Breaking News
Home / मनोरंजन / ह्याला म्हणतात खरा नागीण डान्स, महाशय नागीण डान्स करत चक्क मंडपाच्या वरच चढले, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसू आवरणार नाही

ह्याला म्हणतात खरा नागीण डान्स, महाशय नागीण डान्स करत चक्क मंडपाच्या वरच चढले, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसू आवरणार नाही

वायरल व्हिडियोज वर लेख लिहिण्यात आपल्या टीमचा हातखंडा आहे हे आपण जाणताच. यामुळे आपलं जे अतोनात प्रेम आपल्या टीमला मिळत असतं, त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. या प्रवासात आपल्या टीमच्या नजरेस अनेक व्हिडियो पडले आणि त्यांवर प्रत्येकी एक असा लेख लिहिला गेला. पण आज जो व्हिडियो आपण पाहिला आहे तो पाहून मात्र काय लिहावं असाच प्रश्न पडला. म्हणजे व्हिडियोत काहीच कंटेंट नाहीये असं नाही, पण एवढा अतरंगी व्हिडियो आपण खचितच पाहिला असेल. तुम्हालाही आता उत्सुकता लागून राहिली असेल काय आहे या व्हिडियोत? यात आहे नागीण डान्स, पण अतरंगी. चला याविषयी अजून सविस्तरपणे जाणून घेऊयात. हा व्हिडियो एखाद्या समारंभातला वाटतो. कारण बांबू लावून अगदी मस्त मंडप वगैरे उभा केलेला असतो. फुल हळदीवाल्या वाईब्स येतात ना. पण तेवढ्यात आपलं लक्ष जातं एका अतरंगी माणसाकडे.

कारण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून नागीन डान्स म्युझिक वाजत असतं आणि एक माणूस चक्क रांगत रांगत पुढे येत असतो. त्याचा सरपटत येण्याचा हा प्रयत्न एवढा हास्यास्पद वाटतो की अगदी पहिल्या क्षणापासून हसू येतं. पण हे साहेब त्यांच्या भूमिकेत अगदी घुसलेले असतात. त्या गाण्याच्या नादात स्वतःला नागोबा समजलेले असतात. एवढं की समोर त्या मंडपाचा एक बांबू येतो त्यावर हा माणूस सरपटत सरपटत चढायला लागतो. आता एक दोन वेळा पडतो की काय असं वाटत असताना कसा बसा हा मानवी नागोबा थेट मंडपाच्या छतावर चढतो. अरे तो मंडप आहे, गच्ची थोडी आहे असं आपण म्हणत असतो. अपेक्षा असते की हे नागोबा खाली येतील. पण हे पात्र अंगात भिनलेले नागोबा सळसळत थेट मंडपाच्या छतावरून प्रवास करू लागतात. कोसळायचं सगळं असं चट्कन मनात येतं. पण सोबत आपण हसतही असतो. काय रे देवा म्हणत पुढे काय घडतंय ते पाहत असताना मंडपाच्या दुसऱ्या बाजूने हे मानवी नागोबा प्रकट होतात. थेट उलटं होऊन दर्शन देत असतात. स्मार्ट फोन हातात घेतलेले भाविक सोशल मीडियावर लाईक्स मिळावेत म्हणून या नागोबा देवाचे फोटो काढत असतात. तो ही दोन्ही हाताने पोज देत फोटो काढून घेत असतो. आणि आपण मनात म्हणत असतो, ‘सांभाळ रे भावा, नाहीतर खाली आलास तर थेट फणा आणि कणा दोन्ही मोडायचे’.

पण सुदैवाने तसं काही होत नाही. हे मानवी नागोबा खाली येतात. पण भूमिका मात्र अंगात भिनलेली असते. बरं त्यांना प्रोत्साहन द्यायला त्यांचे एक स्नेही हातरुमालाची पुंगी घेऊन वाजवत असतात. त्यामुळे व्हिडियो संपतो पण नागोबाची भूमिका अगदी जगत, हे दादा अजूनही परफॉर्मन्स देत असतात. आपण नागीन डान्स काही पहिल्यांदा पाहिलेला नाही. आपल्या आजूबाजूला, अनेक ओळखिच्यांनी, एवढंच कशाला आपण सुद्धा हा प्रकार केलेला असतो. पण हा व्हिडियो म्हणजे त्या सगळ्या प्रकारांवर केलेली वरकडी म्हणायला हवी. अर्थात असं करत असताना दुखापत होऊ शकते, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. वर मजा मस्करीत काही उल्लेख झाले, पण खरंच मंडपाच्या छतावरून उलटं लटकणं जोखमीचंच. आपण सुज्ञ आहात तेव्हा जास्त सांगणे न लगे. त्यामुळे व्हिडीओ पाहून लगेच असे भलते सलते पराक्रम करू नका, हि वाचकांना विनंती. हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापूर्ती आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

आपल्याला हा व्हिडियो आवडला असेल, गंमतीदार वाटला असेलच. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. खास आपल्या वाचकांसाठी आपली टीम विविध विषयांवर लेखन करत असते. आपणही त्या लेखांना शेअर करत , प्रोत्साहनपर कमेंट्स करत आमचा उत्साह टिकून राहील हे पाहत असता. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला हा पाठिंबा यापुढेही आपल्या टीमच्या पाठीशी राहील हे नक्की. लोभ कायम असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *