Breaking News
Home / मनोरंजन / ह्याला म्हणतात डान्सची खरी जुगलबंदी, भारत आणि रशियाच्या ह्या डान्सर्सने केलेला डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल

ह्याला म्हणतात डान्सची खरी जुगलबंदी, भारत आणि रशियाच्या ह्या डान्सर्सने केलेला डान्स पाहून तुम्ही देखील कौतुक कराल

आपली टीम सातत्याने नवनवीन विषयांवर लेखन करत असते. असं असलं तरीही काही विषय हे वारंवार येतात. कारण ते आपल्याला आणि आम्हाला ही तेवढेच भावतात. यातील दोन विषय म्हणजे वायरल व्हिडियोज आणि उदयोन्मुख कलाकार. फार कमी वेळेस असं होतं की हे दोन्ही विषय एकत्र येतात. पण जेव्हा अस होतं तेव्हा खरंच धमाल अनुभव येतो. आजही आपल्या टीमला असाच धमाल अनुभव आला. तोच अनुभव आपल्या वाचकांना मिळावा अस ठामपणे वाटलं आणि हा लेख लिहिला जातो आहे.

आज आपण ज्या उदयोन्मुख कलाकाराविषयी बोलणार आहोत त्याचं नाव आहे रमेश यादव. कदाचित आपल्याला पटकन कळालं नसेल. पण हिप हॉप डान्स प्रकारात याच मुलाचं नाव सध्या गाजतय. आपण या डान्स प्रकारात प्रसिद्ध असलेलं ‘टोर्नेडो’ हे नाव ऐकलं असेल. तोच हा रमेश. अतिशय गरीब परिस्थितीतून उभारी घेणारा डान्स कलाकार. घर चालावं म्हणून डिश टीव्ही लावायची कामे करत असे. पण त्याआधी कित्येक वर्षांपासून त्याचा बिबोईंग, हिप हॉप चा डान्स प्रवास चालू झाला होता. बरीच वर्षे मेहनत करूनही त्याला म्हणावं तस यश मिळत नव्हतं. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. सब्र का फल मिठा होता हैं अस म्हंटलं जातं. इथेही तसच झालं. त्याच्या अथक परिश्रमाने त्याने स्पर्धा जिंकून घ्यायला सुरवात केली.

अगदी डान्स करण्यासाठी पूर्णपणे फिट नसताना सुदधा त्याने विजेतेपद पटकावलं. त्याच्या आजातगायतच्या कारकिर्दीतील एक महत्वाची स्पर्धा म्हणजे रेड बुल बी.सी.वन वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१९. या स्पर्धेत त्याने सर्वोत्तम किताब मिळवला आणि त्याच नाव जगभरात लोकप्रिय होण्यास मदतच झाली. यात मुख्य हातभार लागला तो त्याने रशियन डान्सर झिप रॉक विरुद्ध केलेल्या डान्स बॅटलचा. याच डान्स बॅटलचा व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला टोर्नेडो आणि झिप रॉक एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले दिसतात. टोर्नेडोच्या देहबोलीतून आत्मविश्वास झळकत असतो. तर याउलट झिप रॉक काहीसा शांत वाटत असतो. तेवढयात मग दोघांची डान्स बॅटल सुरू होते आणि मग एक जबरदस्त नजराणा बघायला मिळतो. झिप रॉकच्या सादरीकरणाने हा परफॉर्मन्स सुरू होतो. त्याच्या डान्स मुव्ह्ज आवडून जातात. त्याने केलेला हॅन्ड स्टॅन्ड उत्तम. पण पिक्चर अभि बाकी हैं मेरे दोस्त. आपला टोर्नेडो येतोच अगदी जोशात. एक कोलांटी उडी मारत थेट झिप रॉक च्या पुढ्यातच जाऊन उभा राहतो , जणू काही त्याचं आव्हानच स्वीकारलं हे तो दाखवून देतो.

मग काही वेळात त्याच्या डान्सचा असा काही जलवा बघायला मिळतो की टांगा पलटी घोडे फरार बघा. त्यात त्याच नाव तो अगदी सार्थ करतो. टोर्नेडो म्हणजे चक्रीवादळ. या वादळा सारख्या डान्स मुव्ह्ज जबरदस्त असतात. त्यात हातांचा आधार घेत केलेल्या या मुव्ह्ज मन जिंकून जातात. यानिमित्ताने तो या स्पर्धेत सर्वोत्तम का ठरला असावा याचा एक अंदाज येतो. पुढच्या त्याच्या स्टेप्स त्याचं पदललित्य दाखवतात. एक वेळ तर अशी येते की बस फुगडी घालतोय की काय पठ्ठा अस वाटतं. पण त्याची ती डान्स मूव्ह खरंच अप्रतिम म्हणावी अशीच ठरते. आपल्या लक्षात राहते. अगदी नीट पाहिलं तर त्याच्या या डान्स मुव्ह्ज कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह, जवळच बसलेल्या कॅमेरामनलाही होतोच. मग पुन्हा झिप रॉक येतो. त्याच्या डान्स मुव्ह्ज ही खूप छान असतात. पण एव्हाना आपलं लक्ष टोर्नेडो काय सादरीकरण करतो याकडे लागलेलं असतं. पुन्हा त्याची एंट्री अगदी दणक्यात होते. झिप रॉकला जणू आव्हान दिल्यागत त्याचा डान्स होत असतो. यावेळी ही त्याच्या डान्स मुव्ह्ज भुरळ पाडतात. यावेळी तर हातांवर उलट उभं राहत तो जी स्टेप करतो ती अगदी लाजवाब म्हणावी अशी आहे. त्याने दाखवलेली लवचिकता कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे.

याच प्रमाणे त्याचा डान्स होत राहतो आणि मग डान्स बॅटल संपते आणि व्हिडियो सुद्धा. आपण जरीही हिप हॉप, बिबोइंग किंवा इतर पाश्चिमात्य डान्स प्रकार कधी बघत नसलात तरीही हा व्हिडियो तुम्हाला आनंद देऊन जातो. अर्थात याच श्रेय जात ते टोर्नेडो याच्या सादरीकरणाला. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असेल.

यानिमित्ताने टोर्नेडो या आपल्या अस्सल भारतीय कलाकारास त्याच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !! पाश्चिमात्य डान्स प्रकारात आपलं नाव असच मोठ्ठं करत राहा, यशस्वी होत राहा आणि धनवान सुदधा. तसेच मंडळी, आपल्याला हा लेख आवडला असेल ही खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. त्यातून आम्हाला जे प्रोत्साहन मिळतं त्यातून लेखन करण्यासाठी हुरुप येतो आणि नवनवे उत्तम असे लेख लिहिले जातात. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला कायम मिळत राहू द्या. तसेच नेहमीप्रमाणे लेख मोठ्या प्रमाणात शेअर करा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.