Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी स्टेजवर सर्वांसमोर केलेला डान्स होत आहे वायरल, उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

ह्या आजींनी स्टेजवर सर्वांसमोर केलेला डान्स होत आहे वायरल, उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. खरंही आहे ते. पण म्हणून हा तर्क केवळ मानवी नातेसंबंधां पुरता मर्यादित नाही. आपलं कलेविषयी असलेलं प्रेम जपायलाही वयाचं बंधन नसतंच. पण आपल्यापैकी अनेक जण सांसारिक ओझ्याखाली इतके दबून जातो की आपल्या आवडी निवडी यांच्याकडे लक्ष आणि वेळ देण्यास सवड मिळत नाही. पण वेळेचं नियोजन केल्यास मात्र कधी का होईना आपल्याला आपल्या आवडी निवडी जपता येऊ शकतात. आमच्या टीमने पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरून तर आम्हाला याची पक्की खात्रीच वाटते. हा व्हिडीओ आहे एका आज्जींचा. ह्या व्हिडियोत आज्जी आपली नृत्यकला एवढ्या सफाईने सादर करतात की त्यामागच्या त्यांच्या मेहनतीचं कौतुक वाटत राहतं.

या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा सुरुवातीस आपल्याला आज्जी, त्यांच्या पाठी कदाचित त्यांच्या कोरिओग्राफर असाव्यात आणि एक चिमुकली दिसत असते. ‘हात नका लावू माझ्या साडीला’ ह्या सुप्रसिद्ध लावणीचे शब्द कानावर पडतात आणि आज्जी आपला नृत्याविष्कार साकार करण्यास सुरुवात करतात. सुरुवातीस ती चिमुकली आणि पाठीमागे उभ्या असणाऱ्या स्त्रीचा सहभाग असतो. आपल्याला एकाच फ्रेम मध्ये तीन विविध वयोगटातील पिढ्या एकत्र नृत्य सादर करत असताना बघण्याचे काही क्षण अनुभवण्यास मिळतात. काही क्षणांनी मात्र रंगमंच केवळ आज्जींच्या ताब्यात असतो आणि पुढची दोन मिनिटे त्या आपला हा नृत्याविष्कार सादर करतात. त्यात अनेक वेळेस त्यांनी घेतलेल्या गिरक्या आणि इतर काही स्टेप्स वर उपस्थितांकडून दाद मिळते. आपणही मनातल्या मनात त्यांना दाद देत असतोच. आज्जींच्या या नृत्याविष्कारातुन त्यांचे हावभाव, हस्तमुद्रा पाहता नृत्याचे शिक्षण घेतले असण्याची शक्यता वाटते. या वयातही त्यांनी साकार केलेला हा नृत्याविष्कार आणि त्यातून नृत्यविषयक असणारी त्यांची आपलेपणाची भावना व्यक्त होते.

आपल्यापैकी अनेकांना त्यांच्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव द्यायचा असल्यास या आज्जींचा या वयातील हा नृत्याविष्कार एक उत्तम उदाहरण ठरावा. आपल्या वयाचं भांडवल न करता आपल्या या कलाप्रेमाला अगदी निगुतीने जपणाऱ्या या आज्जींना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. आपल्याला हा लेख आवडला आवडला असेल तर नक्की शेअर करा. खासकरून अशा मित्रमैत्रिणींना हा लेख पाठवा ज्यांनी आपलं काम सांभाळून त्यांच्या आवडी निवडी, सुप्त कलागुण जपावेत, असं आपल्याला मनापासून वाटतं. तसेच आमच्या वे’बसाई’टवर अनेक वायरल व्हिडियोज वरील छोटे पण माहितीपूर्ण लेख उपलब्ध आहेत. तसेच अन्य विषयांवरील लेखही उपलब्ध आहेतच. आपण त्यांचाही आस्वाद घ्यावा आणि आमच्या टीमचा उत्साह वाढवावा. मराठी गप्पाच्या टिमला सतत प्रोत्साहन देणाऱ्या वाचकांचे मनापासून धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.