Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी ‘आज ब्लु है पाणी’ गाण्यावर केलेला अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, आजींचा उत्साह तर बघाच

ह्या आजींनी ‘आज ब्लु है पाणी’ गाण्यावर केलेला अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही, आजींचा उत्साह तर बघाच

या गेल्या रविवारी आम्ही काही मित्र मंडळी एके ठिकाणी जमलो होतो. जवळच असलेल्या एका मैदानाजवळ फेरफटका मारू म्हणून गेलो, तर त्या मानाने गर्दी कमी दिसली. तेव्हा आमचा एक मित्र पटकन उच्चारला – अरे भाई आता सगळे गावाला पळणार ! काही जण आंबे गोळा करायला आणि काही जण लग्नसमारंभांची मजा घ्यायला. एक दीड महिना राहणार की झाली उन्हाळ्याची सुट्टी ! आता त्याचं लॉजिक किती बरोबर किती चूक हे आपणच ठरवा.

पण तो जे म्हणाला त्यात काहीसं तथ्य जरूर आहे. हा उन्हाळ्याच्या काळ लग्न समारंभ आणि आंबे यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही हे नक्की. अर्थात कधी कधी या दोहोंची संख्या कमी जास्त असते. पण या उन्हाळ्याच्या सळसळत्या माहोलात या दोनच गोष्टी आत्म्याला जरा शांती देऊन जातात. त्यातही लग्न म्हंटलं म्हणजे सगळी धमाल मस्ती असते. आपल्या घरचं लग्न असेल तर सोन्याहून पिवळं. कारण त्यानिमित्ताने आपले आप्तस्वकीय भेटतात. बऱ्याच वर्षांनी भेट होत असेल तर त्या भेटींचा आनंद काय वर्णावा ! इतकंच काय पण आपल्या कुटूंबाला सुद्धा काहीसा वेळ देता येतोच की ! त्यानिमित्ताने घरी वेळ देत नाही ही तक्रार ही कमी होते.

तसेच मुलांना ही खेळायला, मजा करायला मुक्त वावर मिळतो. अर्थात खुद्द लग्नात ही मजा मस्ती होतेच होते हे काही वेगळं सांगायला नको. मग अगदी नवरा नवरी मंडपात येण्यापासून ते अगदी रिसेप्शन पूर्ण होईपर्यंत ही सगळी धमाल होत असते. यातही एखादी वल्ली या लग्नात सहभागी झाली असेल तर मग बघायलाच नको. कारण वल्ली असणाऱ्या व्यक्ती आयुष्यात मजा मजा करत असतात. त्यांना स्थळ, काळ, वेळ, वय यांचं तसं बंधन नसतं. याचा अर्थ ते बेबंद वागतात असं नाही. पण जे क्षण समोर आले आहेत त्यांचा आनंद घ्यावा याकडे त्यांचा कल असतो. खासकरून ज्यांचं वय झालंय त्यांचा स्वभाव असा असेल तर अजून गंमत येते. अशीच काहीशी गंमत काही वर्षांपूर्वी एका लग्नात आली होती. लग्न एका गावखेड्यात असावं असं जाणवतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला सगळी तरुण आणि छोटी मंडळी डान्स करताना दिसतात. अर्थातच गाणं ही चालू असतं. पण या सगळ्यांमध्ये एक व्यक्तिमत्त्व विशेष उठून दिसत असतं. त्या एक आज्जी असतात. आणि केवळ या सगळ्या चिल्ली पिल्ली आणि तरुणाई मध्ये त्या असतात म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसत नसत. तर, त्या अशा काही तुफान नाचत असतात की विचारता सोय नाही आणि म्हणूनच त्या या व्हिडियोच्या केंद्रस्थानी असतात.

बरं व्हिडियो जसजसा पुढे सरकत जातो, या आजींचा स्वभाव खुलत जातो. सुरुवातीपासून त्यांचे हावभाव मजेशीर असतात. पण सुरुवातीला केवळ हात वर करून मजेशीर हावभाव एवढच त्यांच्या डान्सचं स्वरूप असतं. पण व्हिडियोच्या मध्यावर त्यांना काय वाटतं देव जाणे, आकाशाकडे तोंड करून हळूहळू खाली बसतात आणि डान्स स्टेप करतात. मग उठून पुन्हा एकदम जोशात येऊन डान्स करतात. आजी खरंच वल्ली असतात. त्यांचा डान्स बहुधा त्यांनाच कळला असावा. आपण केवळ त्यांचा उत्साह बघून खुश होतो आणि आश्चर्यचकित सुद्धा होतो ! कारण एरवी घुंगट ओढून राहणाऱ्या आजी आज एकदम दिलखुलास होऊन नाचत असतात. त्या क्षणांची त्यांच्या परीने मजा घेत असतात. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर एकदा बघा. निदान या आजींच्या उत्साहाला आणि उर्जेला दाद देण्यासाठी म्हणून एकदा हा व्हिडियो जरूर बघा. आपली टीम आपल्या वाचकांसाठी सदर व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर करते आहेच. असो.

बरं तर मंडळी हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख !आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *