Breaking News
Home / जरा हटके / ह्याअगोदर तुम्ही बाइकवरील अशी स्टं’टबाजी कुठेच पाहिली नसेल, बघा अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ

ह्याअगोदर तुम्ही बाइकवरील अशी स्टं’टबाजी कुठेच पाहिली नसेल, बघा अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या टीमने वायरल व्हिडियोज विषयी लेख लिहायला घेऊन बराच काळ लोटला आहे. या कालावधीत आपणा सर्वांनी वाचक म्हणून आमच्या लेखांना जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद ! आज पर्यंत आमच्या टीमने आपल्यासाठी महाराष्ट्र आणि भारतात वायरल झालेल्या व्हिडियोज विषयी लेख लिहिले होते. आजच्या लेखाच्या निमित्ताने आमची टीम आता सीमोल्लं’घन करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वायरल व्हिडियोज आपल्या भेटीस सातत्याने आणू इच्छिते. आज त्यातल्याच एका वायरल व्हिडियो बद्दल थोडंस. हा व्हिडीओ आहे आफ्रिकेतील कोणत्या तरी एका देशातला. आपल्याला व्हिडियोत असं दिसतं की एका रहदारीच्या रस्त्यावर एका बाजूने वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. तर दुसरी कडे मात्र तेवढंस ट्रॅफिक नाहीये. ते दूर कुठे तरी आहे आणि येत्या काही सेकंदात या मोकळ्या रस्त्यावर दाखल होईल. पण तत्पूर्वी रस्त्यावर असलेला एक बाईकस्वार सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

काही जणं भी’तीने तर काही जणं उत्सुकतेने त्याच्या करामतींकडे पाहत असतात. हा बाईकस्वार आपल्या बाईकच्या एका बाजूस बसलेला असतो. पण कसा ? तर जणू काही एखाद्या सोफ्यावरच बसला असेल. त्यामुळे त्याचे हात बाईकवर असतात तर पसरलेले पाय रस्त्यावर. एखादं करकटक फिरवावे तसा तो मोकळ्या रस्त्यात बाईक फिरवत असतो. अशाप्रकारे तो जवळपास पाच चक्कर पूर्ण करतो. बाजूच्या लाईनमधला एक वाहन चालक या बाईकस्वाराच्या अगदी जवळ असतो. तो पूढे जाण्याच्या प्रयत्न करतो पण याच्या चकरांपाई तिथेच थबकतो. तेवढ्यात दूरवर असलेले ट्रॅफिक सुटू लागतं आणि हा बाईकस्वार आपल्या बाईकवर व्यवस्थित स्वार होतो. पण अवघ्या काही सेकंदांसाठी. पुढच्या काही क्षणांतच तो आपल्या बाईकवर उभा राहिलेला असतो. तशाच अवस्थेत तो बाईकला उजव्या बाजूला नेतो. तिथे उभ्या असलेल्या एका वाहनभोवती एक चक्कर पूर्ण करतो. बाईकवर उभा राहून. तो रस्त्यावर असे पर्यंत शांतता असते, पण जसा तो उजव्या बाजूस वळतो लोकांचा जास्त आवाज येणं सुरू होतो. तो तसाच पून्हा त्या रस्त्यावर येतो. समोरून येणारी गाडीवान ब्रेक दाबतो. तरीही हे महाशय मात्र न थांबता इथे तिथे भरकटत असतात.

अर्थात त्याची बाईकवर असलेली हुकूमत यावेळी कळून येते. कोणालाही शारीरिक नुकसान न करता त्याची स्टं’टबाजी चालू असते. पण तो आला रे आला की मात्र फुटपाथ आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या मंडळींची ता’रांबळ उडताना दिसते. काही जण याची मनसोक्त मजा घेत असतात आणि पुढील काही सेकंदात हा व्हिडियो संपतो तेव्हा सगळे जण हसत असतात. या व्हिडियोचं वैशिष्ट्य असं की अथ पासून इतिपर्यंत यात बाईक स्टंटस दिसून येतात. त्यामुळे बाईक स्टंटस बघणं ज्यांना आवडतं त्यांना ही पर्वणीच. या व्हिडियो वरील लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच लेख शेअर ही करा, अगदी नेहमीप्रमाणे. पण तत्पूर्वी काही गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात. आमच्या टीमने या व्हिडियो विषयी लेख लिहिण्याचं ठरवलं ते यातील रो’मांचक भागामुळे. यातील उत्सुकता आणि मजा आपल्या पर्यंत पोहोचावी हा त्याचा उद्देश. पण असं असलं तरीही आमची टीम कोणत्याही प्रकारे स्टं’ट करताना, तज्ज्ञांचे मार्गदर्शन (एक्सपर्ट गाईडन्स), सुरक्षा साधनं (से’फ्टी गिअर्स) नसताना स्टं’ट करण्यास प्रोत्साहन देत नाही.

तसेच असे स्टंटस वाहतुकीच्या रस्त्यांवर, नागरी वस्तीत किंवा इतर कुठेही जिथे कोणाला दु’खापत होऊ शकेल अशा ठिकाणी करण्यासही आमची टीम पा’ठिंबा किंवा प्रो’त्साहन देत नाही. याचं कारण वाहनं आणि त्यांचे स्टं’ट्स सिनेमात किंवा पडदयावर जास्त शोभून दिसतात आणि खऱ्या आयुष्यात कोणत्याही सु’रक्षा साधनांविना आणि नागरी वस्तीत ते धो’कादायक ठरू शकतात. त्यामुळे या व्हिडियोचा आनंद जरूर घ्या पण तसं काही करू नका.

पण तुम्ही एक करू शकता. आमच्या वे’बसाई’टवर असलेल्या इतर वायरल व्हिडियोज वरील लेख नक्की वाचू शकता. त्यासाठी वेबसाईटवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन सिनेमा, नाटक, वेबसिरीज किंवा वायरल व्हिडियो असं लिहून स’र्च करा. आपल्याला आवडतील असे वैविध्यपूर्ण लेख वाचायला मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *