनाऱ्या अपेक्षांचे ओझं… अशा एक ना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. अर्थात यापलीकडे जाऊनही खूप बारीक-बारीक गोष्टी होस्टेलमध्ये अनुभवायला मिळतात. तर असो होस्टेलचं आयुष्य खूप काही शिकवणार असतं.
आयुष्यातला सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात वाईट काळ म्हणजे होस्टेलचा… आता हे तुम्हाला अनुभवाने समजेल. असो तर होस्टेल म्हणजे एकाच वेळी दर्दभऱ्या दूषित कहाण्या आणि प्रेमभऱ्या रसरंगी गोष्टी. सध्या कॉलेज बंद असल्याने होस्टेलही बंदच आहेत. मात्र होस्टेल लाईफचे जुने व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हायरल व्हिडीओ आमच्या हाती लागलेला आहे. हा व्हिडीओ बनवणारी पोरं सर्वार्थाने कलाकार आहेत, हे दिसून येत आहे. हॉस्टेल लाईफची अजून एक भारी गोष्ट म्हणजे, हॉस्टेल तुम्हाला माणूस बनवते. जाती-धर्म, प्रांत या सगळ्या गोष्टी हॉस्टेलमध्ये नसतात. तिथे फक्त माणुसकी आणि दोस्ती असते. तर असो या व्हिडीओत फार वेगळं काही नाही. जे काही आहे ते म्हणजे 6 मित्रांची धमाल मस्ती आणि मज्जा. एका गाण्यावर हे सहा जण डान्स करत आहेत. 2 जण टेबलवर उभे राहुन नाचत आहेत. 2 जण 2 पायावर बसून कपाटवर नाचत आहेत. आणि 2 जणांची अचानक एन्ट्री होते आणि मग सुरू होतो माहोल…
या व्हिडीओतील अजून एक भारी गोष्ट म्हणजे त्यांनी मग, डबडे, हेडफोन, टॉवेल आणि बादलीचा एकदम भारी उपयोग केला आहे. एवढ्यावरच ही मंडळी थांबलेली नाहीत, यांच्या डान्स स्टेप बघितल्या तर एखादा कधीच न नाचणारा माणूस सुद्धा म्हणेल की… आता तर मीही डान्स करू शकतो. इथल्या सोप्या आणि भन्नाट डान्स स्टेप्स आहेत.
आता या व्हिडीओची आम्हांला आवडलेली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, यापैकी एकही जण प्रोफेशनल डान्सर नाही. यांनी एकमेकांच्या साथीने आणि मित्र म्हणून एकमेकावर असलेल्या विश्वासापोटी हा डान्स केला आहे. यांच्यापैकी एकाएकाला हा डान्स परत करायला लावला तर जमणार नाही. कारण दोस्त आणि त्यांनी बनवलेला माहोल ही एकदम भारी गोष्ट असते. आणि हीच एकी हाच आत्मविश्वास आपल्याला दुनियादारीत पुढे घेऊन जात असतो.
बघा व्हिडीओ :