आपली मराठी गप्पाची टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध वायरल व्हिडियोज वरील लेख आणत असते. त्यात काही अगदी नवे कोरे व्हिडियोज असतात तर काही जुने. नव्याची कास धरताना जुन्या व्हिडियोजचा आंनद सुद्धा आमच्या वाचकांना मिळावा हा आमच्या टीमचा प्रामाणिक उद्देश. तो बहुतांश वेळेस सफल झालेला दिसतो. त्यामुळे आमच्या टीमलाही असे अनेक वायरल व्हिडियोज शोधून काढण्यास प्रोत्साहन मिळतं. यातूनच एक वायरल व्हिडियो आमच्या टीमने पाहिला आणि त्याविषयी लिहावं हे नक्की झालं. हा व्हिडीओ आहे अमेरिकेतील. परदेशात बॉलिवूड विषयी असलेली चिकित्सा ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. आपल्या कडील सिनेमे, त्यातील गाणी आणि त्या गाण्यांवरचा बॉलिवूड स्टाईल डान्स हे चिकित्सेचे विषय. हा व्हिडीओ पाहून त्याची प्रचिती यावी. हा व्हिडीओ आहे अमेरिकेतील सॅन रेमन, कॅलिफोर्निया येथील.
येथील काही शिक्षिकांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर सादर केलेल्या एका डान्स परफॉर्मन्सचा हा व्हिडीओ आहे. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आठ शिक्षिका, रंगमंचावर पारंपारिक भारतीय पेहरावात म्हणजे साडी, हातात बांगड्या, कपाळावर टिकली अशा पेहरावात उभ्या असलेल्या दिसतात. त्यांचा भारतीय लूक पाहून उपस्थितांकडून जल्लोष होत असतो. त्यात जेव्हा हिंदी गाण्याचं सुरुवातीचं म्युझिक वाजायला सुरुवात होते तेव्हा या जल्लोषात भर पडते. ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटातलं ‘रॉक एन रोल सोनिये’ हे पहिलं गाणं. गाण्याच्या स्टेप्स करत करत यातील काही जणी रंगमंचावरून खाली येतात. सुरुवातीस त्यांच्यात थोडा अवघडलेपणा जाणवतो. पण त्या पटकन सावरतात. तेवढ्यात पहिलं गाणं संपत आलेलं असतं. त्या पुन्हा रंगमंचावर येतात. त्यांच्या प्रत्येक स्टेपला उपस्थितांकडून जोरदार प्रोत्साहन मिळत असतं. साडीत आणि ते पण परदेशी नागरिकांनी डान्स करणं म्हणजे अशक्य वाटावी अशी गोष्ट. पण या शिक्षिका ते अगदी सहज करून दाखवतात.
दुसरं गाणं असतं जब वी मेट चित्रपटातलं ‘ये इश्क हाए, बैठे बिठाए जन्नत दिखाए हां..’. त्यात या सगळ्या जणींची मिळून एक गोलाकार अशी स्टेप असते जी सगळ्यांत जास्त भाव खाऊन जाते. हे दुसरं गाणं ही संपत येतं आणि अजून एक सुखद धक्का बसतो. तिसरं गाणं सूरु होताना अजून एक शिक्षक या चमूत येऊन दाखल होतो. त्याची एंट्री होते ती, ‘ओम शांती ओम’ या सुप्रसिद्ध गाण्यावर. तो या गाण्याप्रमाणे अगदी जल्लोषात एंट्री घेतो, त्यामुळे रंगलेल्या माहोलात अजून ऊर्जा भरली जाते. या जल्लोषात डान्स करता करता तो प्रत्येक शिक्षिकेस एकेक करून रंगमंचाच्या मध्ये आणतो. एका प्रकारे त्यांनी घेतलेल्या सहभागाची पोचपावती तो देत असतो. उपस्थित प्रेक्षकही त्याच उत्स्फूर्तपणे त्यांच्या या सहभागास दाद देतात. यात आनंदाचा भाग असा कि गाणं जेव्हा पुढे जातं, तसं मुख्य कडव्याच्या वेळी सगळी जणं ‘ओम शांती ओम’ चा उच्चार करत असतात. डान्सचा सुरुवातीस अवघडलेल्या या शिक्षिका आता अगदी सरावल्यासारख्या नाचत असतात.
गाण्याचे बोल बोलत असतात. त्यांचं गाण्याशी एकरूप होऊन नाचणं आपल्यातही ऊर्जा निर्माण करतं. ही ऊर्जा व्हिडियो संपेपर्यंत आणि त्या नंतरही कायम राहते. त्यात या डान्सच्या शेवटी केलेली स्टेप म्हणजे सोने पे सुहागा. एकंदरच हा पाच मिनिटांचा व्हिडियो आपल्याला अगदी शंभर टक्के आनंद देऊन जातो. यात असलेला परदेशी नागरिकांचा उत्साही सहभाग ही जमेची बाजू. आज ही मंडळी कुठे असतील माहीत नाही किंवा हा लेख वाचतील आणि त्यांना समजेल की नाही याचीही कल्पना नाही. पण त्यांनी दिलेल्या जोरकस परफॉर्मन्स बद्दल मराठी गप्पाच्या टिमकडून त्यांचं मनःपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा !!
आपल्याला हा लेख आवडला असणार तेव्हा नक्की शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अनेक लेख आपल्या वाचनासाठी उपलब्ध आहेत. तेव्हा त्यांचा नक्की आस्वाद घ्या आणि उत्तम लेखांची मेजवानी चुकवू नका. आपल्या प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद !
बघा व्हिडीओ :