लहान मुलं ही थोर कलाकार असतात, याचे उदाहरण तुम्हाला वेळोवेळी दिसत असेलच. अहो इकडे तिकडे काय बघताय?… टिव्हीत बघा टिव्हीत… डान्स, कॉमेडी, गायन, खेळ आणि काहीही असो… जिकडे तिकडे लहान मुलांचा दरारा आहे. अगदी इथपर्यंत की, ज्यांनी एकेकाळी लिटल चॅम्पस मध्ये गाणी म्हटली होती, तीच लहान मुलं आता तारुण्यात असताना जज(परीक्षक) झालेली आहेत. मुग्धा वैशंपायन तर अजूनही लोकांना लहानच वाटते… असो तर सांगायचा मुद्दा हा की, आम्ही 5-7 वर्षाचे होतो, तेव्हा चड्डीत सुसू करायचो आणि आताची 7-8 वर्षाची पोरं गातात काय… नाचतात काय… तेही लाखो लोकांच्या समोर… आम्ही तर पाहुणे आलेत हे पाहून मुद्दाम घराबाहेर पळायचो. आणि आताची पोरं एकदम कॉन्फिडन्समध्ये आपल्या अंगात असणारी कला सादर करतात. शेवटी पिढी दर पिढी कॉन्फिडन्स वाढत आहे. आता जग पब्लिसिटी आणि व्हायरल होणाऱ्या लोकांना सलाम ठोकतं शेठ… कितीही गाणी आली तरी व्हायरल झालेलं ‘ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट’ हे गाणं लोकांच्या लक्षात राहणारच…
या पब्लिसिटीच्या जगात टिकायचे असेल तर व्हायरल होणं गरजेचं आहे भावा… पण काही लोक प्रचंड प्रयत्न करतात, तरीही व्हायरल होत नाहीत. आणि काही लोक पहिल्याच झटक्यात ध्यानी-मनी नसताना जगभरात पोहोचतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका आईचा आणि मुलीचा आहे. आईने संगीत शिकले तर मुलीला ते अंगभूत गुण म्हणून मिळाले. आणि हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा अप्रतिम अशा गायनाचा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच एक गोड स्माईल येईल.
लहान मुलं सगळ्यांनाच आवडतात. विशेषतः त्यांचा खोडकर स्वभाव. लहान मुलं इतकी निरागस असतात की त्यांच्या निरागसतेने ती आपली मनं जिंकतात. परंतु कधी कधी त्यांच्यातील सुप्त गुण दाखवून ते आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एका मुलीने तिच्यातील कला गुणांचा परिचय करून दिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या मुलीचे कौतुक कराल.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसून येईल की, एका सोफ्यावर बसून आई गिटार सारखे वाद्य हातात घेऊन ते सुंदर पध्दतीने वाजवत आहे सोबत आई एक अतिशय लोकप्रिय असे हिंदी गाणे म्हणत आहे. आणि शेजारीच बसलेली लेक सुद्धा यात आईला गाणे म्हणताना भारी साथ देत आहे. आई तर भारी गाणं म्हणत आहेच पण लेक सुद्धा आईचे गुण जन्मजात घेऊन, अगदी तल्लीन होऊन एखाद्या प्रोफेशनल सिंगर असल्याप्रमाणे गाणं गात आहे.
आपल्या बोबड्या बोलातून ‘तुम साथ हो या ना हो, क्या बात है’ हे गाणं गात आहे. ती तिचं 100 टक्के देत गाण गात आहे मात्र तिचं गाणं कानावर पडलं की प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे. अगदी घरी बसून, व्हिडीओ समोर चालू असताना ही चिमुरडी एकदम गाणं गाताना मंद तसेच दीर्घ स्वर लावत आहे. हे गाण ऐकायला ही खुप छान वाटत आहे. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :