Breaking News
Home / मराठी तडका / ह्या अभिनेत्रीचे बाबा सुद्धा आहेत लोकप्रिय अभिनेते, बघा कोण आहे हि अभिनेत्री

ह्या अभिनेत्रीचे बाबा सुद्धा आहेत लोकप्रिय अभिनेते, बघा कोण आहे हि अभिनेत्री

नुकताच फादर्स डे होऊन गेला. यानिमित्ताने अनेकांनी आपल्या वडिलांचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले असतीलच. यात आपली टीमही सामील आहे. या दिवशी अनेक सेलिब्रिटिजनी सुद्धा आपापल्या वडिलांसोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. यात एका फोटोने आमच्या टीमचं लक्ष वेधून घेतलं. हा फोटो होता एका अभिनेत्रीचा आणि तिच्या वडिलांचा. तिचे वडीलही आपल्या मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहेत. या दोघांच्या कामाविषयी कौतुक करणारं लिखाण आपण वाचलं असेलच. पण या दोघांविषयी एकत्र लेख केला तर वाचकांना आवडेल असा आपल्या टीमने विचार केला. त्यातूनच आजचा हा लेख तयार होतो आहे. आपण वर ज्या अभिनेत्रीचा उल्लेख वाचलात त्या अभिनेत्रीचं नाव आहे, परी तेलंग. तिचे वडील म्हणजे श्री. भूषण तेलंग. परी हिला जसं आपण अनेक मालिका, सिनेमे, नाटकं यांतून पाहिलं आहे, तसंच तिच्या बाबांना सुद्धा आपण अनेक मालिकांतून पाहिलं आहे.

तसेच त्यांचा नाट्य सृष्टीत ही वावर असतोच. भूषण जींनी आजपर्यंत अभिनित केलेल्या कलाकृतीं बद्दल सांगायचं म्हणजे एक यादीच निघावी. तरी त्यातील काही मालिका म्हणजे फुलपाखरू , तू माझा सांगाती (बटूकेश्वर शास्त्री) , भागो मोहन प्यारे, अल्टी पल्टी, अलमोस्ट सुफळसंपुर्ण या होत. या मालिकांतील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना आनंद दिला. सोबतच व्हेंटिलेटर, प्रवास या सिनेमांतूनही त्यांनी अभिनय केलेला आहे. तसेच त्यांच्या संकल्पनेतून साकारलेलं प्रायोगिक नाटक म्हणजे बाई, अमिबा आणि स्टील ग्लास. या नाटकात परी हिने मुख्य भूमिका बजावली होती. या भूमिकेसाठी परी वर अनेक प्रथितयश वृत्तसंस्थांच्या परिक्षणातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. तसेच परी आणि तिच्या वडिलांनी एकत्र केलेली कलाकृती म्हणूनही ती लक्षात राहिली आहेच.

परीने लहानपणापासूनच अभिनय करण्यास सुरुवात केली होती. तिने अभिनित केलेलं पहिलं नाटक म्हणजे मंत्रमुग्ध. पुढच्या काळातही ती खूप उत्तमोत्तम नाट्यकृतींचा भाग राहिली. वासूची सासू, मि. अँड मिर्सेस लांडगे, माझी माय सरोसती द म्युझिकल ही त्यातली काही ठळक उदाहरणं. तसेच तिचा मालिका क्षेत्रातही विविध कालाकृतींतून वावर होताच. आभाळमया या गाजलेल्या मालिकेचा ती एक महत्वपूर्ण भाग होती. पुढे ओळख – ध्यास स्वप्नांचा, कन्यादान सारख्या लोकप्रिय ठरलेल्या मालिकांतूनही तिने अभिनय केला. तसेच फु बाई फु, कॉमेडी बिमेडी सारख्या प्रहसनात्मक कार्यक्रमांतून ही सक्रिय सहभाग नोंदवला. नाटक आणि टेलिव्हिन वर मुशाफिरी चालू असताना सिनेमाचा पडद्यावरही तिने स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली. मोरया, गुलदस्ता हे तिचे चित्रपट याची ग्वाही देतात. यांच्यासोबतच जाहिरात क्षेत्रातही तिने काम केलं आहे.

एस.बी.आय. या अग्रगणी बँकेच्या कॉर्पोरेट फिल्म मध्येही तिचा सहभाग होता. एकंदर काय, तर मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक माध्यमातून या गुणी अभिनेत्रीने स्वतःची छाप पाडली आहे. अजूनही परी तिचा हा यशस्वी प्रवास अजून खूप पुढे नेईल यात शंका नाही. यात तिच्या विविध छटा असणाऱ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतील आणि तिचं कौतुक ही होत राहिल. सोबतच भूषणजी पण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आनंद देत राहतीलच. या कलासक्त वडील मुलीच्या जोडीला, आमच्या टिमकडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. कारण आपण उत्तम आणि नवीन विषयावर वाचावं हे आमच्या टीमचं ध्येय असतं. त्यात आम्ही प्रत्येक वेळी यशस्वी होतो हे कळतं, कारण आपण सगळेच जण, आपल्या टीमने लिहिलेले सगळे लेख अगदी आनंदाने शेअर करत असता. कमेंट्स मधून प्रोत्साहन देत असता. आपला हा पाठींबा आमच्या पाठीशी असाच कायम राहू द्या. लोभ असावा. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.