Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याने सर्वांसमोर केलेला पावरी डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

ह्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याने सर्वांसमोर केलेला पावरी डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

खान्देश म्हंटलं की काय आठवतं ? मस्त असं चविष्ट जेवण. खान्देशी रेसिपीज चाखल्या आणि त्यांच्या प्रेमात पडला नाही असा कोणी विरळाच असेल. किंबहुना नसेलच. असाच हा प्रेमात पाडणारा खान्देशचा प्रदेश प्रसिद्ध आहे एका डान्स साठी. त्यातही मालेगाव हा भाग तर या डान्स साठी अतिशय प्रसिद्ध आहे. या डान्सच्या व्हिडियोज नी युट्युबवर अनेक वेळेस करोडो व्ह्यूजचा टप्पा सहज ओलांडलेला दिसून येतो. इतका हा नृत्य प्रकार लोकप्रिय आहे. आज आपल्या टीमने पुन्हा एकदा पाहिलेल्या व्हिडियोतून या नृत्य प्रकाराची आठवण झाली. या व्हिडियोला ही ९ करोड हुन अधिक व्ह्यूज आले आहेत. हा व्हिडियो आहे एका नवपरिणीत जोडप्याचा. लग्न झाल्यावर आपला आनंद व्यक्त करताना हे दोघेही हा प्रसिद्ध नृत्य प्रकार सादर करताना दिसतात. या नृत्य प्रकाराचं नाव आहे ‘तीन पावरी’ डान्स.

नाव जसं अगदी मजेशीर आहे तसाच डान्स ही अतिशय मजेशीर असतो. यात जे सहभागी होतात, ते एक डान्स स्टेप दोनदा सारख्या करतात. मग तिसऱ्या वेळी नवीन स्टेप केली जाते. ती ही दोन वेळा केली जाते. मग पुन्हा नवीन स्टेप केली जाते आणि हे चक्र सुरू राहतं. अर्थात नृत्य ही अशी कला आहे ज्यात कलात्मकतेला प्रचंड वाव असतो. त्यामुळे प्रत्येक नवीन स्टेप ही त्या नृत्यात रंग भरत असते.त्यात डान्स करणारे ही कलात्मक असले की मजा वाढतेच. हा व्हिडियो सुद्धा यास अपवाद नाही. यात हे जोडपं उपस्थितांच्या साथीने हा तीन पावरी डान्स करत असतं. सोबत त्यांचे मित्रपरिवारातील काही जण ही नाचत असतात. व्हिडियो च्या सुरुवातीला त्यांचं दर्शन होतं आणि मग पूर्ण व्हिडियो भर त्यांचा केवळ आवाज ऐकू येतो. हा डान्स करत असताना नवपरिणीत जोडप्याचा उत्साह बघण्यासारखा असतो. पाठी गाणं ही मस्त लागलेलं असतं. त्याची धून आपल्या लक्षात राहते. त्या धुनेला साजेसा असाच डान्स चालू असतो. त्यात एक काकू येतात आणि कौतुक म्हणून काही पैसे ओवाळून या व्हिडियोतील ताईला देतात.

काही वेळाने एक काका येऊनही कौतुक करून जातात. पण हे जोडपं काही थांबत नाही. ते आपल्या डान्स मध्ये मस्त मग्न असतात. एकेक छान छान स्टेप्स करत त्यांचा डान्स पुढे जात असतो. दोघांचं ट्युनिंग ही अगदी उत्तम असल्याचं जाणवतं. करण पवार यांनी हा व्हिडियो अपलोड केलेला आहे. या व्हिडियोस आजपर्यंत ९ करोड हुन अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि ते ही केवळ एका वर्षात. यावरून हा व्हिडियो किती झपाट्याने लोकप्रिय झाला आहे याची कल्पना यावी. या व्हिडियोतुन आपल्याला नवीन आणि मनोरंजक असं काही बघायला मिळतं हे नक्की. त्याबद्दल करण यांचे आभार. आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला असेल त्यांना हा व्हिडियो आवडला असेलच. सोबतच हा लेख ही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नित्यनेमाने आपल्या वाचकांसाठी विविध विषयांवर लेखन करत असते. ते प्रसिद्ध ही करत असते. आपल्याला ही हे लेखन आवडतं हे आपण आमचे लेख शेअर करता तेव्हा कळून येतं. आपल्या या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !! आपल्या टीमविषयी असणारा आपला लोभ कायम असावा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *