लग्न आणि किस्से यांचं अतूट असं नातं आहे. त्यामुळे एखादं लग्न झालं आणि किस्सा झाला नाही असं होत नाही. अगदी कितीही तयारी करा किंवा किती नावाजलेली वेडिंग प्लॅनर कंपनी बोलवा. किस्से हे होतातच. कारण प्लॅनिंग करणारे, सगळं संभाळणारी ही जशी माणसं असतात तसेच हे सगळं बाजूला सारून कल्ला करणारे ही माणसं असतात.
बरं लग्न म्हंटलं म्हणजे काही वेळा घसा ओला करण्याची ही सुविधा असतेच. नसली तरी काही पात्र अशी असतात की ती अतरंगीच असतात. काहीही करा. काही तरी वेगळं वागणं हेच आपलं कर्तव्य हे त्यांचं ब्रीदवाक्य असतं. त्यात आजूबाजूला एवढी सरबराई, सजावट बघून त्यांच्या डोक्यात कधी काय येईल हे सांगता येत नाही. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो याची एकप्रकारे साक्षच देतो म्हणायला हवं. हा व्हिडियो एका लग्न समारंभातील असावा असा आमचा कयास आहे. कारण यात एक मंडप सजवलेला दिसत असतो. जवळच डीजे वर गाणं वाजत असतं. सजावटीचा भाग म्हणून बाहेर मत्स्यकन्यांसारख्या पुतळ्यांना बसवलेलं असतं. फुलांची सजावट ही असते.
तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो. काय त्याच्या मनात येतं कळत नाही. पण त्या पुतळ्याचे हात हातात घेतो अन नाचायला लागतो ना भाऊ. गाणं उत्तम असेल आणि नाचावंस वाटणं समजू शकतो आपण. पण थेट पुतळ्यासोबच डान्स करणं म्हणजे अजबच. आपल्याला हे बघून हसायलाच येतं. तिथे उपस्थित असलेल्यांना ही हसायला आलं असणारच यात शंका नाही. पण हा काय करतो पुतळ्यासोबत म्हणून आतून दोन पोरं धावत येतात. सुरुवातीला त्यांच्या चेहऱ्यावर ही चिंता असतेच. पण हे पोरगं जागेवरच उड्या मारत नाचत असतं. त्याचं हे वागणं पाहून त्यांनाही हसू आवरत नाही. एवढंच काय ते त्याला त्या पुतळ्यापासून दूर न्यायला बघत असतात. पण पठ्ठ्या कसला हटतोय. त्या पुतळ्याच्या प्रेमातच पडला असतो बहुतेक.इकडे तिकडे बघतो पुन्हा नाचायला लागतो.त्या पुतळ्याला इतका गदगदा हलवतो की तो पुतळा पण क्षणभर नचातोय की काय असं वाटू लागतं. तेवढ्यात मागाहून त्याची काही मित्रमंडळी येतात. घोळका जमतो. त्याला समजवतात.
शेवटी भाई ऐकत नाही म्हंटल्यावर त्याला थेट उचलून घेऊन जातात. एखाद्या सिनेमात शोभावा असा हा प्रसंग आहे. काय म्हणणार अशी प्रतिक्रिया मनातल्या मनात देत आपण हसत असतो. हा व्हिडियो आपणही पाहिला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल पाहिला. तर एकदा बघा. आपल्याला पण हसू येईल. अरे पण का, कशाला असे प्रश्न या मित्राला विचारावेसे वाटतील. असो.
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :