Breaking News
Home / जरा हटके / ह्याला म्हणतात खरी रॉयल एंट्री, व्हिडीओ पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल

ह्याला म्हणतात खरी रॉयल एंट्री, व्हिडीओ पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल

आपल्या टीमने आजवर अनेक लेख लिहिले आहेत. त्यात मनोरंजन विश्वातील बातम्या, कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा, वायरल व्हिडियोज, सामान्य ज्ञानाविषयीचे लेख, उत्तम काम करणारे समजातील घटक असे विविध विषय हाताळले गेले आहेत. आजच्या या लेखात यातील दोन विषय पहिल्यांदा एकत्र झालेले दिसून येतील. एक म्हणजे वायरल व्हिडियोज आणि दुसरा म्हणजे उत्तम काम करणारे समाजघटक. उत्सुकता जास्त ताणून न धरता, चला जाणून घेऊयात. झालं असं की आपल्या टीमने एक व्हिडियो पाहिला. मस्त एडिट केलेला व्हिडियो होता. सोबत त्यातील कंटेंट ही आवडून गेला. काय होतं त्यात? त्यात एक आय.ए.एस. अधिकारी एखाद्या ठिकाणी येत असताना त्यांना कशाप्रकारे मानसन्मान दिला जातो हे दाखवलं होतं. त्यात अर्थातच पोलीस दलाकडून केला जाणारा कडक सॅल्युट म्हणजे तर शानच.

कारण पोलीस म्हणजे शिस्तयुक्त दरारा. असे पोलीस ज्यांना कडक सॅल्युट ठोकतात, त्यांचं कौतुक वाटणारंच ना. हा व्हिडियो असतो आय.ए.एस. अधिकारी स्मिता सबरवाल यांचा. हा व्हिडियो तर आवडून जातोच आणि त्यामुळे स्मिताजीं विषयी जाणून घेण्याची उत्सुकता ही निर्माण होते. याच उत्सुकतेतून आपल्या टीमने त्यांच्या विषयी काहीशी माहिती मिळवली ती पुढे देतो आहोत. स्मिता सबरवाल यांचा जन्म पश्चिम बंगाल प्रांतातला. वडील सैन्यदलात कार्यरत होते. कर्नल प्रणब दास असं त्यांचं नाव. त्यांच्या पत्नीचं नाव पुरबी दास होय. या दोघांना जे कन्यारत्न झालं ते म्हणजे स्मिताजी. स्मिता जी अभ्यासात अग्रेसर होत्या. त्यांनी आय.सी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत पहिलं येण्याचा मान पटकावला होता. तसेच यु.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून त्या चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या. नवीन शतकाची पहाट होण्याच्या हा काळ. अवघं २३ वर्षे वयोमान. पण तल्लख बुद्धी, आत्मविश्वास, मेहनत, चिकाटी यांच्यामुळे त्यांनी त्या काळात सगळ्यांत तरुण आय. ए. एस. अधिकारी होण्याचा मान मिळवला होता. बरं एवढं करून त्या थांबल्या नाहीत.

त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कार्यकक्षेच्या सीमा या सदैव रुंदवतच गेल्या. त्यांच्या या कार्यकाळात अनेक महत्वाची कामं त्यांनी केली. पण त्यांचं सगळ्यांत जास्त लक्षात राहिलेलं काम म्हणजे करीमनगर जिल्ह्यातील त्यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेलं योगदान. तसेच तेथील पायाभूत सुविधा बदलण्यासाठी त्यांनी केलेले कौतुकास्पद ठरले. त्यासाठी त्यावेळेस त्यांना थेट पंतप्रधान यांच्यातर्फे भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचं कळतं. लोकोपयोगी कामं करत असताना, लोकांमध्ये मिसळणही त्यांना आवडतं असं दिसून येतं. तसेच त्यांच्या भाषणांना अनेकांची पसंती मिळते हे ही दिसून येतं. मुळातच असलेली शिस्त, त्याला असलेली कर्तृत्वाची जोड यांमुळे आधीच सुंदर आणि रुबाबदार असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व अजून खुलून दिसतं. आज जवळपास दोन दशकं या क्षेत्रात काम करत असूनही त्या अगदी न थकता कार्यरत असतात. यापुढेही त्यांचं काम असंच सातत्याने सुरू राहील हे नक्की. आपल्या टिमकडून तडफदार आय.ए. एस. अधिकारी स्मिता सबरवाल यांना मानाचा मुजरा. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा लेख आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल अशी अपेक्षा आहे. लिखाण करत असताना आपल्या वाचकांना माहितीपूर्ण लेखही वाचायला मिळावेत याकडे आपल्या मराठी गप्पाच्या टीमचा कटाक्ष असतो. त्यात आपण यशस्वी ठरतो आहोत हे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि लेखांना मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जाणं यातून कळून येतं. यापुढेही आपला हा पाठींबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम रहावा ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *