आपल्या सगळ्यांचेच व्हाट्सअपच काय तर खऱ्या आयुष्यातही खूप साऱ्या मित्रांचे ग्रुप्स असतात. पण तुम्ही नीट बघितलं तर जाणवतं की यातला एक ग्रुप मात्र आपला सगळ्यात जास्त जवळचा आणि प्रिय असतो. एवढंच नाही तर सहसा या ग्रुपमध्ये आपण सोडून आपले केवळ दोनच मित्र/मैत्रिणी असतात. अर्थात यास अपवाद असू शकतात. पण आयुष्यात एकदा तरी आपला असा तिघांचा ग्रुप बनतोच. बहुतेक वेळेस कॉलेजच्या दिवसांमध्ये या तिकडी ग्रुप्सची संख्या जास्त असते.
त्यामुळे या ग्रुपमधला एक जण जिथे जातो तिथे बाकीचे दोघे आपसूक दिसून येतातच. मग ते लेक्चरला जाणं असो, लेक्चर बंक करणं असो वा चाय आणि सुट्टा मारणं असो. ही तिकडी एकत्रच असते. हीच तऱ्हा मग कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत दिसून येते. ही मैत्री इतकी घट्ट असते की सोलो परफॉर्मन्स वगैरे प्रकारच नसतो या ग्रुपसाठी. फक्त ग्रुप डान्स आणि तो ही दणक्यात. आपण सोशल मीडिया वरही बघा. अशा तीन मित्रांच्या ग्रुप्सने केलेले खूप डान्स व्हिडियो दिसतील.
आज आपल्या टीमने त्यातीलच एक व्हिडियो बघितला. हा व्हिडियो तसा तीन वर्षे जुना आहे. पण या तीन वर्षात जवळपास ८० लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे आणि जवळपास लाखभर लोकांनी लाईक ही केला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. व्हिडियो सुरू होतो तेव्हा तीन मित्र आपल्याला कॅमेऱ्यासमोर दिसू लागतात. एव्हाना प्रत्येक जण आता हे तिघे काय डान्स करणार आहेत यासाठी उत्सुक असतो. लवकरच ही उत्सुकता संपते आणि पुढची चार साडे पाच मिनिटे ही मंडळी नुसती धमाल करतात. काय नसतं त्यांच्या डान्स मध्ये? त्यांच्या डान्समध्ये आपल्याला हळुवार म्युझिक आणि गाणं ऐकायला मिळतं. त्यालाच साजेसा असा डान्सही आपल्याला बघायला मिळतो. या तिन्ही मित्रांना डान्सची आवड असावी असा आपला समज व्हायला लागतो. हा व्हिडियो जसजसा पूढे सरकतो तसतसा हा समज अगदी घट्ट होतो. खासकरून या तिघांनी रोबोटिक्स डान्स प्रकारात केलेलं सादरीकरण म्हणजे लाजवाब ! खरं तर रोबोटिक्स डान्स दाखवत असताना आजूबाजूला रोषणाई असेल तर मजा येते. पण हा डान्स उघड्या पटांगणात होत असल्याने रोषणाईची मजा घेत येत नाही. पण ही उणीव हे तिघे डान्स स्टेप्सने भरून काढतात.
एवढंच काय तर ‘क्या चलती हैं हाय रब्बा, क्या दिखती हैं, हाय रब्बा’ या गाण्यावरचा त्यांचा स्लो डान्स परफॉर्मन्स तर भावांनो आणि बहिणींनो अगदी बघण्यासारखा आहे. तो परफॉर्मन्स बघितला नाहीत ना तर मग हा व्हिडियो बघून काय फायदा नाही. याच परफॉर्मन्सला तिथे उपस्थित असलेले सगळेच जण सगळ्यात जास्त टाळ्या वाजवतात. जमलं असतं तर कदाचित वन्स मोर पण दिला असता पब्लिकने. बरं बाकीच्या गाण्यांवर ही जबरदस्त असा परफॉर्मन्स होतो. यात गाण्याच्या वेगानुसार स्टेप्सचा वेग बदलणं या तिघांना खूप छान जमलंय. त्यामुळे हा परफॉर्मन्स बघताना पैसा वसूल मजा येते. त्यामुळे मंडळी हा परफॉर्मन्स तुम्ही आवर्जून बघा आणि मनसोक्त आनंद घ्या. जर बघितला असेल तरी पुन्हा एकदा बघा. हा डान्स व्हिडियो वारंवार घ्यावा असाच आहे.
आणि सोबतच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख घेऊन येत असते. आपणही आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहो ही सदिच्छा. आपली टीमही आपल्यासाठी नेहमीच मस्त मस्त लेख लिहून आणत राहील याची खात्री बाळगावी. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख वाचा. त्यांचाही आनंद घ्या. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :