सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. जे पाहताना आपला वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला हसू तर आवरणार नाही. शिवाय तुम्हाला या व्यक्तीची कीव येईल. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती काही प्राण्यांसोबत मस्त मजा आणि मस्ती करत असतो आणि अगदी त्या प्राण्यांच्या सोबत खेळताना पण दिसतो, परंतु त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं, ते पाहून तुम्हाला खूपच वाईट वाटेल.
तशी माणसांची प्राण्यांशी मैत्री असते. कुणी कुत्र्याशी मैत्री करत तर कुणी मांजराशी…पण जरा धुसणी देणाऱ्या प्राण्यांशी मैत्री कोण कधी काय करू शकतो हे पाहिलं आहे का? आणि जरी मैत्री करण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचं काय होईल, याची कल्पनाही न केलेलीच बरी. असं असताना या व्यक्तीने तशी हिंमत केली आणि त्याचं पुढे जे झालं ते शॉकिंग आहे.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक प्राण्यांचा कळप दिसतो. हा माणूस त्या कळपातील प्राण्यांशी खेळत आहे.मोठ्या बकऱ्या-बोकड असे प्राणी या कळपात दिसत आहेत. यावेळी हा माणूस एखादी भली-थोरली बकरी बघत आहे, जीच्यासोबत मस्ती करता येईल. अचानक त्याला एक बकरी दिसते. हा माणूस त्या बकरीची मस्ती करतो. शेवटी तो पडला बिचारा मुका प्राणी… सहन करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय आहे तरी काय?
खरं पाहिलं तर संपूर्ण कळप आहे त्यामुळे हा प्राणी एकटा नाही मात्र तरीही हा प्राणी या माणसाची मस्ती चुपचाप सहन करत आहे. पण शेवटी प्राण्यांचा विषय कसा असतो? आला अंगावर घेतला शिंगावर… या मस्तीखोर माणसासोबत अजून एक व्यक्ती दिसत आहे, जो त्याचा व्हिडीओ शूट करत आहे. पण या सोबत असणाऱ्या माणसाने मात्र कळपात असणाऱ्या प्राण्यांना कोणताही त्रास दिलेला नाही.
आता कुठलाही त्रास देणारा माणूस दिसल्यानंतर कळपातील प्राणी जसं रिऍक्ट होणं अपेक्षित होतं तसा तो बिलकुल रिऍक्ट झालेला नाही. या प्राण्याने लगेच या माणसावर हल्ला केला नाही. उलट हा प्राणी सुरुवातीला आनंदात या माणसाशी खेळतो आहे. दोघंही एकत्र मस्ती करताना, फिरताना दिसत आहेत.या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, कळपातील बोकड आणि तो व्यक्ती यांच्यात मस्ती सुरु असतं. त्यावेळी हा व्यक्ती अगदी मूड मध्ये येऊन सगळ्या कळपाला त्रास देत आहे. आणि मग अगदी या प्राण्यांचा अंगावर बसून इकडे तिकडे फिरत आहे..
आता बोकड-बकरी कितीही मोठा असला माणसाचे ओझे पेलू शकतो का? मात्र हे त्या मस्ती करणाऱ्या माणसाला कळत नाही. तो वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतच राहतो. शेवटी बराच वेळ तो त्या बकरीच्या अंगावर बसून फिरल्यावर एक ठिकाणी उतरतो आणि माघारी फिरतो. अशातच ती बकरी संधी साधून घेते आणि एवढा वेळ सहन केलेल्या गोष्टींचा बदल घेते… हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कीव पण वाटेल आणि हसूही येईल. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :