Breaking News
Home / मनोरंजन / ह्याला म्हणतात खरं टॅलेंट, व्हिडीओ होत आहे वायरल, स्वतः पं’तप्रधानांनी सुद्धा केले ट्वि’ट

ह्याला म्हणतात खरं टॅलेंट, व्हिडीओ होत आहे वायरल, स्वतः पं’तप्रधानांनी सुद्धा केले ट्वि’ट

सोशल मीडिया म्हणजे आपल्यातल्या सुप्त गुणांना सगळ्यांसमोर सादर करण्याचं एक सशक्त माध्यम झालं आहे. आपल्यातील अनेक जण युट्युब, इंस्टा, एफ.बी. च्या माध्यमांतून स्वतःतील कलांना सादर करत असतात. पण समाजातील काही घटक असेही आहेत की त्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला आपल्या प्रमाणे व्यक्त होता येत नाही. पण ते ताकदीचे कलाकार असतात, अशावेळी आपल्यातील अनेक कलासक्त मंडळी, अशा गुणी कलाकारांना सगळ्यांसमोर आणत असतात. मागच्या आठवड्यात आपल्या टीमने प्रसिद्ध केलेला एक लेख आठवा. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेरांच्या संभाषण शैलीला जपणाऱ्या, कलाकारांविषयी लिहिलं होतं. पण तो व्हिडियो आपल्या सारख्याच कलासक्त व्यक्तीकडून चित्रित झाला होता. तसेच एकदा सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनीही एका वासुदेवाला थांबवून त्यांचं गाणं आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्याद्वारे ऐकवलं होतं. तो व्हिडियो ही वायरल झाला होता. असाच काहीसा एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या पाहण्यात आला.

या व्हिडियोत आपल्याला दोन तरुण आपल्या वाद्यांसह उभे असलेले दिसतात. एरवी आपलं गाणं गात सर्वत्र फिरणारे हे तरुण. आज त्यांना एका व्यक्तीने आपल्या घरच्या अंगणात बोलवलेलं असतं. त्यांच्या गाण्यातली ताकद त्याने अनुभवलेली असते आणि आपल्या घरच्यांनाही त्याची अनुभूती व्हावी ही त्यांची अपेक्षा असते. यात अगदी बच्चे कंपनीपासून ते मोठे मंडळी सगळे आले. बरं घरच्यांचा विचार आला की व्हिडियो रेकॉर्डिंग करणं आलंच. कारण हे क्षण जपले गेले पाहिजेत. त्यामुळे ही दोन मुलं गाणं गाण्यास सुरुवात करतात आणि ही व्यक्ती व्हिडियो रेकॉर्ड करण्यास सुरुवात करते.व्हिडियो सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत, आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांचं गाणं ऐकत राहतो. भोला है भंडारी हे महादेवाचं गुणगान करणारं गीत अतिशय आर्ततेने ही तरुण कलाकार मंडळी सादर करतात. तसेच महादेवाची स्तुती करणारी इतर गाणीही ही गायक जोडी सादर करते. या काही मिनिटांच्या व्हिडियोत आपण अतिशय तन्मयतेने त्यांचं गायन ऐकत राहतो. कारण एक तर महादेव म्हणजे आपले जीव की प्राण. त्यांची स्तुती करणारी गीतं आपण एरवीही ऐकत असतोच.

पण तेवढंच महत्वाचं दुसरं कारण म्हणजे या दोन तरुण गायकांचं एकमेकांसमवेत असलेलं अफलातून ट्युनिंग. दोघांचा आवाज तर उत्तम आहेच, सोबत एकमेकांसोबत गाणं सादर करण्याची सहजता भावून जाते. अतिशय खणखणीत आवाजात गाणं सादर केलेलं असलं तरीही आवाजातले योग्य ते चढ-उतार, स्वरांची जुगलबंदी यांमुळे गाणं श्रवणीय होतं. या जोडीच्या गाण्यांविषयी लिहावं तेवढं थोडंच. आमची टीम ही उत्तम श्रोत्यांनी बनलेली टीम आहे. पण गाण्यातील तांत्रिक बाजू अजून चांगल्या पद्धतीने सांगण्यात मर्यादा येतात. अर्थात तरीही या मुलांच्या गाण्याचा आनंद मात्र आम्ही नक्की घेतला. तुम्ही ही हा आंनद घेतला असेलंच. कारण त्यांचं गाणं थेट काळजाला भिडतं. बरं फक्त हे केवळ आमचंच म्हणणं नाही. तर पूर्ण भारतवर्षातून हे म्हंटलं जातं आहे.

थोडं रिसर्च केल्यावर असंही जाणवतं की एका युट्युब चॅनेल ने एक दीड वर्षांपूर्वी या गायकांचा असाच व्हिडियो प्रदर्शित केला होता. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी सध्याचा व्हिडियो भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पाहिला आणि त्याबद्दल ट्विट केल्याचे कळते. त्यांनी केलेल्या ट्विटवर दश लक्षाहुन अधिकांनी हा व्हिडियो बघितल्याचं कळतं. अर्थात याचं श्रेय जातं ते हा व्हिडियो रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला आणि नंतर त्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना. दु’र्दैवाने या मुलांची नावे उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या विषयी अजून काही जाणून घेता येत नाही. असो. या निनावी तरुणांना त्यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तसेच यशस्वी आणि निर्धोक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आपल्याला या मुलांच्या गाण्यांविषयी काय वाटतं हे कमेंट्स मधून कळवायला विसर पडू देऊ नका. आणि त्यानंतर आपल्या टीमने केलेले अन्य लेख वाचायला आणि शेअर करायलाही विसरू नका. मराठी गप्पाच्या मराठमोळ्या टीमला आपला जो पाठिंबा लाभतो आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *