Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीने नाकारली होती दीपाची भूमिका, बघा काय होते ह्यामागचे कारण

ह्या लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीने नाकारली होती दीपाची भूमिका, बघा काय होते ह्यामागचे कारण

मराठी गप्पा म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील विविध बातम्या वाचण्याचं आपलं हक्काचं ठिकाण. आपली टीम वेळोवेळी मनोरंजन क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्या कलाकृती, कलाकार यांच्या विषयी लिहीत असतेच. तसेच अनेक वेळेस घडणारे किस्सेही आपल्या पर्यंत पोहोचवत असते. कारण आपण आणि आमच्या टीम मध्ये असलेला समान दुवा म्हणजे मनोरंजन क्षेत्राविषयी असणारी आवड आहे. या आवडीतूनच विविध कलाकृतींविषयीचे लेख आपली टीम लिहीत असते. आपल्याला आठवत असेल मध्यंतरी आपल्या टीमने अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख लिहिले होते. त्यांना तुम्ही उत्तम असा प्रतिसाद ही दिला होतात. या आपल्या आवडत्या मालिकविषयी आमच्या टीमला एक गोष्ट नव्याने कळली आणि ती आपल्या पर्यंत यावी असं आम्हाला वाटलं.

या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी उदयोन्मुख अभिनेत्री आणि नृत्यांगनेस विचारणा झाली होती असं कळतं. ही अभिनेत्री म्हणजे स्वामिनी वाडकर. होय, फ्रेंडशिप अनलिमिटेड (एफ.यु.) या चित्रपटातून आपण जिला अभिनय करताना पहिलं ती स्वामिनी वाडकर. लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेते जयवंत वाडकर यांची ही सुकन्या. एफ.यु. हा तिने केलेला पहिला सिनेमा. पण ही तिची पहिलीच कलाकृती नाही. साठे कॉलेजची विद्यार्थिनी असलेली स्वामिनी ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून डान्स करताना दिसली आहे. तिने केलेल्या उत्तमोत्तम डान्स मधून तिची डान्स विषयी असलेली आवड लक्षात यावी. मध्यंतरी जयवंत सर आणि स्वामिनी यांनी एकत्रपणे केलेला डान्स खूप लोकप्रिय ठरला होता. तर अशा या नृत्यनिपुण स्वामिनीस रंग माझा वेगळा या मालिकेतील भूमिकेसाठी विचारणा झाली होती असं कळतं. पण त्यावेळी तिचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्याने सध्या मालिकेत काम नको असा विचार झाल्याचं कळतं. शिक्षणाच्या करणास्तवर स्वामिनीने ह्या मालिकेतील दीपाच्या भूमिकेसाठी नकार दिला होता. अर्थातच शिक्षण हि प्राथमिकता असायलाच हवी. करिअर पुढेही करता येऊ शकते.

पण येत्या काळात स्वामिनी आपल्याला विविध कलाकृतींतून अभिनय आणि नृत्य करताना दिसेल अशी अपेक्षा मात्र नक्की ठेऊ शकतो. खासकसरून तिच्या वडिलांसोबत जर ती एखाद्या कलाकृतीत दिसली तर जयवंत जी आणि स्वामिनी यांच्या चाहत्यांना फारच आनंद होईल हे नक्की. येत्या काळातील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून स्वामिनी हिला मनःपूर्वक शुभेच्छा !!! आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख आवडतात तेव्हा तेव्हा आपण ते लेख शेअर करत असता. तेव्हा यावेळीही हा लेख आवडला असेलच तेव्हा नक्की शेअर करा. आपण लेख जेवढा वेळा शेअर करता तेवढं प्रोत्साहन आम्हाला मिळतं. तेव्हा आपला आमच्याप्रति असलेला लोभ कायम असू दयावा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *