Breaking News
Home / बॉलीवुड / ह्यागोष्टीमुळे झाले होते प्रियांकासोबत ब्रेकअप, हरमनने स्वतः सांगितले ह्यामागचे कारण

ह्यागोष्टीमुळे झाले होते प्रियांकासोबत ब्रेकअप, हरमनने स्वतः सांगितले ह्यामागचे कारण

बॉलिवूडमध्ये जेव्हा हरमन बावेजा आला होता तेव्हा त्याची चांगली फॅन फॉलोईंग झाली होती. जवळपास हृतिक रोशन सारखा लूक असल्यामुळे साहजिकच त्यावेळी हृतिकसारख्या अभिनेत्यासोबत त्याची तुलना सुद्धा झाली होती. सोबतच त्याचे प्रियांका चोप्रा बरोबर अफेअरची चर्चा सुद्धा खूप झाली. परंतु हरमनला दोन्ही ठिकाणी निराशाच हाती आली. एकीकडे त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर दुसरीकडे प्रियांका सोबत असेलेले त्याचे रिलेशन सुद्धा जास्त काळ टिकले नाही. हरमनचा जन्म १३ नोव्हेंबर १९८० ला चंदीगड मध्ये झाला होता. आताच एका मुलाखतीत त्याने त्याच्या आणि प्रियांकाच्या ब्रेकअपवरचे मौन सोडले. प्रियांका आणि त्याचे नातं का पुढे जाऊ शकले नाही ह्यामागचे कारण हरमनने बऱ्याच वर्षाने सांगितले.

हरमन आणि प्रियांकाची मैत्री २००८ मध्ये आलेल्या ‘लव्हस्टोरी २०५०’ ह्या चित्रपटापासून सुरु झाली. त्यावेळी हरमन इंडस्ट्री मध्ये नवीन नवीन आला होता. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, परंतु त्याच्या तिसरा चित्रपट ‘व्हॉट्स युअर राशी’ चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदरच त्यांचे रिलेशन तुटले. दोघांचे हे नाते दोन वर्षही टिकले नाही. ते दोघे का वेगळे झाले ह्यामागचे कारण स्वतः हरमनने एका मुलाखतीत सांगितले. हरमनने सांगितले कि त्याच्याजवळ प्रियांकासाठी वेळ नव्हता. त्याचे दोन चित्रपट अगोदरच फ्लॉप झाले होते, त्यामुळे त्याच्यावर खूप प्रेशर वाढला होता. तो त्याच्या तिसऱ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होता. त्याच्यासाठी ‘व्हॉट्स युअर राशी’ हा चित्रपट खूप महत्वाचा होता. चित्रपटाचे प्रोड्युसर आशुतोष गोवारीकर ह्यांनी सुद्धा त्याला पर्सनल आयुष्यात कोणाला जास्त वेळ न देता चित्रपटावर फोकस कर, अशी सूचना दिली होती. हरमनने सांगितले कि प्रियांका त्यावेळी वेळ देण्यास सांगत होती. परंतु हरमनने तसे केले नाही. त्याने आपले संपूर्ण लक्ष चित्रपटावर केंद्रित केले त्यामुळे प्रियांकासाठी वेळ देणे त्याला शक्य होत नव्हते. ह्याच कारणामुळे दोघांच्या नात्यात खटके उडू लागले आणि दोघेही वेगवेगळे झाले.

काही रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार असं सुद्धा सांगितलं गेलंय कि प्रियांकानेच हरमनसोबत नातं तोडले होते, कारण तो एक यशस्वी अभिनेता बनू शकला नाही. परंतु हरमनने ह्या गोष्टींना सुद्धा खोडत सांगितले कि, मी अश्या अफवांवर विश्वास ठेवत नाही. प्रेमात फक्त दोन व्यक्तीच ओळखू शकतात कि त्यांच्यात काय चुकीचे होत आहे. मला नाही वाटत कि कोणाच्या यशाने कीं अपयशाने रिलेशनशिप मध्ये काही बदल होऊ शकतो. २००८ मध्ये आलेल्या ‘लव्हस्टोरी २०५०’ चित्रपटानंतर २००९ मध्ये हरमनने ‘व्हाट्स युअर राशी’, ‘व्हिक्टरी’ ह्यासारख्या चित्रपटांत काम केले. परंतु दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकले नाही. त्यानंतर त्याने चित्रपटांतून ब्रेक घेण्याचे ठरवले. ५ वर्षाच्या गॅपनंतर त्याने २०१४ मध्ये ‘ढिश्कियाव’ ह्या चित्रपटातून पुनरागमन केले. परंतु हा चित्रपटसुद्धा बॉक्सऑफिसवर चालला नाही. त्यानंतर त्याने पुन्हा चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. सध्या तो धर्मा प्रॉडक्शनच्या ‘भूत – पार्ट वन दि हाँटेड शिप’ ह्या चित्रपटांत काम करत असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. ह्या चित्रपटांत विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कीर्ती खारबांडा ह्यासारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *