Breaking News
Home / मनोरंजन / हौशी मित्राच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बिचाऱ्या नवरदेवाची झाली फजिती, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

हौशी मित्राच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बिचाऱ्या नवरदेवाची झाली फजिती, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

हौशी अतिउत्साही मंडळी आणि किस्से यांचं जणू अतूट नातं आहे. हौशी मंडळी कुठेही असू द्या, प्रत्येक वेळी काही ना काही नवीन करत असताना एखादा किस्सा तरी घडतोच. बरं काही वेळा त्यांच्या बाबतीत घडतो तर काही वेळा इतरांच्या बाबतीत घडतो. तसेच काही वेळा ते स्वतः या किश्यांसाठी कारणीभूत असतात तर काही वेळेस इतरांचा ही त्यास हातभार लागतोच.

खासकरून लग्न समारंभाच्या काळात तर हे पटायला लागणारे अनेक किस्से घडतात. आताही तसा लग्नांचा काळ आहेच. त्यात गेले दोन तीन आठवडे तर लग्नांची राळ उडाली आहे नुसती. त्यामुळे कळत नकळतपणे आपणही असे काही किस्से पाहिले असतीलच. हा लेख वाचताना ते आठवलेही असतील कदाचित. हे होतंच. कारण लग्न म्हणजे हौशी मंडळींसाठी एकदम मोक्याचा काळ असतो बघा. कारण एवढ्या साऱ्या गोष्टी आजूबाजूला होत असतात की त्यात हौशी व्यक्ती हव्याच असतात. बरं त्यांची मदत झाली तर उत्तमच. कारण यांचं डोकं लय जोरात धावत. पण नशीब खराब असेल आणि काही चुका झाल्या की हीच हुशारी अंगाशी येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय.

हा एक लग्नातील व्हिडियो आहे हे काही वेगळं सांगायला नकोच. अगदी स्पष्ट करून सांगायचं तर हा लग्नाच्या वरातीचा व्हिडियो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा सजून धजून लग्नाला आलेल्या मुलींचा एक जथ्था आपल्याला समोर उभा असलेला दिसतो. तेवढ्यात लांबून कोणी तरी अतिशय वेगाने जवळ येतंय हे त्यांना जाणवतं. आपल्याला पटकन कळत नाही. पण ही जाणीव झाल्याने त्या चट्कन बाजूला होतात. आता जवळपास अख्खी वरात आलेली असते. त्यात अर्थात आघाडीवर असतो नवरा मुलगा. एरवी वरात म्हंटली की नवरा मुलगा घोड्यावर बसून येतो. आता ही येतो. पण घोड्यावर बसून नव्हे तर…. माणसावर बसून. होय. एका हौशी आणि अतिउत्साही माणसाने या नवऱ्या मुलाला खांद्यावर घेतलेलं असतं. आता यापुढे काय होतं यासाठी आपण थोडी कल्पनाशक्ती वापरू शकता. कारण आम्हीच इथे सगळं सांगितलं तर हा व्हिडियो बघण्यातील जी मजा आहे ती आपल्याला घेता येणार नाही आणि आम्हाला आमच्या वाचकांच्या मुड खराब करण्याची इच्छा नाही. त्यामुळे आपण स्वतः हा व्हिडियो बघावा आणि त्यातून जे मनोरंजक वाटेल ते घ्यावं.

एक मात्र खरं की व्हिडियोत शेवटी सगळं व्यवस्थित असल्याने आपण चक्क सैलावतो आणि चक्क हसायला लागतो. अतिउत्साह असला की काही वेळा तो अंगाशी कसा येतो हे मात्र हा व्हिडियो दाखवून देतो।हे नक्की. असो. सोबतच शेवटी शेवटी तर अजून एका गोष्टींचं हसायला येतं. या वरतीतल्या लहान मुलांचं. कारण अख्खा प्रसंग समोर घडत असताना ती मात्र आपल्या नाचात मग्न असतात. त्यामुळे त्यांचं ते निरागस वागणं बघत असताना हा व्हिडियो संपतो. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. आणि जर नसेल पाहिला तरी हरकत नाही. आपली टीम पूढे हा व्हिडियो शेअर करेलच, तेव्हा तो बघा आणि आनंद घ्या.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.