देशात को’रोनामुळे 2 वर्षांपूर्वी हाहाकार माजला होता. तेव्हा संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू होता. अनेक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली होती. फक्त मेडिकलची दुकाने चालू होती. त्या काळात बेवड्या लोकांची तर फारच मजा आली… कितीही प्रयत्न करून त्यांना दारू मिळत नव्हती. लॉकडाउनमुळे दारू मिळणे कठीण झाले होते. मात्र, “शौक बडी चिज है’ यासाठी दारूडे काहीही करायला तयार होते. पाहिजे तेव्हढे पैसे घ्या लन दारू द्या, अशी भूमिका त्यांची होती. अधिकची किंमत देऊन दारूची खरेदी चालू होती. काही सॅनिटायझरवर दारूचा शौक पूर्ण करीत होते. मात्र, याच दारूमुळे धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी दंडुक्याचा चांगलाच प्रसाद दिला होता. त्याकाळात असे अनेक दारुड्या लोकांचे किस्से समोर आले, अगदी काहींचे तर व्हिडीओ पण समोर आली आणि याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. आता असाच एक जुना पण नव्याने व्हायरल होत असलेला व्हिडीओ आमच्याकडे आला आहे. हा व्हिडिओ लग्नाच्या आधीच्या दिवशी घडलेल्या एका गमतीदार घटनेचा आहे.
अनेकवेळा लग्नात अशा घटना पाहायला मिळतात, ज्याची कुणालाही अपेक्षा नसते. लग्नात वेगवेगळे प्रकरण घडलेले तुम्ही ऐकलेच असेल. सध्या असंच एक प्रकरण सोशल मीडियावर समोर आलं आहे, जे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे आणि त्याच वेळी हसूही आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. खरंतर लग्नाच्या दिवशी सगळेच पाहुणे मंडळी लग्न दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि परंतु अनेकवेळा वराच्या बाजूचे काही लोक वरातीत येतानाच दारु पिऊन येतात, ज्यामुळे बऱ्याचदा वातावरण खराब होतं. या लग्नात तर आधीच्या दिवशीच बेवड्या लोकांनी आपली टाकी फुल केली आहे. आणि त्यानंतर नाचून नाचून जो धिंगाणा घातला आहे, ते पाहून तर तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येते की, काही पाहुण्या मंडळींनी दणकून दारू पिली आहे. मात्र आता त्यांना कुठलीही शुद्ध राहिलेली नाही. त्यातील एका मद्यधुंद झालेल्या पाहुण्याने गाणे डीजे लावायला लावले आणि लग्नाचे संपूर्ण वातावरण बिघडवले. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, काही पाहुणे नाचत आहेत. मात्र नाचणे कमी आणि धिंगाणा जास्त चालू आहे. यात काही पाहुणे तर चक्क कुठेही, कसेही लोळताना दिसत आहेत.
एकाने तर चक्क खाली अंथरलेली चटई अंगावर घेतली, जी खूप घाण झाली होती. दुसरा तर त्याच्यापुढचा निघाला, तो अजूनच त्या चटईत घूसला. आधीचा नाचत नाचत रागाने बाहेर पडला. आता या दुसऱ्या पाहुण्याला धड आपल्या पायावर उभं देखील राहण्याची शुद्ध नव्हती. तो सारखा इकडे तिकडे पडत होता, तेव्हा त्याच्या जवळचा नातेवाईक त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्यातच या धडपड्या पाहुण्याने शेजारून चाललेल्या पोराला मोकार लाथ मारली… ते बिचारं तिकडून चाललं होतं. काम न धाम त्याला कुदवला. म्हणजे पिल्यावर कोण-कुणाचा आणि कशासाठी राग राग करत होते, काही कळत नव्हतं. यापूर्वी पण तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असेल पण तुमच्या हसवेल असा हा राडा या 2 पाहुण्यांनी केला आहे. मनातील सर्व विचार, टेन्शन विसरून हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच पहा आणि तुमच्याही मनाची मरगळ घालवा.
बघा व्हिडीओ :