Breaking News
Home / मनोरंजन / होणाऱ्या नणंदेसाठी वहिनींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

होणाऱ्या नणंदेसाठी वहिनींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्न म्हणजे नेहमीच एक आनंद सोहळा असतो. त्यातही घरातील लग्नाळू वयाच्या पण सगळ्यांच्या मानाने लहान असणाऱ्या व्यक्तीचं लग्न म्हणजे आनंद पर्वणीच. घरातील प्रत्येक जण हा सोहळा अविस्मरणीय होईल यासाठी झटत असतो. हल्ली तर लग्नसोहळ्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं असतं. खास डी जे असतो, अगदी वेगळा डान्स फ्लोअर ही असतो. त्यामुळे गंमत अजून वाढते. या सगळ्यांची अनुभूती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला.

हा व्हिडियो आहे एका वहिनींचा. या वहिनींनी आपल्या नणंदेसाठी तिच्या लग्नानिमित्त डान्स केल्याचा हा व्हिडियो आहे. आपल्या वाचकांना या व्हिडियोविषयी जाणून घ्यायला आवडेल असं वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो सूरु होतो तेव्हा वहिनी रंगमंचावर आलेल्या असतात. सोबत गाणं सुरू असतंच. झुबेदा चित्रपटातील ‘मेहेंदी हैं रचनेवाली’ हे गाणं आपल्या कानावर पडत असतं. अलका याग्निक यांनी आपल्या सुरेल आवाजाने हे गाणं संस्मरणीय केलेलं आहे. करिश्मा कपूर यांच्या अभिनयाने हे गाणं नटलेलं आहे.

अशा या लोकप्रिय गाण्यावर या वहिनी सुदधा तेवढाच उत्तम डान्स करतात. त्या येतात त्याच मुळात प्रसन्न चेहऱ्याने आणि स्मित हास्यासकट. हे स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णवेळ राहतं. अतिशय प्रसन्न वातावरणात त्या गाण्यावर डान्स सुरू करतात. डान्सच्या सुरुवातीपासून जाणवते ती त्यांची या डान्सची तयारी. कारण, गाण्यातील प्रत्येक बिट पकडत आणि शब्दांना अनुसरून त्या डान्स करत असतात. ‘कलीयां खिलने वाली हैं’ या वाक्यावर हातांचा वापर करत त्या खुलणारी कळी दाखवतात त्यावरून त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा डान्स बसवला आहे याची कल्पना येते. पुढच्या अनेक स्टेप्स मधून याचा पुनःप्रत्यय येत राहतो. प्रत्येक शब्दाचा विचार करून आणि त्यांच्या अर्थाला अनुसरून त्यांचा हा डान्स सुरू असतो. बरं केवळ आपल्यावर त्यांच्या डान्सची छाप पडते असं नाही. तर उपस्थितांवरही ही छाप पडलेली दिसून येते. कारण, डान्स सुरू झाल्यापासून मिनीटभराच्या आत एक काकु आणि काका या वहिनींची दृष्ट काढून जातात. उत्तर भारतात अनेक वेळेस एखादा डान्स आवडला तर डान्स करणाऱ्याच्या डोक्यावरून पैसे ओवाळून आपला आनंद व्यक्त केला जातो. येथेही तसंच घडताना दिसतं.

हा व्हिडियो तसा बऱ्यापैकी वेळेचा आहे. पण या वहिनींनी मनापासून केलेलं नृत्य या वेळेची जाणीव होऊ देत नाही.आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही हा व्हिडियो आवडला असेल. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. त्यातीलच हे एक लेखपुष्प. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमच्या पाठीशी ठामपणे उभे असता. आपल्या लेखांना शेअर करत असता. आपल्या सकारात्मक कमेंट्स नी आम्हाला प्रोत्साहन देत असता. याच प्रोत्साहनामुळे आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लिखाण करण्याची ऊर्जा मिळत राहते आणि टिकून राहते. येत्या काळातही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला कायम मिळत राहू द्या ही विनंती. आपला लोभ आमच्या टीमवर कायम असू द्या !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *