नाव घे पोरी तू लाजू नको, असं आपण म्हणतो खरं… पण पोरींनं एकदा का नाव घेतलं तर म्हाताऱ्या कोताऱ्या बयाही तोंडात बोटं घालून उभ्या राहतात. पोरीनं नाव काय घेतलं व्हतं याची चर्चा लगीनघरापासनं निघाले की घरापर्यंत जाईस्तोवर संपंत नाही दोस्तहो.. नाव घेण्याचं फॅड आता इन्स्टाग्रामवरच्या पोरींनी तर नव्यानं आणलं. श्वास रोखून धरतील पण नाव घेताना जरा इकडचं तिकडं होऊ देणार नाहीत. आता या आज्जीच पहा ना… अगदी प्रेमाची पंच्चात्तरी ओलांडली असेल. पण त्यांचं नवरोबावरचं प्रेम आणि खोडकरपणा एखाद्या तरुण जोडप्याला लाजवेल इतकं. आजींनी नाव काय घेतलंयं ते तर पहा… रुसलेल्या नवरोबाचा रुसवा फुगवा कशाला काढायचा अन् ते बी या वयात, असंचं त्या सांगतायतं.
रुसवा फुगवा काढायचं हे वय आहे का ते पण नवरोबाचं. आणि नवरोबानं काढावा की आमचा रुसवा फुगवा, असंचं आज्जींना सांगायचं आहे पोरींना… नाव घ्यायला बिलकुल लाजायचं नाही. लाजलात की मग तुमची चेष्टा झालीच म्हणून समजा. त्यापेक्षा आज्जींसारखं नाव घ्या बिनधास्त, नाव घेताना थोडासा तुमच्या अहोंना चिमटाही काढायला विसरुन नका. थोडं त्याला बी कळू दे की आपण काय चीज घेऊन घरी आलोय ते… आणि नाव ते भाजीत भाजी असंलं काही घेऊन फालतुगीरी करुन लोकांच्या भावनांचा खेळ करायचा नाय बरं का… लोकं लांबून तुमच्या लग्नाला आल्यात.. त्या आक्का, माई तर पार गाव सोडून आल्यात. हे तुमचं भाजीत भाजी ऐकायला व्हयं. नाव कसं आज्जीनं घेतलंयं तसं घ्यायचं. बहारदार… आपल्या नावाची चर्चा गावात झाली पाहिजे.
तेव्हा लग्नात आलेल्या पोरींनो आणि त्यांच्या लग्नाळू नवऱ्यांनो… लग्नात नाव घ्यायची तयारी एकदम बिनधास्त करा. हवंतर एकमेकांना भेटून प्रॅक्टीसपण करा म्हणजे चुकून माकून तुमचा व्हीडिओ कुनी काढला आणि आज्जींसारखा तो व्हायरल झालाच तर तुम्हाला पण प्रसिद्धी मिळालीच म्हणून समजा…. हा नायतर लाजलात आणि तुमचे हे किंवा ही रुसली ना तर मनवायला आणखी एक उखाणाच घ्यावा लागेल. आज्जींनी काय आणखी एक उखाणा घेतला ना तरी आजोबा खुश होत्याल… आपलं तसं नाही लेकहो… त्यामुळे एकदम तयारी पक्की करूनच जा. आणि मराठमोळा आणि अस्सल गावरान उखाणा घ्या की तुमचे हे नाहीतर ही लाजलीच पाहिजे. तूर्तास तरी ह्या आजीबाईंनी घेतलेला हा अतरंगी उखाणा ऐका आणि मजा घ्या.
बघा व्हिडीओ :