Breaking News
Home / बॉलीवुड / ह्याला म्हणतात नशीब, काही क्षणाअगोदर लहान मुलगी गाडीतून उतरली आणि बघा पुढे काय घडलं ते

ह्याला म्हणतात नशीब, काही क्षणाअगोदर लहान मुलगी गाडीतून उतरली आणि बघा पुढे काय घडलं ते

सोशल मीडियावर रोज काही ना काही नवीन घटना वायरल होत असतात. ह्यात मजेदार व्हिडीओ असे असतात जे आपल्याला पार हसवून सोडतात. तर काही अद्भुत करामती असतात जे पाहून आपण सुद्धा विचारात पडतो. परंतु काही घटना अश्या असतात ज्या पाहिल्यावर तुमचा स्वतःचा विश्वास बसत नाही. तुम्ही ते सारखे सारखे बघून पण तुमचे समाधान होत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ वायरल होत आहे. ‘देव तरी त्याला कोण मारी’ हि म्हण हुबेहूब ह्या व्हिडीओला सार्थ ठरत आहे. जर दैव तुमच्या सोबत असेल तर कधी कधी भल्यामोठ्या संकटापासून सुद्धा तुमची सुटका होते. काही सेकंद सुद्धा तुमचा जीव वाचवण्यास पुरेशी ठरतात हे दाखवून देणारा हा व्हिडीओ आहे. चला तर जाणून घेऊया नक्की असं काय घडलं ते.

राजस्थानमधील राजसमंद येथून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून, त्यात चार वर्षांची एक मुलगी तिच्या नशिबाने आणि अगदी काहीच सेकंदाच्या फरकाने जिवानिशी वाचली असल्याचे समोर आले आहे. खरं तर, ही मुलगी तिच्या घरासमोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये खेळत होती आणि त्याचवेळी अशी एक घटना घडली की ज्यामध्ये या मुलीचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यात ही घटना कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये काय दाखवले आहे
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये 50 वर्षीय भैरू लाल हे त्यांच्या दुकानासमोर बसले असल्याचे दिसून येत आहे आणि त्यांची चार वर्षांची मुलगी ही बाहेर उभ्या असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये खेळत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या पुढील भागात कारमध्ये खेळणारी मुलगी कारमधून बाहेर पडताना ही घटना घडल्याचे दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, ही मुलगी जेव्हा त्या कार मधून बाहेर पडली त्यांनतर अगदी काहीच सेकंदात दुकानासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने भैरूलाल यांच्या अल्टोला जोरदार धडक दिली आहे. हा अपघा’त इतका भीषण होता की अपघा’तात वाहनाची पुढील चाके उडून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे या फुटेजमध्ये दिसून येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजसमंदच्या खमनौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेडाच्या भागलमध्ये घडली होती. दुकानाचे मालक भैरू लाल यांनी सांगितले की, ते त्यांच्या दुकानात बसले होते आणि त्यांची मुलगी कारमध्ये खेळत होती, त्याचवेळी हा अपघा”त झाला. अपघा’तानंतर आरोपी चालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना समोर आल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याबाबत यूजर्स विविध कमेंट्सही करत आहेत.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *