Breaking News
Home / मनोरंजन / ह्याला म्हणतात खरं टॅलेंट, ह्या मुलांचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्याला म्हणतात खरं टॅलेंट, ह्या मुलांचे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

या जगात सगळ्यात जास्त न-शा देणारी गोष्ट कोणती आहे, माहितीय का? तुम्हीही म्हणाल… दा-रू, गां-जा आणि इतर काही जे असेल ते… मात्र तुम्ही चुकताय. या जगात सगळ्यात जास्त न-शा देणारी गोष्ट आहे, संगीत. संगीत मग कुठलेही असो. म्हशीच्या गळ्यात बांधलेली घंटा ही गुराख्यासाठी संगीत असते. म्हैस, गाय गुराख्यापासून दूर गेल्या आणि या घंटेचा आवाज तर त्याला नाही आला तर तो बैचेन होतो. ही बैचेनी खुप मोठी आणि मनाची चलबिचल वाढवणारी असते.
एखादा वारकरी जेव्हा भक्तीत तल्लीन होतो. मृदंग, टाळ आणि विठ्ठलनामाचा घोष त्याच्या हृदयात चालू असतो. आणि जर अचानक मृदंग वाजायचा बंद झाला तर त्याचे डोळे खाडकन उघडतील. ही आहे संगीताची जादू. संगीत आपल्या आयुष्यात एकदम महत्वाची भूमिका आपल्या कळत नकळत निभावत असते. आपल्यावरील मानसिक आणि शारिरीक ताण कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात. ताण कमी झाल्याने प्रोडक्टटीव्हिटी सुधारते. मात्र सगळ्याच प्रकारचे संगीत प्रत्येकाला आवडेल असे नाही.

म्हणजे घरात आजोबांना जुनी हिंदी गाणी ऐकायला आवडतात, तरुणाला नवी आणि भारी तर घरातील महिलांची गाण्याची चॉईस वेगळी असते. म्हणजे महिलांना मुलांची गाणी आवडणार नाहीतर आवडली तरी त्यात त्या रममाण होणार नाहीत. स्वतःला आवडणाऱ्या संगीतात माणूस रममाण होतो. टाळ-मृदंगच्या नादात तल्लीन होणारा डीजेच्या आवाजात रमू शकत नाही. डीजेच्या आवाजात रमणारा हलगी-ताशात रमणार नाही. तर अशी ही संगीताची नशा आहे. पण काही गाणी किंवा गायक असे असतात, जे सगळ्याच वयातील लोकांना भावतात. कधी कधी एकदम साध्या लोकल गायकांची गाणी इतकी फेमस होतात की, ती सगळेच ऐकत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमच्या टीमकडे आला. हा व्हिडीओ प्रत्येक वयातील माणसाला भावणारा आहे. 3-4 लहान मुलांनी एकत्र येत ‘धडकन धडकन’ हे गाणं म्हटलं आहे. या मुलांचे वय 12 ते 15 या दरम्यान आहे.

प्रत्येक पिढीला भावणार हे गाणं त्यांनी इतकं सुंदर गायलं आहे की, कुणीही जेव्हा हे गाणं पाहायला घेतलं आणि त्याने ते अर्ध्यावर सोडलं… असं झालंच नसेल. या मुलांचा आवाज आणि गाणं गाण्याची पद्धत तर एकदम आपला मूडच बदलून टाकणारी आहे. खरं तर हे गाणं दुःख दाखवणार आहे, मात्र या मुलांनी ते असं गायलं आहे की, या गाण्याला आपण एन्जॉय करू लागतो. अजून एक कौतुकाची बाब म्हणजे गाणं गाताना या मुलांनी अवघ्या एका गिटारचा वापर केला आहे. दुसऱ्या कोणत्याही वाद्याचा वापर त्यांनी केलेला नाही.

तुम्हीही हे गाणं बघा आणि मूड फ्रेश करून घ्या बॉस… ये गाना देखने के बाद तुम्हारा दिन बन जायेगा… हा व्हिडीओ पूर्ण बघितल्यावर आपल्याला वाटतं यार… हे खरं टॅलेंट आहे आणि हेच टॅलेंट मागे आहे. रिऍलिटी शो मध्ये असे कलाकार असायला हवे, असं आपल्याला सहजच वाटून जातं. आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *