Breaking News
Home / मनोरंजन / ह्या असतात खऱ्या मुली… ह्या लहानग्या मुलीची वडिलांसाठी असलेली तळमळ पाहून तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

ह्या असतात खऱ्या मुली… ह्या लहानग्या मुलीची वडिलांसाठी असलेली तळमळ पाहून तुमच्यादेखील डोळ्यांतून अश्रू येतील

लहान मुलांचं म्हणून स्वतःच अस एक मनोविश्व असतं. त्यात ते रमतात. अर्थात जसजसे मोठे होत जातात तसतसे या मनोविश्वाला, खऱ्या आयुष्याची किनार येत जाते. ही किनार येण्यास अनेक अनुभव कारणीभूत ठरत असतात आणि त्यातूनच मग मोठं म्हणून आपण जगायला लागतो. पण मोठ्ठं होण्याआधी आपलं मन हळवं असतं. किंबहुना काही जणांच्या बाबतीत हे मन कायम हळवं राहतं. या काही जणांमध्ये आपले आई वडील यांचं स्थान सर्वोच्च असतं. त्यामुळेच त्यांच्या बाबतीत घडलेली एखादी छोटी घटना ही मनाला लागून राहते.

आज हे सगळं सांगायचं कारण एक वायरल होत असलेला व्हिडियो आहे. हा व्हिडियो गेले काही दिवस अनेक वडिलांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटस वर सातत्याने आपण बघितला असेल. पण अनेकवेळा हे स्टेटस आपण इतक्या पटकन बघतो की त्यातील कंटेंट आपल्याला चांगला असूनही बघता येत नाही. काही वेळा तर एखादा व्हिडियो आहे हे पाहून आपण तो बघायचा ही टाळतो. पण मंडळी, हा व्हिडियो खऱ्या अर्थाने बघण्यासारखा आहे. लहान मुलांचं आपल्या पालकांवर किती प्रेम असू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे.

त्यातही मुलगा म्हंटला की तो आईच्या जवळचा असणार आणि मुलगी म्हंटली की ती वडिलांच्या जवळची असणार हे समीकरण ही यात दिसून येतं. हा व्हिडियो आहे अशाच एका लहान मुलीचा जीचं तिच्या वडिलांवर अपरिमित प्रेम आहे. त्यात ती मनाने हळवी सुद्धा आहे. बरं या व्हिडियोत ती स्वतः सुद्धा हे नमूद करते. पण तिची हीच हळवी बाजू आपल्याला विचार करायला भाग पाडते. लहान मुलांचे मन किती संवेदनशील असेल याचा परिचय जणू यातून होतो. पण अस काय होतं की ही मुलगी हळवी होते? होतं असं की तिचे वडील कामानिमित्त सतत घराबाहेर असतात हे कळतं. त्यात व्यवसायातील गिऱ्हाईकाचं काम असेल तर जावं लागतंच. त्यात काही वेळा जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. काही खाल्लं जात नाही. आपल्या सगळ्या मोठ्या माणसांसाठी ही नित्याची गोष्ट असते. अगदी इतकी की घरातील इतर मोठ्यांनाही याची सवय झालेली असते. काम करायचं, पैसे कमवायचे तर हे सगळं होतंच. पण हे सगळं ‘मोठ्या’ माणसाचं म्हणणं पडतं ना. लहानांना मात्र यातील त्रास दिसून येतो. जसा की या मुलीला दिसतो.

आपले वडील कामाच्या नादात भुकेले असणार अशी कल्पना तिच्या मनात घर करून राहिलेली असते. तिची आई, तिच्या मनातील हे विचार काढून टाकायला बघत असते. साहजिकच आहे. त्या तिला खऱ्या आयुष्याची जाणीव करून देत असतात. तसेच वडील उपाशीपोटी सकाळी घराबाहेर पडलेले नाहीयेत हे ही वारंवार सांगतात. पण वडीलांविषयी असणारं प्रेमामुळे या बाबी या मुलीला गौण वाटतात. त्यांनी वेळच्या वेळी अन्न खावं आणि स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं एवढंच तिचं म्हणणं असतं. पण तिच्या या मुद्द्यांसोबतच ती मांडण्याची पद्धत ही लक्षात राहते. एखादी गोष्ट पोटतिडकीने मांडणं म्हणजे काय असतं, याचा अंदाज आपल्याला या व्हिडियोतुन येतो. खासकरून या व्हिडियोतील शेवटची काही सेकंद तर याची ग्वाही देतात. व्हिडियो जसजसा पूढे सरकत जातो तसतसं तिचं म्हणणं मांडणं ही अग्रेसर होत जातं.

आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आई बाप असाल वा नसाल, पण एकदा हा व्हिडियो जरूर बघा. कारण वायरल व्हिडियोज खूप असतात. पण मनाला स्पर्शून जाणारे फारच कमी व्हिडियोज असतात. हा त्यातील एक आहे यात शंका नाही. असो.

मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *