बॉलिवूड मधे नाव कामावण्यापेक्षा ते जास्त काळ टिकवून ठेवणे हे खूप कठीण आहे. इथे अपल्याला चित्रपटात काम मिळेलही पण ते काम टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खास करून अभिनेत्रीच्या बाबतीत हे प्रश्न उद्भवतात. अभिनेत्रींना वयाच्या ठराविक मर्यादे पर्यंत काम मिळते. त्यानंतर क्वचितच लीड ऍक्टर चा रोल मिळतो. अशात या अभिनेत्री आपली लक्झरी लाईफ पुढे चालवण्यासाठी लग्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ६ अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी लग्ना नंतर आपल्या ऍक्टींग करियर ला गुड बाय केले.
ट्विंकल खन्ना
ट्विंकल ने अक्षय कुमार सोबत लग्न केले. बॉलिवूड मधे ट्विंकलचे करियर जास्त काही ठीक चालले नाही. ‘बरसात’ चित्रपटातून पदार्पण करणारी ट्विंकल खन्ना ‘जान’, ‘जब प्यार किसीसे होता है’, ‘मेला’, ‘जोरु का गुलाम’, ‘बादशाह’ आणि ‘जोडी नं.1’ मधे दिसली. अक्षय बरोबर विवाह झाल्यानंतर ट्विंकलने बॉलिवूडच्या दुनियेला राम राम ठोकला. आत्ता ती एक इंटिरियर डिझायनर चे काम करते आणि लेखिका आहे.
सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रेने बॉलिवूड मधील सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगणसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत सोबत काम केले. तिने काही हिट चित्रपट दिले. त्याच प्रमाणे ती अतिशय सुंदर दिसते. गोल्डी बहल बरोबर विवाह झाल्यानंतर ती ऍक्टींग च्या दुनियेचा सन्यास घेतला. आत्ता ती रियालिटी शो मधे दिसते.
जेनेलिया डिसुजा
बॉलिवूड ची क्युट अभिनेत्री म्हणून जेनेलिया प्रसिध्द होती. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटा तुन बॉलिवूड मधे पदार्पण केले. बॉलिवूड व्यतिरिक्त ती तामिळ आणि तेलगू चित्रपटात ती दिसली. जेनेलिया ने जेव्हा रितेश देशमुख सोबत विवाह केला तेव्हा पासून ती चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली नाही. ती आत्ता गृहिणी आहे. रितेश देशमुखच्या ‘लय भारी’, ‘माऊली’ चित्रपटांत तिने नृत्य केले होते.
भाग्यश्री
भाग्यश्रीने सलमान खान बरोबर ‘ ‘मैने प्यार किया’ चित्रपटातुन पदार्पण केले. त्यावेळी तीला खूप नावलॊकीक मिळाले होते. चित्रपट हिट झाल्यानंतर तिने हिमालय दासानी सोबत विवाह केला. आणि आपला ऍक्टींग करियर संपवले. जर तेव्हा तिने लग्न नसते केले तर ती आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत दिसली असती. ती आत्ता गृहिणी आहे.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीचा फिल्मी करियर खूप छान आहे. तिने हिट चित्रपट देऊन नाव कमावले. शिल्पाने उद्योगपती राज कुंद्रा सोबत विवाह करून आपले घर बसवले. तेव्हा पासून ती कोणत्याही मोठया चित्रपटाचा भाग झाली नाही. ही गोष्ट वेगळी आहे ती खूप सारे रियालिटी शो करते आहे. सोबतच तिचे फिटनेसचे आणि योगाचे व्हिडिओ खूप चालतात.
असिन
मल्याळम आणि तामिळ चित्रपटां बरोबर असिनने हिंदी चित्रपटात आपले नशीब अजमावले आणि यशही मिळाले. अमीर खान सोबतचा ‘गजनी ‘ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप चालला. असिनने मायक्रोमॅक्स कंपनीचे सीईओ राहुल शर्मा सोबत विवाह केल्यांनंतर ती फिल्मी दुनिये पासून दूर झाली आहे.