चित्रपट आणि टेलिव्हिजन वर काम करणारे के के गोस्वामी ह्यांची उंची भलेही कमी असेल पण त्यांनी आपल्या अभिनयाने टेलिव्हिजन वर खूप नावलौकिक मिळवले आहे. के के गोस्वामी 46 वर्षांचे आहेत. त्यांनी ‘गुटर गु’ आणि ‘विकराल गबराल’ सारख्या मालिकांन मधे काम करून नावलौकिक मिळवला. के के गोस्वामी मुंबईत राहतात आणि आपले वैवाहिक जीवन आनंदात जगत आहेत. के के गोस्वामी ह्यांची उंची 3 फूट आहे तर त्यांची पत्नी पिकू हिची उंची जवळजवळ दुप्पट म्हणजे 5 फूट आहे. के के गोस्वामी आणि पीकूचे फोटो सोशल मीडियावर वायरल झालेत. के के गोस्वामी आणि पिकूची जोडीला टेलिव्हिजन जगतात आश्चर्यजनक जोडीच्या रुपात पाहतात. गेल्यावर्षीच कोजागिरी पौर्णिमेला के के गोस्वामी ह्यांच्या पत्नीने खास उपवास ठेवला होता. सोशल मीडियावर पीकूचे पूजा करतानाचे फोटो वायरल झाले.
पीकू आणि के के गोस्वामीने प्रेम विवाह केला. के के गोस्वामी म्हणाले मी ‘जेव्हा लग्ना साठी पीकूला बघायला तिच्या घरी गेलो होतो तेव्हा तिच्या घरच्यांनी माझ्या उंचीच्या कारणाने नकार दिला.’ परंतु घरच्यांनी नकार देऊन सुद्धा पीकू के के गोस्वामी सोबत लग्न करू इच्छित होती. पीकूच्या जिद्दीने घरच्यांना माघार घेऊन लग्न करून द्यावे लागले आणि दोघांचे लग्न झाले. त्यांना दोन मुले आहेत. आपण ऐकले असेल जर आपले स्वप्न खरं असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल तर ते स्वप्न पूर्ण व्हायला कोणीही रोखू शकत नाही. हि म्हण के के गोस्वामी ने पूर्ण करून दाखवली. 3 फूट उंची असून सुद्धा के के गोस्वामी ने बॉलिवूड मधे जे नाव कमावले आहे, त्याला तोड नाही. बॉलिवूडचा प्रवास करताना केलेली मेहनत वाखाणण्या जोगी आहे. जेव्हापासून मुंबईत कलाकार बनायला आले होते तेव्हा पासून त्यांनी खूप संघर्ष केला. त्यांनी सात आठ वर्ष एक वेळच जेवून वेळ घालवली.
एकदा के के ना त्यांच्या उंचीचा एक माणूस भेटला. ज्याने त्यांना बिअर बार मधे नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले बिअर बार मधे नोकरी करून महिना 500 ते 700 रुपये मिळतील आणि सोबत चांगले जेवण मिळेल. त्या माणसाचे ऐकून के के बिअर बार मधे गेले. ते बिअर बार मधे आत प्रवेश करायला गेले तर तिथल्या वॉचमनने त्यांना बाहेरूनच हाकलून दिले. त्याच वेळी के के ने ठरवले, मी काहीही झाले तरी कलाकार बनेन. के के सांगतात त्यांच्या उंची मुळे त्यांच्या मुलांची शाळेत इतर मुले टर्र उडवत असल्यामुळे मुलांना कसेतरीच वाटायचे. त्यामुळे त्यांच्या उंचीच्या कारणाने ते त्यांच्या मुलाच्या कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत आणि त्यांच्या पत्नीलाच पाठवायचे. पण या सर्व गोष्टींचा के के गोस्वामी च्या मनावर परिणाम झाला. हे सगळं पाहून के के नी मनाशी ठरवले होते कि,तो सिद्ध करून दाखवणारच कि कोणताही व्यक्ती उंचीने नाही तर त्याच्या कामाने मोठा असतो.