काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चे नवीन पर्व सुरु झाले. बघता बघता हे पर्व सुद्धा लोकप्रिय होऊ लागले आहे. प्रेक्षकांनाही बाल स्पर्धकांचा सुरेल आवाज आवडतो आहे. एकूणच काय तर ‘सारेगमप’ चे हे पर्व म्हणजे संगीतप्रेमींसाठी खास मेजवानी आहे, असच म्हणता येईल. ह्या लिटिल चॅम्प्सने गायलेल्या प्रत्येक गाण्यांना परीक्षक आणि निवेदक (अँकर) ह्यांच्याकडून चांगलीच दाद मिळत आहे. खरंतर त्यांच्याकडून मिळालेली दाद म्हणजे स्पर्धकांसाठी प्रोत्साहन होय. ह्या शो चे निवेदन करत असलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. मृण्मयी ह्या शो मध्ये उत्कृष्ट निवेदन करण्यासोबतच तितक्याच उत्स्फूर्तपणे चांगल्या गाण्यांना दाद देखील देत आहे. परंतु असे असले तरी तिला ह्या गोष्टीबद्दल सोशल मीडियावर काहीप्रमाणात ट्रॉल सुद्धा करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच एका युजरने तिला ओव्हरऍक्टिंग कमी करण्याचा सल्ला दिला होता. परंतु मृण्मयीने सुद्धा ह्या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ह्या दोन्ही बहिणी आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जातात. त्या नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. परंतु एका युजरने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्या एका पोस्टवर ती सारेगमप शो मध्ये करत असलेल्या अँकरिंग बद्दल मत व्यक्त केले. युजरने कमेंटमध्ये म्हटले कि, “सारेगमप शो मध्ये स्पर्धकांच्या समोर बसलेले जज आणि अँकर्स हे सारखं सारखं वा वा ओरडतात असतात. ह्याला ओव्हरऍक्टिंग म्हणायची का?’ युजरने अशाप्रकारे ट्रॉल केलेले पाहून अभिनेत्री मृण्मयीने सुद्धा त्या युजरला सडेतोड उत्तर दिले आहे. मृणमयीने त्या युजरला रिप्लाय मध्ये उत्तर देताना म्हटलं कि, “तुम्ही ह्या मुलांचे गाणं ऐकून कसे रिऍक्ट झाले असता? शांत बसला असता का? हाताची घडी घालून?” मृण्मयीने दिलेले हे उत्तर पाहून काहींनी तिला सपोर्ट केले आहे. नेटिसीझन्सने तिच्या ह्या रिप्लायला लाईक देत आपली पसंती दर्शवली आहे. तरी काहींनी युजरची बाजू घेतली आहे. पुढे युजरने मुलं छान गात आहे, हे सुद्धा म्हटले आहे.
असो. अश्याप्रकारच्या ट्रोलचा सामना वेळोवेळी कलाकार करत असतात. काहीवेळेस कलाकार अश्या ट्रॉलर्सना उत्तर देऊन व्यक्त होतात काहीवेळेस उत्तर न देणेच योग्य समजतात. परंतु प्रेक्षक सुद्धा आपले मत व्यक्त करत असतात. त्यांना ज्या चुका वाटतात त्या निदर्शनास आणतात. सध्या सारेगमप लिटिल चॅम्प्समधील जज आणि निवेदक ह्यांना नेटिझन्स कडून ट्रोलचा सामना करावा लागत आहे. एका अर्थाने स्पर्धकांना दाद देणे हे चांगलंच आहे. कारण त्यामुळेच त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि ते पुढील गोष्टी अजून उत्साहाने करतात. त्याचसोबत हेहि विसरता कामा नये कि एखाद्या गोष्टीसाठी अति दाद मिळाली किंवा स्पर्धकांना त्यांच्या चुकाच कळल्या नाहीत आणि फक्त वाहवा मिळत गेली तर त्यांना त्यांच्यात सुधारणा करण्याची संधीच मिळणार नाही. त्यामुळे योग्य प्रोत्साहन आणि त्याचसोबत तितक्याच स्पष्टपणे चुकासुद्धा लक्षात आणून द्यायला हव्यात. तर मित्रांनो तुम्हांला ह्या शो मधील अँकर्स आणि जज ह्यांच्याबद्दल काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याचसोबत तुमचे आवडते स्पर्धक, जज, अँकर्स कोण हे हि सांगायला विसरू नका. आपल्या मराठी गप्पा ला देत असलेल्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.